परत फिरा रे चिमुकल्यांनो ......
परत फिरा रे चिमुकल्यांनो ......
कालरात्री चोर पावलांनी आली ....
खरचं चोर पावलं होती का ती ?....
तुम्हां चिमुकल्यावर घाला घालून गेली ..
सगळा हल्लकल्लोळ माजला ..
यमराजाच्या काळजांत हि कालवाकालव झाली असणारं
धगधगत्या अग्निहोत्रात तुमची आहुती दिल्या गेली जणु ....
चुक कोणाची ? कुणाकुणाचं चुकलं ह्याचं मोजमाप होईल...
सारं ऑडिट होईल घडलेल्या चुकांचं ....
कुणावर तरी दोषारोपणं , डोक्यावर खापर फोडल्या जाईल ...
शिक्षा ही होणारं ... बरबाद होणारं ... https://kittydiaries.com/
पण नवजात मातांची गगनभेदी किंकाळी
हृदय भेदणारी किंकाळी ,टाहो आहे कुणी ऎकायला ?
धाय मोकलुन रडण्याऱ्या माता ...
लेकरांसाठीचा फोडलेला हंबरडा ऐकलेय कुणी? https://kittydiaries.com/
नवजात अर्भकं अग्नीच्या भक्षस्थानी पडली ....
मायेचा हात ,मायेचं स्पर्श कुणीचं अनुभवाला नाही .
ना आईनं .ना बापानं ,ना आज्जीन्न .
ना छकुल्यांनां कुशीत घेता आलं ...
आईपणं हिरावुन नेलं दैवांनीं ... किती दुर्दैव ....
किलकिलत्या डोळ्यांनी सारं जग बघायच्या आंतच ..
सारं सारं संपलं ,थंडावलं , छकुल्यांनो खरच काय गुन्हा केला तुम्ही ?
काचेच्या पेटीबंद एवढचं आयुष्य होत का ?
धगधगत्या ज्वाळांनी तुम्हाला वेढलं ...
आई अन बाबांच्या काळजाचा ठोका चुकला ...
आईची अंगाई राहिली .. पापणीच्या पंखांत पाखरं झोपली नाहीत ...
कान्हा निघुन गेला .. निघुन गेला
आईचा फुटलेला पान्हा कसा थांबवु ?
आसवांच्या दारियातनं तोही वाहून गेला ...
क्षमा करा चिमुकल्यांनो .... चुकलं माकल माफी ....
परत फिरा रे छकुल्यांनो ... पुन्हा त्याच आईच्या पोटी ..
आईची कुस वाट बघतेय छकुल्यांनो ....
भावपुर्ण अश्रुपूर्ण नमन भंडाऱ्याच्या या छकुल्यांना ...
लेखांकन ... adv अर्चना गोन्नाडेhttps://kittydiaries.com/
see more
https://kittydiaries.com/
see more
No comments:
Post a Comment