सिंधुताई सपकाळ -----मला पहाडाला जागवायचं आहे
https://kittydiaries.com/
सिंधुताई सपकाळ -----मला पहाडाला जागवायचं आहे
सिंधुताई सपकाल। .. एक उत्तुंग व्यक्तिमत्व। ....
आमच्या भारत देशाच्या नागरी सन्मानाने। ...
पद्मश्री अवार्ड ने गौरविण्यात आले....
खरच अश्या थोर माऊलीला पुरस्कार देऊन धन्य झालेत भारतवासी । ...
एक खेडेगावतुन आलेल्या स्त्री चा सामाजिक प्रवास एवढा सोप्पा नव्हता।
वर्धा ,महाराष्ट्र राज्यातले एक शहर.... अत्ता तिथे सुखसोयी आल्यात। ...
सिंधुताई जेव्हा लहान होत्या तेव्हा वर्धा म्हणजे एक खेडांच। ....
फारश्या शिक्षणाच्या सोई उपलब्ध नव्हत्या। .. पण शिक्षणाची भरी हौस। ..
आईचा विरोध होताचा शिक्षणाला। .. वडिलांचा नव्हता। ...
अत्यंत गरीबीमुळे शिक्षणाला पैसे नाही। ... कसं करायचे। ..
गुरेढोरे राखायचे दुर जंगलात , मग बिडीची पान घ्यायची। ..
त्यावर लिहायचे। ... अ ब क ड। ... पैसा नव्हता। . शिक्षण वाऱ्यावरती
कसबस शालेय शिक्षण चौथ्या वर्गापर्यंत झालं। ....
कोवळया वयातचं लग्न झालं। .. अवघ्या बाराव्या वर्षी। ...
नवरा जेमतेम ,गरीबी ,मारझोड। ... आयुष्याने भांडावुन सोडलं। ..
एका पाठोपाठ तीन मुलं जन्माला घातली। ..
तिसऱ्या बाळंतपणातं हाकलून लावलं घरांतुनं। ...
गाईच्या गोठ्यातं बाळंतपण झालं। ...
मुलीला उचललं ,नाळ कापली आणि कुड़कुड़ण्या ऱ्या थंडीत। ...
कारपोरेशन च्या नळाखाली जावुन आंघोळ केली। ...
खुप सोसलं ,आघात झालेतं मनावर ,शरीरावर। ..
सगळ्यांनीच तिला नाकरालं ,पण आयुष्य तिच्या जवळ आलं। ...
प्रेमानी ओंजरालं गोंजरालं , कुठनशी हिम्मत आली। ...
लोकांच्या दयेवर जगण्याची वेळ आली ....हाथ पसरला , भिक मागीतली ...
रेलवे प्लेटफार्म वर रहता राहाता गोरगरीब ,भिकारी मुलांची ती आई झाली। ..
अनाथांची माय झाली। .. लेकरं बाळं येऊन बिलगु लागली। ...
सिंधुताई आईचे थोर उपकार झाले
पन्नास हत्तीच बळ संचारलं अंगात।
चिखलदरया मध्ये टाइगर प्रोजेक्ट साठी आदिवासींना गावं रिकामं करावी लागलीत । ...
त्यांच्या गायी डांबुन ठेवल्या ,... एक गाय मेली। ...
सिंधुताई खंबीरपणे उभ्या झाल्या आदिवासींच्या पाठीशी ,
मोर्चे आंदोलनं उभे झाले , सरकारलाही दखल घ्यावी लागली। ..
आदिवासींचे पुनर्वसन करावे लागले सरकारला । ...
सिंधुताई आणि आदिवासी बांधवांची ती जीत होती ....
सिन्धुताईच्या सामाजिक प्रवासाची ही सुरवात म्हणावी लागेल। ...
त्यानंतर त्यांचा प्रवास अधिकाधिक वेगाने सुरु झाला ...
अनाथ लेकरांसाठी त्यांनीं दि मदर फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली ...
कितीतरी अनाथ मुलं त्यांनी मोठी केली ...
आज इथली मुलं प्रतिथयश डॉक्टर ,इंजिनीयर, वकील आहेत ...
प्रतिष्ठा ,पैसा ,मानसन्मान ,आज भरभरून आहे ..
सिंधुताईंना भेटण्याचा माझा योग खुप जुना आहे ...
अमरावती महाराष्ट्र जवळ चांदुर बाजार पासून पुढे कस्तुरबा आश्रम आहे ...
ताराबेन मश्रुवाला यांचा कस्तुरबा ट्रस्ट ... परित्यक्ता स्त्रियांकरिता आश्रम
दवाखाना ,मुलांसाठी शाळा , निवासा ची सोय ....
