सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना काय काळजी घ्यावी ?
दो गज कि दुरी बनायें रखे
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना काय काळजी घ्यावी ?
दो गज कि दुरी बनायें रखे
काळात गणेश स्थापनेसाठी काय काळजी घ्यावी ?
गणरायाचे वेध लागलेत आता ..
गणराया नेहमीच वाजत गाजत येतो ...
घरोघरी गजाननाचे आगमन होणार ...
सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होणार ...
सर्वत्र प्रसन्न वातावरण ...
रंगरंगोटी , रांगोळी सजावट तोरण मला ,रोषणाई ...
पुजा पाठ ,मंत्रोचार नित्यनेमानी
अथर्वशीश पारायण सामुहिकपणे
बाप्पा आपल्या पाठीशी आहेच सदैव .
त्याच्या आगमनाची सारी काळजी घ्यायलाच हवी आपण ...
यथासांग पूजापाठ ,आरती ,प्रसाद ,नैवद्य सगळं होणारच ...
पण काळजी एकच ... कोरोनाच काय करायचं ?
सगळ्यांना धास्ती आहे मनात ...कस करायचं ?
सरकारी नियमांना अनुसरून आपण आपले सण साजरे करू यात ..
थोडी काळजी प्रत्येकानी घेतली तर आनंदाने सण साजरा होईल ..
https://www.pexels.com/photo/brown-wooden-table-with-candles-and-incense-3822775/
बऱ्याच गणेशोत्सव मंडळांनी थोडक्यात
गणेशोत्सव साजरा करायचा निर्णय घेतलाय ...
कितीही नाही म्हटलं तरी आरती पूजा पाठ प्रसाद होणारच
पण खूप गर्दी होऊ द्यायची नाहीये ...
सगळंच कसं थोडक्यात आटोपशीर करायला हवं
https://www.pexels.com/photo/brown-wooden-table-with-candles-and-incense-3822774/
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना काय काळजी घ्यावी?
१) गणेशस्थापना करायची ती जागा ...
मोकळे पटांगण , कंमिनिटी हॉल ,फ्लॅट ,कॉम्प्लेक्स---
प्रथम जागेची पाहणी करावी ..
साधारण किती लोक त्या जागेत बसू शकतील याचा अंदाज घ्यावा .
सामाजिक अंतर पाळुन किती जण तिथे येतील याचा अंदाज घ्यावा
खुप लोक हो असतात तर बसण्याची व्यवस्था शक्य होणार नाही .
उभ्यानेच ओळीने आरती व दर्शनाची व्यवस्था करावी ...
एक साधारण ले आऊट आखून घ्यावा ...
प्रत्येक रांगेत दोन फुटांवर चोकोन आखून घ्यावेत .
त्या चौकोनातुन रांग पुढे सरकावी ...
दोन्ही बाजुला दोऱ्या बांधुन घ्याव्यात ,
जेणे करून भक्तगण गणरायाचे व्यवस्थित दर्शन घडेल
थोडा वेळ लागेल पण दर्शन सुखकर होईल ...
कोरोनाला टाळता येईल , काळजी दूर होईल ...
दो गज कि दुरी बनायें रखें
२ ) बालकांसाठी वेगळी व्यवस्था ...
बालकांना गर्दीमध्ये नेऊ नये ....
मुलं परंतु आईबाबानं सोबत जायला मुलं हट्ट धरतात.
नाईलाजाने मुलांना न्यावे लागते.
मुलांसाठी थोडी जागा मोकळी ठेवावी ..
दर्शनाला शक्यतो नेऊ नये
स्वयंसेवकांना , मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगावे
आई बाबा वडीलधारी मंडळी दर्शन करून आली कि
मुलांना त्याचेजवळ सोपवावे
तेवढ्या जागेतुन बालकांना बाहेर जाऊ देऊ नये ...
दो गज कि दुरी बनायें रखें
३.) जेष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था ..
ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रम स्थळी न आल्यास उत्तम
घरूनच गणपतीबाप्पाला नमस्कार करावा ..
पण जर दर्शनाची इच्छा असेल तर ----
जेष्ठ नागरिकांची वेगळी व्यवस्था करावी ...
खुर्च्यांची व्यवस्था असावी ... मदतीला काही स्वयंसेवक ठेवावे ..
एक एक करून त्यांना दर्शन करून आणावे ...
रांगेत फार वेळ उभे ठेवू नये ...
दर्शन घेतल्यानंतर आपल्या लगेच घरी निघून जावे
दो गज कि दुरी बनायें रखे .
४.) गणेशाची आरास ,सजावट सगळ्यांनी करावी मिळुन करावी ...
सगळ्यांकडे थोडं फार सजवायचं सामान असतंच ...
थोडं थोडं प्रत्येकानी सामान आणुन सजावट करावी
थोडी फार वर्गणी जमवुन विकत पण आणू शकता ...
