वॅलेंटाईन डे ... प्रेम दिन ... 14 feb
वॅलेंटाईन डे ...
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ...
मंगेश पाडगावकर यांची सुंदर कविता ...
तारुण्याचे उमलते दिवस ... गुलाबी दिवस ..
गुलाब ,गुलाबी भावना ,गुलाबी दिन ,प्रेम दिवस ....
प्रेम म्हटलं कि गाजावाजा आलाचं ..
कॉलेज ,कट्टा ,कॉमन बंक चालायचेच ...
कलासरूम मध्ये वेळ मिळाला तर जायचं ...
चहा कॉफी , गरम तर्री पोहे ,सामोसे ...अहाहा ..
लव्ह अफेअर्स ची खुमासदार चर्चा ....
कुणाची गर्ल फ्रेंड / बॉय फ्रेंड कुणासोबत फिरते ...
इत्यंभुत बातमीदार कट्ट्यावर हजर .
कट्टा , मैफिल रंगत जायची ,कट्टा अजुनचं मोकळा व्हायचा
मस्त खो खो ठो ठो करत हसणे ...लयभारी प्रेम रे बाबा ...
नसते उद्योग सांगितले कुणी ...फटाके लावा ... सोड रे बंड्या हे कामं ...
अरे किती डायलॉग बाजी .... चला हवा येऊ द्या ...
प्रेम व्यक्त करायचं नाही का प्रेमीजीवांनी ...
किती दिवस हृदयातील धडकन सांभाळायची ..https://kittydiaries.com/.
किती दिवस वाट बघायची ,डोळे कितींदा भरून यायचे ...
किती अश्रु गाळायचे ... ओठांवरचे शब्द कितींदा परतुन लावायचे ...
प्रेमात रंगारंग व्हायचं ,नकळत एक दुजे के व्हायचं ...
ब्रेक अप पण सेलिब्रेट करायचं ,विसरून जायचं ...
पण प्रेम कुठे विसरायला होतं का ?
हसायचं ,क्षणातं रुसायचं ,पुन्हा गुपचूप पॅच अप ..
त्याच्या तिच्या साठी आणलेलं गुलाब ,खरचं हिम्मत व्हायची नाही द्यायची ...
मग कुणासाठी आणलेलं गुलाब पुस्तकात जपुन ठेवायचं ...
हळुचं फुल कुरवाळायचं ... पुन्हा ठेऊन द्यायचं ...
प्रेमाची आणलेला खास खाऊ अगदीच संपवायचा नाही ...
घासातला घास तुझ्यासाठीच फक्त रे वेड्या ...काढुन ठेवायची ...
गिफ्ट वगैरे तू ठरव .... तुझं येणचं माझं गिफ्ट आहे ...
आयुष्यात माझ्या यायला ,फक्त तुझीचं लिफ्ट आहे ...
अरे चल ,आज बोलूनच टाक ,सांगुन टाक ...
प्रेमाबिमाचं काय ते नाटक नको ,,, नवटंकी नको रे ..
आयुष्यभर बोंबलत राहायचं नाही ,रडायचं नाही ...
दिलखुलास पणे सांग ,खुलमखुल्ला सांग ...
आय लव्ह यु ...आय ... लव्ह.. यु ...
विल यु बी माय व्हॅलेंटाईन ?
माझं प्रेम होशील ना ?
सांग तु ,माझाचं ना$$$$$ ? ...
HAPPY VALENTINE DAY
NO REGRETS ... EXPRESS LOVE
लेखांकन .. ADV अर्चना गोन्नाडे ..
ARCHANA GONNADE
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/12/a-table-of-two.html
RELATED BLOGS
https://diaryofkitty007.blogspot.com/2021/01/blog-post_28.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2021/01/blog-post_16.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/12/a-table-of-two.html
prem manje prem aaye , nice
ReplyDelete