Follow Us @soratemplates

Saturday, 21 November 2020

चिऊ चं बारसं ....

चिऊ चं बारसं ....  








चिऊ चं बारसं .... 





चिऊ चं बारसं .... 

कपिल आणि केतकी ... नुकतचं लग्न झालेलं ...

म्हणजे सात आठ महिने झालेले लग्नाला  

आमच्या  फ्लॅट स्कीम मध्ये राहायला आलेले .... 

मुळात गोडं बातमीच घेऊन आलेले ... 

केतकी गरोदर असल्याचं कळलं .... 

मग काय अभिनंदन आणि आशीर्वाद .... 

कोरोना मुळे  तिला भेटायचं नाही .. संसर्ग व्हायला नको ... 

गोडं बातमीही लवकरचं आली... 

कपिल केतकी ला कन्यारत्न झाल्याचं कळलं ..

आनंदी आनंद चहुकडे ... पहिली बेटी धनाची पेटी ... 

सगळ्या आम्हा इथे राहण्याऱ्यांना आनंद ... 

काल त्या छोट्या चिऊचं बारसं होतं ....

घर छान सुंदर सजवलेलं .... प्रसन्न .. 

पांढऱ्या शुभ्र  आणि  फिक्कट गुलाबी रंगांची ...

फुलांची गोलाकार आकर्षक सजावट... 

मधोमध चिऊचा पाळणा ..https://kittydiaries.com/

पृथ्वीतलावर जणु  एक नन्हीं परी आली ... 

केतकी आई चिऊला कडेवर घेऊन होती ... 

जगातलं अत्यंत सुरेख नातं ...आईचं अन आईपणाचं ...

आईचं अन बाळाचं ,मायेचं प्रेमाचं 

केतकी आईपण मिरवतं होती अन 

कपिलचा  बाबा होण्याचा रुबाब ... 

चिऊनि सुंदर पिवळा फ्रॉक ,त्यावर सुंदर हेयर बँड ... 

गोडं गोंडस ,दिसतं होती  चिऊ ..https://kittydiaries.com/.

कुणी गोविंद घ्या ,कुणी गोपाळ घ्या... 

कुणी राधा घ्या ,कुणी रमणी घ्या ...

कानांतं कुणी आत्यानी कुर्र्रर्र्रर्र्रर्र केलं .... 

चिऊ बेटीचं  नाव ठेवलं कस्तुरी ...

कपिल ,केतकी आणि कस्तुरी .... 

छान वाटलं .. प्रसन्न वातावरण  ..

चिऊ ,चिऊ ची आई ,चिऊ ची आजी आणि

चिऊ च्या आज्जींची आई .... 

अश्या चार पिढ्यांचा हा सुखसोहळा .... 

मोठया आज्जीवर चांदीची फुलं अन 

साधी फुलं  उधळलीत... 

चिऊ आज्जीच्या कुशीत बसलेली   ... 

चिऊच्या डोईवर काही पाकळ्या  ओघळलयात... . 

चार पिढ्यांचे आशीर्वाद जणू चिऊला लाभले ... 

बाळा जो जो रे ,बाळा जो जो रे 

पापणीच्या पंखांत झोपु दे डोळ्यांची पाखरे . 

अंगाई गीत ते आजची एक नन्हीं परी .... 

सुदंर सुमधुर गाणी गायलीत ... 

काका काकु,मामा मामी .आत्या ,मावशी ... 

पारंपरिक जरीकाठाच्या सुंदर साड्या ... 

त्यावर ठसठशीत  दागिने ,मोत्यांचे अलंकार ...  

आम्ही मैत्रिणी तर सजून धजूनचं गेलो होतो...

केतकीला हळदीकुंकु, ओट्या ,आहेर भरून झाले ... 

आईपणाचं सुखं ती अनुभवत होती . .. 

लेकीकडे कौतिकानं बघत होती ,पापा घेत होती 

 काही बालगोपाल धोती कुर्ता घालुन ... 

चिऊ चे छोटे छोटे दादा ताई . ... 

त्यांनीही गाणं गाऊन चिऊचं कौतुक केलं ...

चिऊ पण टुकटुक बघत होती .. 

तिला सारं आवडलयं असं सांगत होती ...

चिऊ, आई, आजी, आत्या . चौकडी छान जमली ... 

मस्त मस्त देखणे फोटोसेशन ... 

कॅमेरा सारखा क्लिक क्लिक करत होता ... 

पण ह्या कौटुंबिक सुख सोहळ्याच्या आठवणी ..

मनातं बद्ध  झाल्या  ,कैद झाल्यातं ....

चिऊसं खुप खुप आशीर्वाद ... 

शुभं भवतु ....... 

लेखांकन ... adv. अर्चना गोन्नाडे   







 


https://kittydiaries.com/




 










 

  

 

 









  











 

 

 




No comments:

Post a Comment