कोंकण --१
दिवेआगार चा समुद्रकिनारा .... <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7365972984366991"
crossorigin="anonymous"></script>
कोंकण --१
दिवेआगार चा समुद्रकिनारा ....
बस्स .ठरलं एकदाच ... कोंकण फिरायचं ...
पुण्या ला मुक्काम होताच ...शॉर्ट पिकनिक ला जायचं ...
कुणीसं सांगितलं दिवेआगार ला जा ...जवळचं श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर ..
दोन दिवसांत छान भटका ... मोकळेपणी ...फ्रेश वाटेल ...
अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे......
त्याच दिवशी टॅक्सी बुक केली आणि दुसऱ्या दिवशीच निघालो
जिल्हा रायगड .. तालुका श्रीवर्धन ... पुणे पासून अवघ्या १६० कि .मी .
@दिवेआगार ला पोचता पोचता दुपार झालीच होती ...
आम्ही रिसॉर्ट बुक केले ते समुद्रकिनाऱ्या च्या जवळचं ...
पायी चालत जावे इतकं दोन मिनिटभरात ,इतकं जवळ ...
दुपारचे ऊन टाळून आम्ही सायंकाळी पाच वाजता बीच वर पोहचलो ..
अहाहा काय सुंदर ,अप्रतिम समुद्र किनारा ...
मावळतीचे रंग आभाळभर पसरलेले ..
निळ्याशार आकाशावर केशरी रंगांची उधळण ....
त्यांत पिवळा तांबूस रंग ,सोनेरी आभा
सागराच्या लाटांवर स्वार होऊन जणु किनाऱ्यावर झेपावत होती ...
सागर किनारा पण पिवळ्या तांबूस सोनेरी रंगात न्हाऊन घेत होता ...
अस्ताचलाला जाण्याऱ्या सुर्याला वंदन करून आम्ही ही त्या समुद्रांत शिरलो ...
मनसोक्त पणे सारा समुद्र अंगावर घेतं ...
लाटां सोबत मैत्री करीत ,लाटांवर स्वर होत आम्ही येथेच्छ डुंबलो ..
नाही भीती वाटली कुठलीही सागराची ,मैत्री केलीय ना ...
मग डर कशाला /? काय व्हायचे ते होऊन जाऊ दे ... पण .भीती नकोच मनांत ..
सायंकालीन ती वेळा ,सागरकिनारा ,अंगावर शिरशिरी आणणारा तो गारवा ...
मन धुंद , बेधुंद झालं होतं .... काव्य न सुचावे तरच नवल ...
प्रणयाच्या वाटा इथंच गवसत असाव्यात..... प्रेमात असचं पडायला होतं ..
नभी उधळला गुलाल केशर
चंद्र मधाळला दिसे दुरवर ...
सांध्य झळाळी मनांत हुरहुर
प्रणय भळाळी हृदयी काहुर ..
हृदयाच्या कप्प्यात असलेली चोरजागा कुठे गवसते कुणाला ?
अशा धुंद वातावरणात पुन्हा पुन्हा जाग येतें ....
प्रीतगीत ,प्रणय झंकारतात ,लाटांवर स्वार हॊतातं ...
किनाऱ्यावर धडकतात .... क्षणभर विसावतात .. अन पुढे ..
सागराच्या पोटांत लुप्त होतात ...गुप्त होतात
खूप खूप दडलंय हा समुद्राच्या पोटांत , काळजी घ्या ...
उद्या पुन्हा भेटुया ... गप्पा मारायला ...
लेखांकन --एड . अर्चना गोन्नाडे archana gonnade
No comments:
Post a Comment