सेवानिवृत्ती आणि थोडं काही .....
....
सेवानिवृत्ती आणि थोडं काही ....
enlightening--------------
------------------
-----------
-------
----
---
--
-
सेवानिवृत्ती आणि थोडं काही .....
आज नौकरी मधुन निवृत्त झालेत ...भारतीय जीवन विमा प्राधीकरण
म्हणजेच LICI मधून ...
आपल्या कामांत असलेलं बरं ....
आपण बरं आपलं काम बरं ....असं वाटतं। ..
कामाची दगदग जरी होतं असली ...
तरी चार दिवस निवांत पणे घरी राहातं येतं ...
पुन्हा ऑफिस ला रिझ्युम व्हायचं ...
पंण आता कायमची सुट्टी ऑफिस मधून ...
जरा जड जातंय... मनातं कालवाकालव होतंय ...
मागे पडलेले दिवस आठवतात ... भुतकाळ
माझ्या पिताश्रीचे अकाली निधन ...
आम्ही सहा बहीणभावंडं ...
साऱ्या छोट्यांना काळ अकाली मोठं करून गेला ...
वडील ऍडवोकेट होते.. पेन्शन ,फंड हा प्रकार नव्हता ...
त्यानंतर कुणीही कमावणार नव्हतं...
कर्ता धर्ता माणुस काळांनं हिराऊन नेला ...
समाजातली हितैषी माणसं मदतीला आलीत ...
मीठ मिरची ,दाणा पाणी ... अनेक हातांनीं मदत केली ...
भगवंत कुठे कमी पडु देतं नाही...
वडिलांचे निधन झाले तेव्हा तो अवघ्या १९ /२० वर्षाचा
बारावी झालेला , कॉलेजला नुकताचं प्रवेश घेतलेला ...
अश्यातच भाऊला नोकरी लागली...
ग्रामसेवक म्हणुन काही वर्ष नोकरी केली ...
घर थोडं सुरळीत झालं ,मार्गी लागलं ..
छोट्या भावा बहिणीचे शिक्षण सुरु झाले .
आयुष्याने वेग धरला ,गती आली ...https://kittydiaries.com/
बऱ्याच जबाबदाऱ्या ,कर्तव्य पार पाडले ...
नोकरी करता करता बी.कॉम पुर्ण केलं ...
सरकारी नोकरीच्या परीक्षा दिल्यात ...
LIC मध्ये तो रुजु झाला ...पुढे एल एल बी केलं ..
सदा बडबडणारा आणि हसमुख ...
बऱ्याच लोकांना त्यानं आपलंस केलं ..
अश्यातच लेखनाची आवड त्यांनी जोपासली ...
प्रवासाची त्याला भारी आवड ...
तेच क्षेत्र त्यांनी लेखनासाठी निवडलं ...
प्रवासवर्णन करून त्याला इतिहासाची जोंड दिली ...
सुंदर लिखाणं त्यांनी समाज माध्यमांतुनं प्रस्तुत केलं ...
तरुण भारत,,पुणे ,नागपुर ,औरंगाबाद....
लोकप्रभा मधुन त्यांच्या बरेच लेख प्रसिद्ध झालेत ..
त्यांचं एक पुस्तकंही प्रकाशनाच्या मार्गावर आहे..
अपार कष्ट आणि मेहनत घेऊन ....
लेखक, कवी ,गायक ,मुक्त पत्रकार ,एक उत्तम वक्ता...
आपलं व्यक्तिमत्व फुलवलं ..प्रसिद्ध झाले .
माझ्या आईचा वारसा आता तोच पुढे चालवणार ...
LIC मधून आता तो निवृत्त होणार ...
निवृत्ती ..... बंधनातुन मुक्त होणे ...
बंधने कसले ? कंटाळवाण्या आयुष्याचे ..
नोकरीचे ,विवाहाचे ,संसार रेटण्याचे,
रोजचा तोच तोच पणा ....रुटीन
पण सुखदुःखाचे धागे विणुन ,
सगळ्यांना जाणुन घेऊन
सुखासमाधानाने केलेला आपला संसार ....
अर्धांगिनीने,सौ .शीला श्रीकांत पवनीकर यांनी
पावलोपावली केलेली प्रेमळ सोबत ...
मित्रमैत्रीणीचा खळखळणारा धबधबा ....
नोकरीच्या निमित्ताने आनंदी सहप्रवासी .
शेकडो लोकांच्या संपर्कात असणे ..
नवनवीन कौशल्य आत्मसात करणे ...
ऑफिसच्या प्रोमोशन पार्टी ट्रान्सफर ...
कामाचं टेन्शन ,त्यामुळे होणारी चिडचिड ...
यातुन साऱ्यांतून आता निवृत्ती ...
नको ती धांदल नको ती लोकल ...
संथ वाहते कृष्णमाई ....
असं संथ आयुष्य आता जगायचे ...
पण भरभरून जगायचं ...
जे क्षण निसटून गेलेत काळाच्या ओघात
ते क्षण पुन्हा जगायचे , पुन्हा वेचायचे
आयुष्याचा उपभोग घ्यायचा निवांत...
जन्मदिन ,निवृत्ती आणि दिवाळी भाऊबीज...
त्रिवेणी सोहळा आम्ही कुटुंबीयांनी साजरा केला ..
पिकनिक आणि पार्टी भाऊंनीवाहिनीने प्रायोजित केली
भाऊबीजे ची घसघशीत ओवाळणी मिळाली ..
आयुष्याचा बराच मोठा पल्ला गाठलायं ..https://kittydiaries.com/.
आईचे, देवांचे ,गुरुदेवांचे आशीर्वाद आहेतच ...
आता पुढील निवांत आयुष्यासाठी शुभेच्छा ,शुभकामना ...
लेखांकन ..ऍड अर्चना गोन्नाडे ...... . adV ,archana gonnade
LIFEISBEAUTIFUL