झुलते गर्भारपण ....
वैष्णवी कोपरकर ----आई मी होणारं गं ......
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7365972984366991"
crossorigin="anonymous"></script>
आज घरातं सकाळ पासुनचं लगबग चालली होती .
नित्यनेमानं होणारी काम आज जरा लवकरचं होतं आली ...
घरची झाडलोट झाली फारशी पुसून झाली ...
फ्लॅट संस्कृती आल्यापासून सडासंमार्जन शब्द मागे पडलाय ..
रेखीव रांगोळी दारासमोर रेखली ...स्वस्तिक ,पावलं रेखाटून झालीत ..
खूप दिवसांनी आज सुंदर रंग भरले त्यांत ,दाराला तोरण लागलं आम्रपर्णचं ...
देवपुजा झाली ...देवघर विविधरंगी फुलांनी सुंदर दिसत होत ...
आज आज आज खासचं कारण होतं ...
वैष्णवीचा चा आज नवव्या महिन्याचा पाळणा होता ... गोदभराई
आठवा महिना पुर्ण होऊन नववा लागला होता ...
नववा महिना आई कडुन,साजरपण
लेकीचं ,माहेरची साडी चोळी आईकडुन
सगळी तयारी आदल्या रात्रीपर्यंत झालीच होती ...
हिरवी साडी ,बांगड्या ,हार फुल वेणी ,गजरा ,मेवा ,मिठाई ,सुका मे ,
सगळ ठेवायला तबक , टेबलक्लाथ ,फळं झाकल्याला रुमाल नक्षीदार ..
सारं सामान अगोदरच काढून ठेवलं होत ,ऐन वेळेला शोधाशोध नको ..
पाळणा पुण्यांमध्ये ,वैष्णवीच्या घरी करायचे ठरले होते ..
कारणं कोरोना मुळे वैष्णवीला नागपूरला यायला जमणार नव्हतं ..
मलाच पुण्याला ला यावं लागलं ,,,, आम्ही दोघंही दोन महिने मुक्कामाला पुण्याला ..
आईबाबा सोबत आहेत म्हणुन तीही निश्चिन्त होती ..
स्वयंपाक करायचा होता रोजच्या स्वयंपाकापेक्षा चार पदार्थ अजुन जास्त ...
वडे पुरणं कोशिंबीरी ,चटण्या ... सुंदर पान सजवलं ....नैवेद्याचं पान वाढलं ..
गर्भधारणा झाल्याचा आनंद ,आई होण्याचा आनंद काही विरळाच ...
असे भाग्याचे क्षण स्त्रीच्या आयुष्याला पुर्णत्व देतातं ...
एका स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यातं मोठा आनंद असतो तो आई होण्याचा ..
नऊ महिने बाळाला पोटांत झुलवयाचं ....किती कठीण
देहाचा एक भाग ते होऊन बसतं ...नकळत .
देह देवाचे मंदिर असं प्रत्यक्ष अनुभवावं ते गर्भारशी स्त्रीनेंच
देह आईचा आणि आई चा आत्मा म्हणजे ते गर्भातं वाढतं असलेलं बाळ ..
आईचा जणु आत्माचं, ते बाळ म्हणजे ...ईश्वराचं अस्तित्व
आ म्हणजे आई आणि ई म्हणजे ईश्वर ...संतवचन आहे
दोन जीवांमधुन तिसरा जीव निर्माण होणं ... पुन्हा ईश्वराचं अस्तित्व
ईश्वर कृपेने सारं घडतं असतं . आशीर्वाद असतात ..
.विज्ञानानं कितीही प्रगती गेलं तरी प्राण मात्र विधात्यालाचं फुंकावे लागतातं ...
रंग रूप रस गंध सारं विध्यात्याने साकारलेलं ... नवजात बाळासाठी ... असो
आजच्या स्वयंपाकाचा विशेष भाग म्हणजे पाच प्रकारच्या खिरी ...
समिक्षा ,वैष्णवीच्या मैत्रिणीनं आणुन दिल्या
,तिची आत्या करतं असतें त्या खिर्या ..
मोठया कलात्मकतेनं खिरी कराव्या लागतात , ...
गव्हले, नखुल्या ,मालत्या,बोटवे ,फेनुल्या ..
नावं गमतीदार,छोटी छोटी आणि खिरी पण..
सुबक ,सुरेख जणु सुंदर सुंदर कणीदार मणीदार मोतीचं ...
हातांनी सपट्याला दाब देऊन ,करता करता बोटं दुखायला लागतात
पण सवयच असतें ना करायची ... मग नाही दुखतं ती ...
कारणं त्यामागे सद्भावना असते ती करण्याऱ्यांची ...
