MENSTRAL CUPS ...
Silicone Magic
अगं आई ,बघ आजकाल किती सुसह्य झालायं मेन्स्ट्रल पिरियड्स ...
काहीचं झंझट राहिली नाही आता .. अगदी आराम चार दिवस
कसं काय ? म्हणजे काय .. काही सांगशील का ?
अगं पण आता तुला उपयोगाचं नाही सांगुन .. ..
अगं तु सांग तर ,मला उपयोग नाही ते खरयं https://kittydiaries.com/
पण मला कुणाला शेअर करता येईल ,सांगता येईल ... बोलता येईल ..
त्यांना तर उपयॊग होईल ना ,त्यांना तर समजेल ना ...
मुलींनी आई जवळ शेअर केलेल हे मॅजिक ,तुम्हाला सांगत्ये..
पण त्या आधी थोडं मागे वळून बघू या का ?
मासिक पाळी ... स्त्रीत्वाचा अलंकार
पहिली बेटी धनाची पेटी ... जन्मतःच मुलीचं स्वागत केल्या जातं ...
खरंच आनंद होतो लेक झाली की ... छोटी छोटी पावलं टाकतं लेक मोठी होते ..
शरीर आकार घ्यायला लागते ... लेक फुलून येतं ...
यौवनातं पदार्पण होते ,लेक सुंदर दिसायला लागते ..
आई डोळ्यातं तेल घालुन लेकीची काळजी वाहत असते ...
बाप ही त्याची ही हिरकणी जपुन असतो ... कुणाची नजर नं पडो ..
स्त्रीत्वाचं देणं असतं ते निसर्गदत्त ... मुलगी वयात येते ..
लेकीला ऋतुचक्र सुरु झालं ... काळजी वाढली आईबापाची ..
काय काय सोसावं लागतं हो ह्या मासिक ऋतुचक्रातं ...
पोटातला शुळ अस्सा कि गडबडा लोळायला होतं
मग गरम पाण्याच्या बॉटल ,पिशवी यांचा शेक ...
बरंच नाही वाटलं तर अजून गोळ्या घ्या ... गोळ्या घ्यायलाही मनाई ...
पुढे आई होतांना दुष्परिणाम नको व्हायला ... असा सगळं खडतर प्रवास ..
खरी गोची व्हायची ती अंतर्वस्त्र बदलायची ...
सुरवातीला आईच्या साड्यांचे नरम कपडे वापरायचे पॅड म्हणुन ...
किंवा जाड टर्किश टॉवेल छोटे तुकडे कापुन पॅड म्हणून वापरायचे ..
प्रत्येक वेळेला ते स्वच्छ धुऊन उन्हातं वळवून ठेऊन पुढच्या वेळेला वापरायचे ..
वाळायला उन्हातं टाकायचे म्हणजे कुठल्या साडीखाली किंवा त्यावर परत कापड झाकायचे ..
इतकी लाज , तीन दिवस घरातं वावरायचे नाही ..आंतल्या खोलींत गपगुमानं बसायचं
तीन दिवसांनी मग डोक्यावरून स्वच्छ न्हाणं ...
मग सुटका पुढच्या पाळीपर्यंत .. अठ्ठावीस दिवस आराम ...
देवचं आठवायचा ..पांडुरंगा युगे अठ्ठावीस उभा ..
हे सारं ज्या पिढीने सोसलयं त्यांनाचं त्याची कल्पना ..
काळानुरूप बदल घडतं गेलेतं ... सुधारणा झाल्यातं ...
लैंगिक शिक्षण, शिक्षणाचा भाग झालं ... मुलगा मुलगी भेद सरला ..
मासिक पाळीच्या दिवसांचे ,स्वास्थ्य विषयक दृष्टिकोनातुनं विचार समोर आला ..
दृकश्राव्य माध्यम आलं ..दुरसंचार संच आले ... घराघरातनं ..
केयर फ्री च्या जाहिराती टीव्ही वर दिसु लागल्या ...https://kittydiaries.com/
आई बहिणी आतं निघून जायच्या जाहिरात लागली की ...
नको त्या गोष्टी पुरुषांसमोर बघायला .. लाज वाटायची ...
महाग पडायच्या पॅड घ्यायला ... पण बऱ्याच जणी आता त्या वापरायला लागल्या
स्वच्छ ,सहज वापरायला सोपे ,वापरल्यावर टाकून द्यायचे .. पुन्हा नवे ..
धुण्या वाळवण्यापासून सुटका झाली ..स्वच्छतेचे धडे दिले , आरोग्य राखल्या गेलं ..
मग त्यांनंतर जेल पॅड आलेत .. डाग पडायची भीती नाही , सहज सोपे ...
