Follow Us @soratemplates

Saturday 11 July 2020

तो अन ती अन सागरी किनारा ...

तो अन ती अन सागरी किनारा ...  
 Couple Sitting Holding Paper Lamp-Couple Standing on Heart Boat on Body of Water-------------------------------------------------------------------------Two Person Sitting on Bench----------------------------
Brown Boat

तो अन ती अन सागरी किनारा ...  
सागरी किनारा आहे ...
हवेत सुंदर गारवा आहे ... 
शिरशिरणारी कंचनकाया ... 
अंगोपांगी फुलली आहे ... 
नावेतं दोघे जण ... 
तो आणि ती .. 
वरून रिमझिमता पाऊस .. 
मग काय,
आनंदाला उधाण येणारचं ...
मनमयुर थाथै थाथै नाचणारचं 
मनाला का कुठला पास लागतो का ...
त्याला कुठे परवानगी लागते का... 
डोलायचं ,झुलायचं मनाला ... 
कुठे मन विचारतं का कुणाला...
मनमस्त मस्त बेधुंद ...  
रिमझिम पावसांत ती दोघचं,नावेमध्ये.. 
नावेच्या काठांवरून जरा वाकुन                                              पाणी उडवतात आहेत,एकमेकांवर
तुषारांचा तो अबोध  खेळ ... 
रिमझिम पावसात तो आनंद ...
अवर्णनीय, अहाहा काय वर्णावा ..  
खेळकर ,खोडकर ,त्यांचा उल्लास , 
खळखळुन हसणं त्यांचं ..  
टिपटिपण्याऱ्या नादातं,नाजुकसं,   
हळुवार येतयं ऐकायला....  
सुहास्यवदना,प्रफुल्लीत,
लोभसं,ती गोडं छोकरी 
तो विचारतोय,खुणेनंच,संकेतानं 
कुठलं गीत गाऊ तुझ्यासाठी ?  
खर्रच गाणं येतंय मनांत ... 
गावंसं वाटतयं खुप छानसं ... 
हुळहुळणारं रिमझिम गाणं...   
टिपटिप पावसाच्या तालावर .. 
तो गोडं छोकरा ही ताल धरतो , 
हुं हुं हुं हुं तिची पण गुणगुण ...
अधिरं अधिरलं  मनं 
गाणं मनातच असतं ...
थोड्डी फुंकर घालावी लागते...
गाणं गाणं होऊन जातं ...  
तो आणि ती, बेभान ते गाणं   
सहज सुंदर गाणं ,सहज सुंदर बोल,
मनाला खुपचं भावतात ... 
अंतरंगांत सरळ उतरतात ..
कुठे आडोसा नको,परदा नको 
खुल्लमखुल्ला ,सहज सुन्दर ...
दोघांचाही खट्याळपणा ...
हवाहवासा,गुदगुल्या करणारा....
खुद्कन गालांवर खळी पडणारा.... 
अन एकटक डोळे भरून बघणारा ....
हृदयांत तिच्या आपलं रूप साठणारा      
तो अन ती अन सागरी किनारा ...

Red Blue and White Fishing Boats on Dock during Daytime
तो  नि ती,रंगीत गुलाबी दिवस...  
अल्लड्पणा अत्ता उमलतोय....  
प्रेम असंच जडतं... असंच स्फुरतं ...
गाणं असंच प्रतिबिंबीत होतं .. 
सागरी किनाऱ्यावर,होडी वल्लव्हतांना...
झिरमिर पाऊस जसा सजलायं ..
इंद्रधनुचे रंग  लेवून ... 
थेंबाथेंबातुन तेजस्वी  प्रकाश किरणं...
परावर्तीत होतात ...
सुवर्णासमान भासतात....
वाळुमध्ये चमचमणारी अभ्रकं  .. 
चंदेरी चांदी  समान दिसतातं ...
निसर्गाचे ही गुलाबी दिवस... 
सारं कसं रंगरंगीन भासतेयं  ...
खुल्लमखुल्ला ती ही प्रणयोत्सुक...
निसर्ग नियमांचं सगळ्यांना बंधनं ..
अवनी पासून ते अंबरापर्यंत ...
सारं ही एकरूप झालयं,ताद्यात्म्य पावलंय...     
सृष्टीही अल्लड झालीय..
तीही उमलतेय इवली इवली ...
पाऊस पाऊस करतेंय  ती ही ...... 
तिचं ही नृत्य थाथै थाथै थाथै  
तिचा ही सखा आलायं...
बिलगुन आहे सृष्टी सृजनाला ...
पावसाच्या तुषारांनी 
ती  झालीय आनंदविभोर ...... 
गुलाबी झालीय लाली आलीय ...
सृष्टी हळुवार कणाकणांनी फुलतेयं 
सृष्टी ही झालीय  गुल्लाबी ...
स्वप्नझुला झुलतोयं अंगांगात ... 
तो अन ती , सृष्टी अन वृष्टी 
चक्र पुर्ण झालायं ,रिंगण पुर्ण झालयं ...
सृष्टी अन वृष्टी अन भवसागर किनारा....
रचना---- एड .अर्चना  गोन्नाडे
https://www.pexels.com/video/cluster-of-islands-on-the-shallow-water-of-the-sea-3173449/
https://www.pexels.com/video/sunset-by-the-sea-857056/
Man and Woman Walks Beside Green Sea




 2 Person on Boat Sailing in Clear Water during Sunset



... 








    

  














  







,








































No comments:

Post a Comment