Follow Us @soratemplates

Friday, 26 November 2021

कोंकण --१ दिवेआगार चा समुद्रकिनारा ....

09:00 0 Comments



कोंकण --१  

 दिवेआगार चा समुद्रकिनारा .... <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7365972984366991"

     crossorigin="anonymous"></script>



कोंकण --१ 

दिवेआगार चा समुद्रकिनारा .... 

बस्स .ठरलं एकदाच ... कोंकण फिरायचं ... 

पुण्या  ला मुक्काम होताच ...शॉर्ट पिकनिक ला जायचं ... 

 कुणीसं सांगितलं दिवेआगार ला जा ...जवळचं श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर .. 

दोन दिवसांत छान भटका ... मोकळेपणी ...फ्रेश वाटेल ... 

अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे...... 

त्याच दिवशी टॅक्सी बुक केली आणि दुसऱ्या दिवशीच निघालो  

जिल्हा रायगड .. तालुका श्रीवर्धन ... पुणे पासून अवघ्या १६० कि .मी . 

@दिवेआगार ला पोचता पोचता दुपार झालीच होती ... 

आम्ही रिसॉर्ट बुक केले ते समुद्रकिनाऱ्या च्या जवळचं ... 

पायी चालत जावे इतकं दोन मिनिटभरात ,इतकं जवळ ... 

दुपारचे ऊन टाळून आम्ही सायंकाळी  पाच वाजता बीच वर पोहचलो ..

अहाहा काय सुंदर ,अप्रतिम समुद्र किनारा ...

मावळतीचे रंग आभाळभर पसरलेले .. 

निळ्याशार आकाशावर केशरी रंगांची उधळण .... 

त्यांत  पिवळा तांबूस रंग ,सोनेरी आभा 

सागराच्या लाटांवर स्वार होऊन जणु किनाऱ्यावर झेपावत होती ... 

सागर किनारा पण पिवळ्या  तांबूस सोनेरी रंगात न्हाऊन घेत होता ... 

अस्ताचलाला जाण्याऱ्या  सुर्याला वंदन करून आम्ही ही त्या समुद्रांत शिरलो ... 

मनसोक्त पणे सारा समुद्र अंगावर घेतं ... 

लाटां सोबत मैत्री करीत ,लाटांवर स्वर होत आम्ही येथेच्छ डुंबलो ..

नाही भीती वाटली कुठलीही सागराची ,मैत्री केलीय ना ... 

मग डर कशाला /? काय व्हायचे ते होऊन जाऊ दे ... पण .भीती नकोच  मनांत .. 

सायंकालीन ती वेळा ,सागरकिनारा ,अंगावर शिरशिरी आणणारा तो गारवा ... 

मन धुंद , बेधुंद झालं होतं .... काव्य न सुचावे तरच नवल ... 

प्रणयाच्या वाटा इथंच गवसत असाव्यात..... प्रेमात असचं पडायला होतं .. 

नभी उधळला गुलाल केशर 

चंद्र  मधाळला दिसे दुरवर ... 

सांध्य झळाळी  मनांत हुरहुर 

प्रणय भळाळी हृदयी काहुर ..    

हृदयाच्या कप्प्यात असलेली चोरजागा कुठे गवसते कुणाला ?

अशा धुंद वातावरणात पुन्हा पुन्हा  जाग  येतें .... 

 प्रीतगीत ,प्रणय झंकारतात ,लाटांवर स्वार हॊतातं ... 

किनाऱ्यावर धडकतात .... क्षणभर विसावतात .. अन पुढे .. 

सागराच्या पोटांत लुप्त होतात ...गुप्त होतात 

 खूप खूप दडलंय हा  समुद्राच्या पोटांत , काळजी घ्या ...

उद्या पुन्हा भेटुया ... गप्पा मारायला ... 

लेखांकन --एड . अर्चना गोन्नाडे archana gonnade 


 



 


  
















 



Saturday, 20 November 2021

पी.एन.गाडगीळ अँड सन्स .P.N.G and सन्स डहाणुकर शाखा एकदा भेट अवश्य द्या .. सुवर्णयोग साधा ..

09:08 0 Comments

 पी.एन.गाडगीळ अँड सन्स .P.N.G and सन्स    डहाणुकर शाखा 

एकदा भेट अवश्य द्या .. सुवर्णयोग साधा .. <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7365972984366991"

     crossorigin="anonymous"></script> https://pngadgilandsons.com/ 


ओम हिरण्यवर्णामं हरिणीम... 

हिरण्मयी आली या जगतात .. धनत्रयोदशीला ..   

बाळ जन्माला आलं की त्याच कोण कौतुक...                                      

मिठाई, पेढे.बर्फी यांची रेलचेल...

आनंदी आनंद गडे...इकडे तिकडे चोहीकडे. .

आत्ता बाळाचं बारसं...नामकरण विधि...

बाळाला जन्मतःच तेजोवलयं असतं ...सुरक्षा कवच असतं 

पण पण लौकिकार्थ आहे ना   जगात ...

