गोडं माणसं .... समजुन घ्या ...
अरे किती गोड बोलशील ?
बघ डायबेटीस होईल ना मला . खरचं गोड बोलण्यानं डायबेटीस होतो काय ?
कुणी सांगितलं ? काहीतरीच हं तुझं ? प्रेमी जिवांच्या ह्या गुजगोष्टी सहज कानांवर येतातं
असले संवाद आजकाल फार ऐकायला मिळतात ... खरंच का इतके गोड बोलतात माणसं?
तो त्यांचा स्वभाव असतो कि नाटक असतं काही कळतं नाही...कसे बोलायचं प्रश्नचं असतो समोर.
नाटकी माणसं गोड गोड बोलण्याचं नाटक वठवणारं https://kittydiaries.com/
असं वाटतं कि साऱ्या जगातं तोच माझा आधार आहे ,इतकं परिपुर्ण नाटक ...
मुह मी राम बगल मी छुरी असा स्वभाव ... पाठ वळताच कागाळ्या सुरु ...
भेटण्याचा प्रसंग आला तर , जिभेवर जणु शर्करा आणि मधुपर्क kittydiaries
आपलं काही ऐकुन घेणार नाहीत ,वर अजुन तेच चार गोष्टी सांगतील
अरे असं करू नको ,तसं करू नको ,इथे जाऊ नको तिथे जाऊ नको ...
वाकचातुर्य पणाला लावुन गोड गोड बोलून काम काढून घेतील ,
नकळत आपण चार गोष्टी आपल्या मनांतल्या त्याला सांगतो ...
जीव हलका करतो ,मोकळं वाटतं मनाला ... तो अजून आपलासा वाटतो .....
आपण अजुन गुंतत जातो ,पण असली नाटकी माणसं आपल्या व्यथेचा बाजार मांडतात ...
प्रत्येकाला त्या खास गोष्टी सांगतो ,चार घरातं गोष्टी होतात ,
आपण त्याच्या जवळ बोललेलं गुपित पुन्हा आपल्यापर्यंत पोहचत,
विश्वसाला ,आपलेपणाला तडा जातो ,अन आपण एक नवा धडा शिकतो ...
गोड गोड बोलण्याऱ्या माणसां पासुन सावधान ,सावधान सावधान..
समोरचा व्यक्ती गोड बोलणारा असेल तर आपणही गोड गोड बोलतो ...
उगाच भांडण बिंडणं नको पण समोरचा व्यक्ती गोड बोलला तरी मी का गोड बोलावं?
मला पण राग येतो ना ? मनातल्या मनात राग येतोच ,वाटतं चांगलं झणझणीत बोलावं.,प.ण
आपलाही राग व्यक्त करावा असं फक्त वाटतं हो ,चांगलं खरमरीत बोलावं ,प णण
मूग गिळून स्वस्थ बसतो ,मलाही बोलता येतं ,पण मन माघार घेतं ...https://kittydiaries.com/
आपण ऐकणाऱ्याच्या प्रवर्गातले का असा प्रश्न पडतोच . काय करू ,काय बोलु आता
काय केलाय ह्यानं माझ्यासाठी नेहमी उगाच भांडणं लावतं असतो लोकांमध्ये ...
आपण का नेहमी ह्यांचं ऐकून घ्यायचं ,आपणही बोलायला हवं ,.ओठांवर अपशब्द येतातं ...
असे अपशब्द बोलायचे का ? शांत तरी किती बसायचं ... आपण काही साधुसंत नाही ,,
आपण सामान्य माणुस आपण ,...... का एवढा आव आणायचा कि मला राग येत नाही म्हणुन ,
अरे किती सहन करायचं या माणसाला?......
शब्दाने शब्द वाढतो ,आपलाही पारा जरा चढत जातो ,पण आपण लगेच सावरतो ,
नको राडा ,नको भांडण, जाऊ दे , आपण आपलं माणुसपण जपतो , विचार करतो...
गोड बोलणारे माणसं म्हणजे धोकाचं कि हो ...दूर राहायचं हं ...
विश्वासाने एखादं गुपित सांगतो.. तो गावभर ढिंढोरा पिटतो ..दो गज कि दुरी बनायें रक्खे ...
पुन्हा एक धडा गिरवायचा गोड माणुस सावधान सावधान सावधान
काहीजण स्वभावतःच गोड्ड असतात ... त्यांचं असला गोडुपणा मनाला भावतो ...
मनात असतं ते बाहेर झळकतं ,पारदर्शी स्वभाव .... तोरा मन दर्पण कहलाये ,,
मनातं डॊकावून बघून ,घ्यावं नितळ स्वछ मन ... आरशासारखं स्वछ ...
मनात एक बाहेर एक असं काही दिसत नाही , अंतर्मन बहिर्मन असं नाहीच
जे मनाच्या तळाशी ,तेच ओठांतुन बाहेर पडतं ... .सिंगल युनिट ... ..
.स्वच्छ सुंदर .नितळ मनाची माणसे सहवासात यावी असं वाटतं
त्यांचा जणू परिसकौतुकाची स्पर्श व्हावा आपल्या आयुष्याला असं वाटतं ...
अस्सा गोडु माणुस खरचं हवाहवासा वाटतो ,जणु देवमाणुस ...
अगदी साधुसंत नाहीत पण समोरच्याला समजून घेणारी,उमजुन घेणारी ...
आपलं छोटंसं काम ,पण त्याचंही कौतुक करणारी ..कौतुकाने पाठ थोपटणारी ...
पुढ्यात असणाऱ्या परिस्थितीचं भान ठेऊन ,त्यातुन मार्ग कसा काढायचा ,
असा सहज सल्ला देणारी माणसं,मसलत नं करणारी ,चालती बोलती माणसं
असली माणसं आयुष्यात आली त्यांच्या सान्निध्यात स्वस्थता लाभते . प्रसन्न वाटतं ...
अशा गोड माणसातं देव शोधावा ...दैवयोगानेच अशी माणसे भेटतात ...
आपण आपलं कुटुंबीय त्यांत समरसून जातं ... ऋणानुबंध दृढ होत जातात ..
एक नवीन धडा शिकायला आवडतो ... माणसं वाचायला शिक रे बाबा ....
लेखांकन .... adv अर्चना पवनीकर -गोन्नाडे ARCHANA PAWNIKER -GONNADE...
गोडं माणसं .... समजुन घ्या ......
गोडं माणसं .... समजुन घ्या ...
Related blogs ....
https://diaryofkitty007.blogspot.com/2021/02/blog-post_26.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_9.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_13.html
.
No comments:
Post a Comment