Follow Us @soratemplates

Tuesday 27 April 2021

तेथे कर माझे जुळती ... नारायणराव दाभाडकर,नागपुर

 तेथे कर माझे जुळती ... 

नारायणराव दाभाडकर,नागपुर

 

 तेथे कर माझे जुळती ... 

नारायणराव दाभाडकर,नागपुर

दिव्यत्वाची जेथे  प्रचिती ,तेथे कर माझे जुळती .. 

कोरोना ने सारे जग आपल्या विळाख्यात घेतलयं ... 

हाहाकार माजलाय सगळीकडे .. 

औषधं  , हास्पीटल ,निरनिराळ्या तपासण्या आता जस रुटीन होऊन गेलंयं ... 

ऑक्सिजन सिलेंडर्स चे बेड्स उपलब्ध नाहीत .. असं सर थैमान मांडलयं कोरोनाने ... 

अशातच राट्रीय  स्वयंसेवक  संघ परिवारातील एक व्यक्ती .. 

नारायणराव दाभाडकर दिव्यत्वाची प्रचिती घेऊन जाते ... 

घडलं असं कि नारायणराव कोरोना ग्रस्त झाले ,वय फक्त ८५ वर्ष ..

एका शिस्तीत आयुष्य घडलं , मनांवर  संस्कारांचा पगडा ... 

वृद्धापकाळ सुखात सरतोय , पण कोरोनानी  घेरलयं .. 

प्राणवायु ची गरज भासली ,इंदिरा गांधी रुग्णालयात(नागपुर ) भरती केली ... 

प्राणवायु सिलेंडर चा एकाच बेड  उपलब्ध  होता ... 

धावपळ करून साऱ्या कागदपत्रांचीही पूर्तता झाली ...https://kittydiaries.co

 नर्सेस ची धावपळ ,बेड तयार करायला , बेड तयार झाला ...

खिडकी जवळचा बेड त्यांना मिळाला ,प्राणवायूची  धोक्याची पातळी होती त्यांची 

उपचार सुरु झाले ... पण त्यांना आवाज आला ,रडण्याचा,विनवणीचा ,आर्त स्वरांचा .. 

एक महिला  ऑक्सिजन बेड साठी विनवणी करतं हॊती ,तिच्या  पतीसाठी .. 

जेमतेम वयाची चाळीशी असावी तिच्या पतीची ,संस्कारक्षम मन  स्वस्थ बसू देत नव्हतं ...

अरे हा माणुस जगाला पाहिजे मी काय मी जगलोयं माझं आयुष्य .. 

माझं बेड ,ऑक्सिजन त्या तरुणाला मिळायला हवं ... तरुण रक्त ,जगाला पाहिजे .. 

मनातं आलं नुसतं त्यांच्या अन प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली .. 

नातेवाईकांना बोलावलं ,घरच्यांना आपला  निर्णय कळवला 

सारेच जण स्तब्ध झाले नारायण रावांचा निर्णय ऐकून  

डॉक्टरांशी बोलले ..डॉक्टर ही  काही बोलु शकले नाहीत त्यांच्या निर्णयापुढे ...

मी बेड रिकामा करतो ,त्या तरुणाला हा बेड द्या ,त्याच्यावर उपचार सुरु करा .. 

माझें जगणे झालाय आता वारंवार ते सांगत राहिले 

,त्यांनी बेड रिकामा केला ,नातेवाईकांसोबत घरी गेलेत ..

दोन दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली ...

अनंताच्या प्रवासाला निघाले.. नारायण नारायण ..    

आपल्या उरलेल्या आयुष्याचंचं नारायणरावांनी जणू दान केलं .. 

साक्षात यमराज दाराशी उभा ,मृत्यु दाराशी उभा , 

पण प्राणपणानं जपलेलं तत्व ,संस्कार अखेरच्या श्वासापर्यंत जपले ..

आयुष्याचं दान घेणारा व्यक्तीही कुणी खचितच पुण्यवान असणारं ..

देणाऱ्याने देतं जावे ,घेणाऱ्याने घेत जावे ,

घेणाऱ्याने घेता घेता ,देण्यार्याऱ्याचे हात घ्यावे ... 

संस्कारांची ही गंगाजळी अशी वाहू दे .. 

नारायणरावांच्या  दिव्य आत्म्याला अशी  प्रार्थना मी बापडी काय करणार ?

दिव्यत्वाची जेथे प्रचिती ,तेथे कर माझे जुळती ...https://kittydiaries.co

लेखांकन --- ADV ,अर्चना गोन्नाडे ARCHNA GONNADE 

  https://kittydiaries.co






No comments:

Post a Comment