बाळाला वाळे तोडे हवेच ना  

सुवर्णा ची झळाळी हवीच ना बाळाला..

मग पी.एन.जी. आहेच की ...चिंता नको..

डहाणूकर  शाखेत ... आम्ही गेलो...https://pngadgilandsons.com/happy-colony/

खुप मोठ्ठी प्रशस्त शोरुम आहे...

मेनरोड ला असल्यामुळे आपण सरळ  शोरूम  जवळच उतरतो.

आतं शिरतो तोचं कुणी अदबीनं समोर येतं ,

"नमस्कार"  काय हवंय ? ..

थोडी बातचीत अन आपलं  भव्य शोरूम मध्ये पदार्पण झालेलं असतं .. .

सोनसळी रंगात पी.एन.जी.झगमगत असते...

वाह वाह किती सुंदर. ..

राजा रविवर्मा चं सुंदर मोठ्ठ पेंटींग ... नजर सहजचं तिकडे वळते .. 

भितींवर असलेलं ते बोलकं पेंटिंग / चित्र 

पी.एन.जी. ची पारंपरिक शैलीच जणु अधोरेखित करीत असावी...

आता जरा पुढे वळुया .... 

बघा किती छान व्यवस्था केलीय ती..

सोनं,चांदी चे सुन्दर पारंपरिक दागिने मनातं भरतात..

कर्णफुले,वज्रटिक,मोहनमाळ ,बांगडया,पाटल्या 

,झुमके ,इअरिंग्स ,लोंबते कानातले ,वेल 

नवनवीन डिझाईन मध्ये उपलब्ध आहेत...

कुणाला भेटवस्तू देण्याकरिता आपल्या बजेट मध्ये 

बरेच पर्याय आहेत...तेही नाविन्यपुर्ण ... 

श्री गणेशाच्या ,आणि अष्टलक्ष्मीच्या फ्रेम्स खूप सुंदर आहेत .. 

प्रत्येक विभागा /दालन आपलं वेगळेपणं जपुन 

चांदी चे विविध अलंकार...

फक्त अलंकारचं नाही तर चांदीची पूजेकरिता वापरण्यात येणारी 

कलश ,अष्टदळ,तबक , वाट्या पेले, ताम्हण आणि .... बरचं  काही 

सुवर्णाचे,मोत्यांचे  अलंकार या साठी  तळमजला

तर वरच्या मजल्यावर हिऱ्यांचे अलंकार...

बारसं असो , साखरपुडा ,विवाह असो ,व सहज सुवर्ण खरेदी असो .

किंवा गुरुपुष्यामृत योग्य असो .

शगुन म्हणुन एखादा दागिना सुवर्णाचा असतोच ... प्रथा परंपरेप्रमाणे 

मनाची द्विधा  अवस्था होते दागिने घेताना...हा घेऊ कि तो घेऊ .. 

पण पी.एन .जी. ची टीम भारी ...

तुम्हाला कुठला अलंकार खुलून दिसतोय ते निःसंकोच सांगतात...

अन पुढे आपण ठरवलेली खरेदी करतोच पण

 न ठरवलेली पण मनांत असलेली खरेदी होतेच ... 

हीच पी. एन. जी . च्या यशाची पावती आहे ... 

जुनी मोड द्यायची असेल तर त्याचा उत्तम परतावा मिळतो,तशी रसिद ही मिळते...

अदबशीर स्टाफ, सगळ्या स्टाफ चे एकमेकांशी समन्वय ,ताळमेळ 

ड्रेस कोड या सारख्या गोष्टी निश्चितच वाखाणण्या सारख्याच आहेत.. 

एकगोष्ट मात्र मी मार्क केली ...खटकलंही  

पुरुष स्टाफ जो आहे ,त्यांच्या शर्ट वर त्यांच्या नावाचे आय कार्ड दिसले ... 

परंतु स्त्री स्टाफ ला मात्र  आय कार्ड लावलेल आढळलं नाही .. 

कदाचित सुरक्षेसाठी वेगळे काही कारण असू शकेल ... 

कंटाळा आला तर ऐसपैस सोफ्याची व्यवस्था आहे    

काही हवं नको ते विचारणारी अगत्यशील टीम आहे ...

मी पण माझ्या हिरण्मयी बाळासाठी खरेदी केली ... 

सुवर्ण झळाळी यायला हवी च ना... 

बाळाचं नाव हिरण्मयी ठेवलयं  .... 

ओम हिरण्यवर्णामं हरिणीम ....

हा माझा पहिलाच अनुभव पी.एन जी  चा  

नक्की तुम्ही ही भेट द्या पी .एन .जी . डहाणुकर ला https://pngadgilandsons.com/happy-colony/

सुवर्ण खरेदीचा आनंद लुटा ....

 ADV.  अर्चना गोन्नाडे ,नागपुर


https://pngadgilandsons.com/



https://pngadgilandsons.com/happy-colony/