Follow Us @soratemplates

Monday 20 July 2020

चातकाची काय मजालं

 चातकाची काय मजालं -----
Water Drop at the Tip of a Leaf
Blue and Green Peacock on GrassWoman in White Shirt With Green Background

Peacock Closeup Photography
चातकाची काय मजालं 

पाऊस तो आजही मनामध्ये आठवतोय 
पाऊस तोच आजही मनांतुन झंकारतोय 
तरंग  पुन्हा  तेच ते  अंतरंगी नांदतोय 
स्पर्श तेच नव्याने मीच पुन्हा उजळतोय

 मीच ओलेती पुन्हा पावसात निथळतेयं 
हसुन मी पुन्हा पुन्हा पाऊसपाणी झेलतेयं 
पावसाची कोपरखळी  गाली बघा ओघळतेयं 
पाऊस तोच नव्याने पुनःकिती गहिंवरतोयं 


पाऊस अताशा हाय लक्ष्मण रेषा रेखतोयं 
रेष रेषा ओढुनी पुन्हा बघा खुणावतोयं ... 
मनी  बघा कसा पुन्हा मन मयुर डोलतोयं 
लक्ष लक्ष दीप पुनः पाऊलखुणा शोधतोयं 

पाऊसाचे रंगढंग सारेच मीच  जाणतोयं 
रंग ढंग सोसुनी मी पाऊसात पोळलोयं 
पुनःश्च ते रंग ते  ढंग कणकण वेचतोयं 
वेचल्या पाऊसात पुन्हा मधुशाला स्पर्शतोय... ..

  
पाऊस तोच मी पुनः पिऊन पिऊन झिंगतोयं 
सुखावल्या गारव्यात पुन्हा आकंठ  मी  डुंबतोयं 
चातकाची काय मजाल हर मृगात तृप्ततोयं...   
नक्षत्रांच्या नीरधारांतं पुनः उभा जन्म जाळतोयं ... 

रचियता ---एड अर्चना गोन्नाडे 


Woman Using Umbrella With Lights









 
 







 



 
... 





 

1 comment: