वैष्णवी चा तिळवा समारंभ
https://www.pexels.com/video/4265204/
वैष्णवी चा तिळवा
वैष्णवी चा तिळवा समारंभ
कन्यारत्न लग्न होऊन सासरी गेली कि घर कस रिकामं होत हे आई शिवाय कुणीच जाणू शकत नाही.
दुदुडदुडू धावणारी आजची ही पोर चक्क घरसंसार संभाळतेय हे बघून खरंच आश्चर्य ही वाटतं .
त्यात कौतुकही असतं आणि समाधानही असतं . देणंच फक्त आईला माहित असत .
बाकी आईला काहीच माहित नसतं .
संस्कारांची शिदोरीही सासरी जातांना मुलीला बांधून द्यावी लागते . असो
हं तर मी गोष्टी सांगत होती वैष्णवी च्या तिळव्याची .
वैष्णवी माझी सुदंर सुशील कन्या .आय टी इंजिनीअर , एम बी ए .
वैष्णवी पुण्याला राहते . लग्न तिचं नागपूरच्या भर उन्हाळ्यात एप्रिल मध्ये झालेलं .
मुलगी सासरी गेली . घर सुन सुन वाटायला लागलं .
मी नागपुरला ती पुंण्याला . जीवाची घालमेल काही संपत नव्हती .
लग्नानंतर तिची माझी भेट झालीच नव्हती .
घर आणि नोकरी ह्यात व्यस्त असल्यामुळे दिवाळसणालाही तिला येत आला नाही .म्हणुन
तिळसंक्रांत नागपूरला करायचं ठरलं .मी ही उत्साहाने तयारीला लागले .
लग्नानंतर तिची फार अशी भेट झाली नव्हती. एकदाच तिच्या सासरी गेली होते . लग्नाच्या रिसेपशन साठी .
मंगळागौर समारंभ वगैरे सासरीच केलं .लेंक आज येणार म्हणुन मन प्रसन्न होतं .आनंदी होतं .
तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत संक्रात आली .
संक्रान्ति चा सणं .तिळाचा स्नेह अन गुळाचा गोडवा .
सुर्यनारायणाला नमस्कार करून दि वसाची सुरवात झाली नेहमीची आन्हिकं .उरकली .
पुजापाठ झालं . घर प्रसन्न होत ..मुलगी लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येणार .,
मोठया आतुरतेने आम्ही तिची वाट बघत होतो .आणि
वैष्णवी आली ,संदेश सोबत, छान दिसत होती जोडी .
खूप दिवसांनी गळाभेट झाली.मायलेकींची मनं भारावून गेली . ,
चहा ,फराळ झाला .सोबत मनमोकळ्या गप्पा ही . बऱ्याच दिवसात मलाही निवांत वाटलं
तिळव्याची तयारी करून ठेवली होती ..काळी पैठणी वैष्णवीने पुंण्यावरूनच आणली होती .
तिच्या मोठ्या .मावशीला मात्र भारीच हौस
हलव्याचे सुंदर दागिनेही तिनेच केले .तिला कलाकुसर करण्याची खूपच आवड .
कलात्मकतेने हारामध्ये सुंदर गुलाबी फुलं गुंफलेली . सुदंर मुकुट ,बाजुबंद
आंबाड्याभोवती घालायची वेणि .. बांगड्या ,कर्णफुलं. ,
संदेश साठी पण आहेर , कुर्ता पैजामा , चांदीची वाटी
तिच्या सासूबाईंन करिता ,नंणंदे साठी आहेर काढून ठेवला .
तिळाव्याचा सारा साज लेऊन वैष्णवी सुंदर दिसत होती . अधिकच खुलली होती .
संदेश पंण तिला छान शोभत होती . अगदी लक्ष्मीनारायणाचा जोड .
पाळणा सुंदर सजवला होती ,सुंदर सुंदर पानाफुलानी
सारे मामा मामी , मावशी ,काकू, आत्या . सगळेच आवर्जून आले होते .
भाचे कंपनी , चिल्लेपिल्ले ,बालगोपाळ ,.घर आनंदाने फुललेलं .
सोबत पुरुष मंडळीही अगत्याने आली होती ,कौतुक करायला .
मुख्य म्हणजे माझी आई ही आलेली होती ,वय फक्त ब्यांशी वर्ष .आशीर्वाद द्यायला .
फ्लॅट मध्ये राहत असल्या मुळे शेजारची मंडळी ही होती .
मी लेंक जावयांना औक्षण केलं .मी मनातून सुखावले होते .
तिळगुळ ,चांदीची वाटी आहेर ,खणा नारळांन तिची ओटी भरली .
सगळ्यांनी दोघांनाही औक्षण केले .सगळ्यांनी सुंदरसुंदर भेटवस्तू आणल्या होत्या .
तिला औक्षण करीत सगळ्यांनी तिला भेट वस्तू दिल्या . खूप गप्पा गोष्टी झाल्या , .
मनसोक्त गप्पा मारल्या . वातावरण अगदी आनंदीत प्रफुल्लीत होतं ..
नवपरिणीत जोडप्याचं चिडणं चिडवणं चाललेलं होतं . बरोबरीचे भाऊ बहिणी त्यांची खूप मज्जा घेत होते .
सृष्टी ,स्वर्णीम ,आकाश अभिनव ,सागर ,.कुण्णी लहान कुण्णी मोठं . हास्य रंगात सारे विरून गेले होते .
छोटी मावशी ,बिट्टी मावशी ,चंदा काकू ,मीना ,मीनाक्षी आत्या ,
खूप कौतुक केले त्यांनी लेकीचं अन जावयाचं
खूप आनंद झाला साऱ्यांना . मैत्रिणीनी तर छान गाणी गायलीत तिच्यासाठी .
पुन्हा थोडं गाणं .पुन्हा थोडं खाणं .असाच गप्पामध्ये खूप वेळ गेला.
सुखाची बरसांत करून गेला . आनंदाची फुलं उधळुन गेला .
आजी, मामा मामी ,काका काकू आत्या ,सगळ्यांना नमस्कार करून झाला .
भरभरून आशीर्वाद दिलेत तिला साऱ्यांनी . अखंड सौभाग्यवती भव.
थोरामोठ्यांची आशीर्वाद खरचं पाठीशी असावे लागतात . आयुष्यात खंबीरपणाने उभे राहायला .
आजीला म्हणजेच माझ्या आईला मात्र अत्यानंद झाला ..
सुखाचा कौतुकाचा सोहळा पाहतांना ,अनुभवताना ,आभाळमाया ओसंडुन वाहतं होती .
मी आई असल्याचं जरा जास्तच जाणवतं होतं. सुखासमाधानानी घर भरलं .
मी ही मनभर सुखावले होते ... कणाकणांनी वेचलेल्या सुखाचा आज आनंदोत्सव होता .
कौटुंबीक छोटेखानी समारंभ सुखनैवं पारं पडला .. सगळ्याच्या आशीर्वादानं .
अंतर्मन आनंदाचे सगळे सोहळे डोळे उघडून बघत होतं .तल्लीन झालं होत ..
जीवन सुंदर आहे .. .
शुभम भवतु :::::::::::
लेखांकन ----अर्चना गोन्नाडे :
No comments:
Post a Comment