थोड्या वर्गणीचा विनियोग एखाद्या आश्रमाला देता यईल तर चांगले .
गणेशोत्सव वर्गणी मधुन करोना काळात गरीब गरजु लोकांना जरूर मदत करावी ..
काम करतांना मास्क वापरायला विसरू नये .
दो गज कि दुरी बनायें रखें.
५) प्रसाद ..
प्रसादच घरीच करावं ..
उगाच बाहेरून मिठाई वगैरे आणून प्रसाद देऊ नये .
गुल फुटाणे ,साखर खोबर , शेंगदाणे
ने असाही काही प्रसाद म्हणून वाटतं येईल .
काजू किसमिस,खजुर असे सुख मेवाही प्रसाद म्हणुन देता येईल
मोदकाचा प्रसाद द्यायचा झाल्यास मोदक घरीच करावेत ..
डाळीचा काकडी चा प्रसाद उत्तम ...
योग्य काळजी ती काळजी घेणे खुप गरजेचे आहे .
दो गज कि दुरी बनायें रखें ...
६) प्रसाद पाकिटबंद करून द्यावा
प्रसादाचे पाकिट एक दोन व्यतींनीच पाकिटबंद करावे किंवा
हातावर प्रसाद देणार असाल तर प्रथम सॅनिटायझर ने हात स्वच्छ करावेत .
त्याशिवाय प्रसाद देऊ नये.
एखादाच स्वयंसेवक या कामासाठी ठेवावा .
खुप सेवकांच्या हातात प्रसाद वाटप देऊ नये ..
दो गज कि दुरी बनायें रखें
७) निर्जंतुकीकरण --- सॅनिटायझेशन
गणरायाची सकाळ सायंकाळी आरती होत असते
आरती पुजेची जागा निर्जंतुक करून घ्यावी ....
दोन्ही वेळेला आरतीच्या अगोदर काळजीपुर्वक .निर्जंतुक करावी.
दो गज कि दुरी बनाये रखें
७) मास्क
मास्क सगळ्यांना बंधनकारक करावा ..
मास्क लावल्याशिवाय आत प्रवेश येऊ देऊ नये ..
लहान थोर सगळ्यांना सारखेच नियम ..
त्यात अजिबात सुट घेऊ नये...
मास्क लावला नसल्यास सरळ घरी पाठवावे ...
८) हॅन्ड सॅनिटायझर
हॅन्ड सॅनिटायझर जवळ ठेवायला सांगावे
मंडळाच्या वर्गणी मधुन हॅन्ड सानिटीझरची व्यवस्था होऊ शकते का ते बघावे ...
अन्यथा भक्तगणांना सॅनिटायझर घरून आणायला सांगावे .
प्रसाद घेण्यापुर्वी सॅनिटायझर दिले तर हात निर्जंतुक होतील ...
कोरोनाचा संसर्ग टाळता येईल .
दो गज कि दुरी बनायें रखें
९) पुजा ,सत्यनारायण
पुजा सत्यनारायण करायचा असेल तर भटजीचे सामान ,
पुजाचे सामान आरतीची थाळी सर्व निर्जंतुक करून घ्यावे..
भटजींना पुजेसाठी नवीन धोतर उपरणं देऊ शकता.
पुजेला बसण्याऱ्या व्यक्तीने मधुन मधुन हात स्वच्छ करून घ्यावेत.
सॅनिटायझर जवळ बाळगावे .
दो गज कि दुरी बनायें रखें
१०) महाप्रसाद ,गोपाळकाला इ
महाप्रसाद टाळावा . गोपाळकाला वगैरे करू नये .
जेवणावळी लावू नयेत.. कोरडा प्रसाद द्यावा
इतकी काळजी घेतलीत तरी कोरोना चा संसर्ग टाळता येईल ..
थोडं थोडक्यात आटोपत घ्यावं ...
गजाननाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहेतच
https://www.pexels.com/photo/silhouette-of-person-in-water-during-sunset-3946868/
श्री गणेशाची .स्थापना करावी ...
दीप ,समई उजळावीत
पुजा अर्चना करावी
अथर्वशीर्षाचे पठाण करावे .
आवर्तने करावीत...
आरती मनोभावे करावी .
प्रसाद ग्रहण करावा..
गणेशाला वंदन करावे ..
हा छोटेखानी उत्सव बाप्पा नक्कीच गोड मानुन घेईल
चिंता नसावी ...
आनंदाच्या उत्साहात गणरायाचे स्वागत करावे .
शुभं भवतु ...
लेखांकन ADV .अर्चना गोन्नाडे
https://www.pexels.com/photo/brass-colored-lord-ganesha-figurine-2280845/
https://www.pexels.com/photo/photo-of-people-standing-in-front-of-ganesha-statue-1707402/
.
No comments:
Post a Comment