Follow Us @soratemplates

Wednesday, 13 January 2021

ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड,दार उघड ...

 ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड,दार उघड ...

तिळगुळ घ्या. गोड गोड बोला 


    तिळगुळ घ्या ... 
    गोड गोड बोला 






ति ळा ति ळा दार उघड ,

दार उघड, दार उघड ...

ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड .,दार उघड .. 

कश्याला ?कश्याला ? का बरं ?

हा सांकेतिक शब्द म्हणजे कोडवर्ड ना ? 

काय शोधायचयं तुला ? 

मला ना सुखं ला शोधायचयं ....

ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड .,दार उघड .. 

सुख असं शोधुन मिळत का ...? 

तुला कशात सुख वाटतं ,,, सांग ना .बोल 

पैशांत वाटतं सुख .. कि प्रेमांत ..

कष्ट करून चार पैसे मिळवण्यात ..... 

कि पिढीजातं पैश्यावर लोळण्यात आनंद मानायचा  

कसं सुख हवयं  तुला ...? स्वछन्द फिरायचयं?

 ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड .,दार उघड .. 

 अरे ,सुखाचं दुकान चालता बोलता येतं ...mithoo

आईला कामाला हातभार लावणं म्हणजे सुख असतं ...

आईसोबत मंदिरात कधीमधी जाणं हि सुख असतं  

ऑफिसाला ,स्टेशनला बाबांना सोडणं , थोडी मस्करी करणं सुख असतं ..

आज्जीशी गोडं गोडं  बोलणं ... कुशीत शिरून लाडावून घेणं ... 

अरे , कित्ती छोटे छोटे  क्षण असतातं सुखाचे ... 

ताईचे पाढे पाठ घेणं , मधेच कुठे खोडी  काढणं जमतं ना ...  

भावंडांनी एकत्र येऊन गप्पा मारणं ,सुखचं असतं ना ते ...

ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड .,दार उघड .. 

सासु सुनेचं पटतंचं  असं कधी होतं का? ... 

भांड्याला भांड लागताच ना ....आवाज होतच ना  

थोडी तु पुढे हो ,जरा तु मागं घे ... बघ सुख कसं गवसतं तें ... 

कुठलचं कोडवर्ड नको ... सांकेतिक शब्द नको ..

सुख म्हणजे भावनांचा खेळ आहे रे ..tilgul.  

आपल्या राणीला कधी फिरायला ने ... बघ कशी कळी  खुलते ... 

हवं तेवढं सुखं वेचून घे ... तिळा तिळा दार उघड.... 

 अडल्या नडल्याला मदत कर ... गोरगरिबांची झोळी भर .. 

 शिक्षणाची कास धर ... मनांत सुखाची आस धर . .

कधी वेडा होऊन जा .. मनसोक्त गप्पा मार ...

भडाभडा मनातलं सगळं काही बोलून टाक ... 

मन होईल आभाळासारखं ,निरभ्र , मोकळं ... 

तेच सुख असतं रे मनातलं ... तिळा तिळा दार उघड 

सुख म्हणजे मी छोटा भाऊ ... दुःख माझाच मोठा भाऊ ... 

सुख पाहता जवा एव्हढे ... दुःख पर्वता एव्हढे .... 

सुख तीळ तीळ वेचावं , कण कण वेचावं ,वाढवावं 

अन राईचा पर्वत करू नये .. दुःखचं समोर येतं 

छोटेपणांत सुख असतं , सुख कणाकणांनी वेचयाचं ...

सुख वेचता आलं,त्यात आपसुकचं गोडी वाढतें ..

.स्नेहबंध  हळुवारं  जुळतातं ....

मनातंला गोडवा घोळवावा लागतो .... 

सुखाचे शहारे अंगभर फुलतातं ....

सुख माझ्या दारी असतं .... स्नेहबंध उलगडतं 

सुख म्हणजे नक्की हेचं असतं ...हेचं असतं ...

ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड .,दार उघड ..

कोडवर्ड ,सुखाचा गवसलायं .... हो नक्की... 

तिळगुळ घ्या .. गोड गोडं बोला ....

तिळगुळ घ्या , गोड गोड बोला  

मनापासुन सर्व माझ्या मित्रमैत्रिणीं ना... 

तिळसंक्रांतीच्या शुभेच्छा .... 

तिळगुळ घ्या ,गोड गोड बोला ...कोडवर्ड पुढे पाठवा ना प्लीज 

 लेखांकन .... ADV ,अर्चना गोन्नाडे https://kittydiaries.com/



    tilgul        

sweets/honey

https://kittydiaries.com/

story







 


 

 








 

 


 

 


.. 


No comments:

Post a Comment