मंगलाष्टक -- एक अनुभव
मंगलाष्टक
लग्न ,विवाह म्हम्हणजे एक मांगल्याचा ,सौभाग्याचा क्षण...
हृदयी कायम सनईचे मधुर स्वर जपावेत ,असा क्षण ,
दोन मनं काया वाचे मने सुखाने नांदावेत असा गोडं क्षण ,
दोन कुटुंब ,अन तीन चार पिढ्यांचा तो आभाळमायेचा क्षण ,
कम से कम पांचशें हजार मंडळी तरी लग्नाला जमायची
लगबग ,नवलाई ,लगीनघाई ,दिसतं असते ठायीठायी ....
पण आता असं वाटतं कि कोरोना मुळे सगळं मागे पडलयं ...
सणं समारंभ ,कमी झाले... त ,कोरोना मुळे मर्यादा आली ...
अगदी चं पांच पन्नास जिवाभावाचे जमले कि लग्न ...
असा ट्रेंड सध्या दिसतोय ...
असंच एक कोरोना लग्नाचं निमंत्रण आलं ...
जाऊ कि जाऊ नये या विवंचनेत होते ...
टाळायचं हवं होतंही अन नव्हतंही ...
सख्ख्या मैत्रीणीकडं होतं लग्न ...
मग तिचा कडवा डोज....
यायचं नसेल लग्नाला तर मंगलाष्टक लिहुन दे ..
दोन दिवसांवर लग्न ,पण मी चटकन कबुल केलं ...
घाई खुप झाली मंगलाक्षता रचतांना ..
पण खुप मज्जा वाटली ,मंगलाष्टकांचा अभ्यासही झाला थोडाफार ...
प्रथमाक्षता ---------- विघ्नहर्त्याला नमन ...
व्दितियक्षात---------गुरूंचे स्मरण ....गुरुवंदना
तृतीयाक्षता - --------कुलदैवतांचे पुजन ,स्मरण
चतुर्थाक्षता --------- लग्न कार्याचं चं मंगल वातावरण
पंचमक्षता . ---------चिरंजीव वराचे ,मातृपितृ यांच्या नात्यातील गुंफण..
षष्टाक्षता------------चिरंजीव सौभाग्यवती नववधु चे सुंदर वर्णनं व नवधुचे मातृपितृ .
सप्तमाक्षता ..-----------.नववधुला संसार सुखाचा करायचा मंत्र ...
अष्टमाक्षता ------------ जा मुली जा ,पाठवणी ,साश्रु नयनांनी ..
मंगलाक्षता .... ADV .अर्चना गोन्नाडे ...
मंगलाष्टक रचतांना एक गोष्ट लक्षांत आली ...
नववधुचं गुणगान दोन ओळींत करावं लागलं ...
आयुष्य भर गोडं राहायचं ,गोडं वागायचं ....
सगळ्यांना आपलंसं करायचं ... कठीणचं
एक रोपटं दुसऱ्या जागी लावायचं .. किती कठीण ..
कालवाकालवं झाली अंतरातं ... असो ..
मंगलाष्टकांचा अनुभव मात्र सुंदर राहिला ...
छान सं गिफ्ट ही मिळालं मला , आनंद झाला ...
वधुवरांस शुभाशिर्वाद .....
लेखांकन ----ADV . अर्चना गोन्नाडे
मंगलाष्टक
तारीख २८ जुन २०२०
https://www.pexels.com/video/a-person-wearing-a-wedding-ring-playing-a-piano-4088847/
वर वधु
चि. सम्राट चि. सौ.कां.नताशा
आदिदैवत गजानना गजमुखा सिद्धेश्श्वरा मोरया
आरंभिले शुभकार्य धरी अता ,लंबोदरा ,ज्ञानदा.
आशिर्वचन असु दे अम्हांवर ,श्री शिवपार्वतीनंदना
निर्विघ्न कार्य करी हे अविघ्ना ,कुर्यात सदा मंगलम--१--
गुरुमहिमा अगाध म्हणती ,गुरुमंत्र मनी स्मरितो .
दोन्ही कर जोडुनी मस्तक, हे चरणांवरी ठेवितो .
भवतारक हो नमो गुरुपदा ,नमो गुरुर्र परब्रम्ह.
चित्ती ध्यान धरी सदैव गुरूंचे ,कुर्यात सदा मंगलम --२--
कुलदैवत खंडेश्वर,मार्तण्ड ,उद्गिरकर कुळी.
भंडारा उधळीतो जेजुरी हो , भासे सुवर्णापरी
अंबे मा तुळजाभवानी आई,शोभे ललाटी कुंकुम
राठोड कुळी स्वामिनी बैसली ,कुर्यात सदा मंगलम--३--
दारी पल्लव आम्रतरूचे ,पाऊले शुभंकर रेखिली .
तुलसी समीप दीप उजळला,सौख्याची प्रभा फाकली .
सनईचे सुर मधुर घुमती ,आनंदे भुवन गगन.,
चौघडा झडतो शुभ मंडपी ,कुर्यात सदा मंगलम --४--
श्री लक्ष्मी,शारदा हो वरदा, श्रीवर राजसम्राट"
दशदिशांत उजळतो उजळतो,पितृ राज अरुण
मातृदैवत हृदयी वसे मम, उषादेवी हो स्वर्णीम
उषा-अरुण आशिष देती ,कुर्यात सदा मंगलम --५--
.
नववधु ही कुलिन सुंदर , नताशा सर्वगुणसंपन्न
धीरगंभीर चंद्रकांत धारितो जनकपदाचे भुषण..
जननी रेणुका धरी साऊली,करिते ही औक्षण
कन्यादान सुवर्णक्षण जिवनी,कुर्यात सदा मंगलम ... ६....
भार्या तु ,तुच गृहिणीं ,तुच सचिव सखी
सम्राटा धरूनी हाती ,तु सम्राज्ञी संसारी
वचनें ही सप्तपदीची उजळावी परी अंतरी
कन्यका दुहिता जगा उद्धरी,कुर्यात सदा मंगलम--७--
वरमाला घेऊनी अधीरमनी, गौऱीहरा पुजिती
आली संत्वर लग्नघटिका , ओवाळु$ पंचारती
साश्रु नयने असे कुलवधु ,शुभलक्ष्मी पतिगृही
कन्या नववधु जाय श्वशुरी ,कुर्यात सदा मंगलम --८--
शुभमंगल सावधान
तदेव लग्नम सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव
श्रीकृष्ण नाथं शरणं भवामी
सुमुहुर्त सावधान ,शुभमंगल सावधान
अक्षराक्षता by ---ADV. अर्चना गोन्नाडे

Khuach chaan aaye
ReplyDeleteTHANK YOU KULKARNI .... YOUR PRECIOUS COMMENT INSPIRES ME ... THANKS
ReplyDelete