हे गोडधोड म्हणजे आईच्या गर्भात असलेल्या बाळाचा घास कि हो ...
साक्षात ईश्वराला भरवतोय आपण ... सुंदर सुबक सुग्रास असचं हवं ना सारं ...
मन लावुन एक एक खिरी ती घडवीत असते ... मग काहीच कुठं दुखत नाही ...
अशा सुंदर खिरी समीक्षांनं आणुन दिल्या तिचं खरंच कौतुक वाटलं ..
कोरोना असल्यामुळे मोजकेचं नातेवाईक हॊतें ..
हिरव्या साडी मध्ये वैष्णवी सुंदर दिसत होती संदेश नं ही झब्बा कुर्ता घातला होता ...
समोरच्या टेबलवर सारं सामान ओळीनं मांडलं ... पानाभोवती रांगोळी घातली
फुलाफुलांनी टेबल सजवला ... औक्षण करायची निरांजन ,थाळी सगळं सजलं ..
रंगीत फुलांनी खुर्ची सजवलेली ,पाळणा आजकाल शक्यतोवर उपलब्ध नसतो .
तुपाचं निरांजन उजळलं औक्षण,केलं वैष्णवी अन संदेश च ,आतं असलेल्या बाळाचं ...
मुळातच आपली भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आहे ..गाणे बजावणे झालेत ..
कां असावेतं ह्या प्रथा ,परंपरा ? नवव्या महिन्यातं बाळाची वाढ पुर्ण झाली असते का ?
स्त्री ला ह्या काळांत प्रसन्न ठेवावं ,काही रुसवे फुगवे होऊ नये
अशीच इच्छा असावी साऱ्यांची.. म्हणून हा आनंदसोहळा .
होणारी आई प्रसन्न असली म्हणजेचं ती प्रसन्नता बाळापर्यंत आपसूकचं पोचते ...
आई प्रसन्न ,बाळ आतल्याआतं प्रसन्न ,सभोवताली प्रसन्न वातावरण ...
एकंदरीत सारा आनंद भारलेला दशदिशा मध्ये ... हाच आनंद बाळ नाळेतुन शोषुन घेतं ...
आणि बाळ येतांना सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतं ...आईबाबांची सृष्टी बहरून जाते ...
छोट्या बाळाचं किती कौतुक होणार ..सगळे आतुरतेने वाट बघत असतात ..
छोटे छोटे समारंभ ,सणही आपल्याकडे उत्साहाने साजरे होतात ...
सणं,संस्कार, संस्कृती ,हात घालुन चालत असतात आणि आपलं जीवन समृद्ध होतं ..
आपलं जीवन ही रसपूर्ण होतं ..बाळाच्या रंगात सारें दंग होऊन जातात ..
येणारं बाळं मुलगी कि मुलगा हा मोठ्या औत्सुक्याचा विषय ...
मग पेढा कि बर्फी खेळ सुरु होतो .... पेढा मुलाचा आणि बर्फी मुलगी ..दोघंही तितकेच गोडं ..
मुलगा मुलगी भेदभाव नको ....पण हा खेळ म्हणजे आनंदाचा भाग .
बर्फी ,पेढे यांचे गिफ्ट बॉक्स करून ठेवलं होतेच ...
मग काय ... डोळे बंद करून एक बॉक्स वैष्णवीनं उचलला ..
कुठला ? ते गुपित आहे हं ...मी कळवणारं आहे तस्स ..
समोर आरास मांडलेल्या मेवा मिठाई चा आस्वाद घेणं चाललं होतं ..
मन भरून आलं ,तृप्त झालं ,तृप्तीचा आनंद आगळा वेगळचं ..
सारं सुखरूप पार पडु दे ... देवाला साकडं घातलं .. हात जोडले ..
वैष्णवी बाळाला पोटांतं आतं झुलवतं होती अन हसतं होती ...
अग आई बाळ लात मारतयं म्हणुन एकीकडे रडतही होती ...
इतकं सोप्प नसतं आई होणं ... काळजी घ्या ..कळवते काय झालं ते ... ह्ह्ह्ह
शुभमं भवतु
अर्चना गोन्नाडे नागपूर .. २० ऑक्टो २०२१
झुलते गर्भारपण ....
झुलते गर्भारपण ....
इतर संदर्भ ....
खालील लिंक क्लिक करा
like share comment subscribe my channel Dear friends https://youtube.com/user/MANMIND123
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_17.html-----नवरात्री १
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_18.html---नवरात्री-२
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_19.html---- NAVRATRI ---3
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_20.html----navratri ४
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_21.html ----navratri---५
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_22.html ----naratri ---6
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_23.html---navratri---7
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_24.html ---navrari 8