तरी पण पॅड बदलायला लागायचं तीन चार तासांमध्ये.. जडपणा जाणवायचा .
व्हिस्पर ,@ whisper स्टेफ्री@ stayfree ,सारखे नवनवीन ब्रँड आलेत ..
महिलांचं जगणं-- चार दिवसांचं सुखकर झालं ...
एक पाऊल पुढें ,स्त्रिया टेम्पून्स वापरायला शिकल्या ... पण फार स्त्रियांनी ते वापरलं नाहींच ..
काहींना त्रासदायक वाटायचं ते वापरायला ,अन भितीही ... .
पण आतां तर मॅजिक गोष्ट आहे ..मॅजिक घडलयं ....
आता तर सॅनिटरी पॅड्स पासुन सुटकाचं झालीय .. नको ते पॅड्स पण आता .
MENUSTRAL कप्स .. नवीन आहे काहीसं ..
कदाचित नोकरी करण्याऱ्या स्त्रीयांना माहित असेल ही,
पण अजुनही माहित नाही ह्या बद्दल स्त्रियांना ...https://kittydiaries.com/
मेन्स्ट्रुल कप्स जादू आहे मॅजिक आहे ... चार दिवसांचं दुःखं जणु जाणवु नं देणारा ...
केव्हा निघून गेलेतं चार दिवस असं कळणारं ही ..
सिलिकॉन कॅप्स ह्या नावाने पण हा प्रॉडक्ट मिळतो ..
छोट्याश्या कप सारखं असणारी हि वस्तु ,त्या जागेमध्ये (CERVIX )फिट्ट बसते ...
सिलिकॉन कप्स रक्तस्त्राव शोषुन घेतं अनती जागा लॉक होते ,एक थेंब इकडे तिकडे होत नाही ..
दहा बारा तास काही त्रास नाही ...चढउतार करा ,धावाधाव करा ..व्यायाम करा
हे कप्स असं म्हणा ना कि स्किन फ्रेंडली आहेत ... शरीराचा एक भाग होऊन जातात
पुन्हा ते धुऊन ठेवलं तर पुन्हा वापरता येतातं ... आपली इच्छा पुन्हा वापरायचे किंवा नाही ..
एकदा घेतले की कमीतकमी पांच वर्षपर्यंत वापरता येतातं ...सॅनिटरी पॅड्स पेक्षा खर्च कमी
लहान मोठ्या साईझ मध्ये हे उपलब्ध असतात ..आपल्याला योग्य असा निवडता येतो .. .
पुनःसिलिकॉन कप्स वापरण्याचे दुष्परिणाम काही नाहीत असं शास्त्रीयदृष्टया सिद्ध झालायं ..
पण वापरण्यापुर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य ध्यावा .. कसा वापरतातं ते समजून घ्यावे ...
एकदा वापरायला सुरवात केली तर मग काही अडचण नाही ...
खरंच मॅजिक आहे मेन्स्ट्रल कप्स , सिलिकॉन कप्स ,असं इतकं सोप्प झालाय आता ...
आताच्या मुलींसाठी ,स्त्रियांसाठी तर हे वरदान चं आहे ...
काळ बदलतो आहे .. आपणही बदलायला हवं ... नवीन बदल स्वीकारायला हवेत ...
आईच्च्या साडीपासुन बनविलेले सॅनिटरी पॅड्स ते प्रॉडक्ट नवीन सिलिकॉन कप्स...
स्त्रित्वाचा मोठा पल्ला अनुभवलायं स्त्रियांनी .. खुप कळा सोसल्यातं .झळा सोसल्यांत ..
आता घ्या नवा अनुभव सिलिसिन कप्स ,मेन्स्ट्रल कप्स वापरून ...
@Sirona Reuseble ,@ Sanafi Resuseble,@Nirogam WeMense असे काही ब्रँड आहेत ...
आहे ना मॅजिक ... नवीन पिढीची ..ते चार दिवस पण आता आनंदानी जगायचे ...
ही पोस्ट आपल्या ताईमाई ला , बहिणी ना ,मैत्रिणींना शेअर करा ..
तुमच्या ओळखीतल्या , ज्यांची तुम्हाला काळजी आहे अशा व्यक्तींना शेअर करा ..
एक सामाजिक बांधिलकी म्हणुन ...
महिला दिनाच्या २०२१ खुप खुप शुभेच्छा..https://diaryofkitty007.blogspot.com/
लेखांकन --- ADV .अर्चना गोन्नाडे
ARCHANA GONNADEhttps://diaryofkitty007.blogspot.com
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/12/a-table-of-two.html
👌👍Well said.! Nice article.!
ReplyDelete