महात्मा गांधींचा बेन नी वसा घेतलेला ...
सगळं ताराबेन आपुलकीनं सांभाळायच्या https://kittydiaries.com/...
ताराबेन म्हणजे महात्मा गांधी यांच्या स्नुषेच्या भगिनी....
२२ फेब्रुवारी ला तिथे मातृदिन साजरा होतो ... १९८६ चे ते वर्ष ..
माझ्या आईचे ,ताराबेन सोबत घरचे जुने संबंध ,आश्रमाचे संबंध ...
काही काळ आम्ही त्या आश्रमात राहिला आहोत , ताराबेन च्या सहवासात ...
कस्तुरबा पुण्यतिथीचे आग्रहाचे निमंत्रण होते ,कर्तव्य पण होते , मी पण आई सोबत गेली ...
त्या कार्यक्रमाला सिंधुताई सत्कार मुर्ती म्हणुन आल्या होत्या ...
एक नऊवारी घातलेली बाई काय बोलणार माईकवर ?
पण सिंधुताईंनी आपबिती सभेसमोर मांडली त्यांच्या खासमखास शैलीतून ...
हृदय पिळवटुन टाकणारी त्यांची व्यथा ऐकली ....
त्यांचे शब्द अजूनही आठवतात ..
माझे दुर्दैव हीच माझी प्रेरणा आहे ..
मला माणसाला जागवायचं नसुन पहाडाला जगवायचे आहे ..
हिंदी शेरो शायरी ,बहिणाबाईंचे अभंग अगदी मुखपाठ ....
नऊवारी ,डोईवर पदर ,ओघाने भाषणातनं आलेले अभंग ....
जणू त्याचं सगळ्यांची बहिणाबाई होऊन आल्या ,आई होऊन आल्या
सिंधुताई बोलतच राहिल्या ,वेळ संपल्याचं ही कुणाला भान नव्हतं....
सगळ्यांच्या हृदयाला पाझर फुटला ,डोळे पाणावले https://kittydiaries.com/...
प्रेमळ ताराबेन नी त्याचा सत्कार केला... दोघीनाही गदगदून आलं ..
समोर जाऊन आम्ही त्यांना भेटुन आलॊ ... बेन नि ओळख करून दिली ..
पदस्पर्श केले .. आशीर्वाद घेतले ... खूप बरं वाटलं ...
ती आठवण आजही मनातं घर करूनआहे ..
शब्दांची ताकद काय असते हे दाखवून दिले ...
शब्द नुसते पोकळ नसावेत ... हृदयातुन तिडीक उठवी लागते ...
शब्दच जेव्हा मंत्र होतात ... तेव्हा ते फलित होतात ...
किमया असते ती शब्दांची ... हृदयातुन संवाद साधण्याची ...
कुणाचे शब्द शाप होतात ... कुणाचे शब्द आशीर्वाद होतात ...
खुप सत्कार सोहळे झालेत , खुप पुरस्कार मिळालेत ...
पण सिंधुताईंचे पाय मात्र आपल्या जमिनीची मुळ घट्ट धरून आहेत ...
त्यांचं कार्य अव्याहत चाललयं ..आईची माया त्यांनी लावलीय. अनाथ मुलांवर ,
पुढच्या पिढीवर त्या शिक्षणाचे संस्कार करतात आहेत ...
भारताची पुढची पिढी संस्कारक्षम करण्याचा त्यांचा यज्ञ आहे ,संकल्प आहे ..
पुरस्कार म्हणजे केलेल्या कार्याची पावतीच ,कौतुकचं ते ...
सिंधुताईंना पदमश्री पुरस्काराने ने सन्मानीत ,गौरविण्यात आलं ...
एका उत्तुंग व्यक्तीचा,अनोख्या कार्याचा ,कार्याच्या प्रवासाचा सन्मान झाला ...
अनाथांची माय ,सिंधुताई तुमचे आशीर्वाद असेचं आमच्यावर असू द्या ....
तुमची आभळभरं माया ,प्रेम आम्हांवरही असू द्या ....
थोडावेळ का होईना ,त्यांची भेट झाली ,आशीर्वाद घेतला ...
असल्या थोर माणसांची भेट उगाच होतं नाही ...
कुठलासा ऋणानुबंध असावा लागतो ... https://kittydiaries.com/
सिंधुताईंच्या कार्याला त्रिवार सलाम... आणि अभिनंदन आणी शुभेच्छा
लेखांकन ---- adv अर्चना गोन्नाडे .. archana gonnade
सिंधुताई सपकाळ -----मला पहाडाला जागवायचं आहे
related blogs
https://diaryofkitty007.blogspot.com/2021/01/blog-post.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/11/blog-post_26.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post.html
.
No comments:
Post a Comment