बी कॅलक्युलेटीव्ह-----असं जगता तें येतं का ?
बी कॅलक्युलेटीव्ह-----असं जगता तें येतं का ?
आयुष्य हे एक कोडंचं वाटतं मला....
असं कोड्यातच सारं आयुष्य जगायचं का ?
खुप सारे प्रश्न यावे लागतात जीवन फुलवायला ...
खूप प्रश्न असतात अनुत्तरित ...
कायम कोड्यात टाकणारे ...
इतकं सारं सोप्प नाही जीवन ..
परंतु आपण जाणतो तितकं कठीणही नाही ...
एक जीव जन्माला नाती ही जन्मतात ..
आयुष्याच्या वळणावर किती लोकं भेटतांत ...
जीवन प्रवासात कितीसे लोकं लक्षात राहतात....
कोणी किती लाडवलं ,कुणी किती कौतुक केलं .
कुणी मला साथ दिली ,कुणी दिली नाही ..
कुणी किती अपशब्द बोलले , कुणी किती श्राप दिले...
कुणी मान दिला ,कणी अपमान केला ..
किती वाद झालेत ,किती संवाद साधलेत ...
मनातुंनं मनासारखं, जगायला जमेल का?
सुखसंवाद नात्यातला जवळ आणेल का ?
आयुष्य जमेल का असं जगायला?
आयुष्य वाटतं फार कॅलक्युलेटिव्ह झालायं ...
हे त्याला मिळालं ,मला पण हवंच ...
त्याला ते मिळालं .मला पण हवंच ...
हा कसला अट्टाहास .हा कसलं हव्यास
बरोबरी करण्याचा , चढाओढ करण्याचा...
आयुष्य छोटं आहे ,सुंदर करायचंय ...
छोटया छोटयाश्या कृती मधुन आनंद पेरायचायं
आपल्या कृती मधुनचं अमृतधुन उमटायला हवी..
संवादाची माया जपायला हवी ...
पाप किंवा पुण्याचा प्रश्न नाही ...
सुखदुःखाचा ओझं वाहायचं आहेच ..
पण आपल्या माणसांची साथ असेल तर ...
दुःखाच्या झळा जाणवतं नाहीत ,कमी होतात
सुख ऐसपैस अन शतगुणित होतं, वाटतांना..
हाताचं काय राखायचं ,काय धरायचं... गणितासारखं
सारेच कसे गणितज्ञ वाटतात मला .... .
आयुष्य वाटतं फारचं कॅलक्युलेटिव्ह झालायं....
गणितं फार समजुन घेतलं तर समजत...
अन्यथा नाही ,नाही समजलं तर
गुंता अधिकच वाढत जातो ..
गुंता अधिकच वाढत जातो ..
अन उत्तर येतं नाही ,
आलं तर चुकलेलं असतं ....
कुठं मांडणी चुकली असते ..
कुठे सुत्र चुकली असतात...
कुठे नजरचुक झाली असते
अधिकच्या जागेवर उणे जाऊन बसते ..
उणे करायचे तिथे अधिक हौसली असते ...
आलं तर चुकलेलं असतं ....
कुठं मांडणी चुकली असते ..
कुठे सुत्र चुकली असतात...
कुठे नजरचुक झाली असते
अधिकच्या जागेवर उणे जाऊन बसते ..
उणे करायचे तिथे अधिक हौसली असते ...
उणे अधिक करता करता काहीच कळतं नाही....
गणिताचे फासे काही पदरांत पडत नाही ...
गुणाकार कुठं असावा ,नात्यामध्ये प्रेमामध्ये ....
किती पटींनी वाढवायचा हे आपल्या हातात असते .
कितीही प्रयत्न केला तरी नेहमी भागाकारच दिसतो ...
एक तुकडा मला ठेव ,एक तुकडा तुला ठेव ...
अशीच काटाकाट विभागणी होते ....
जन्मदाते मायबाप ह्यातुन सुटले का वाटतात?
आईबाबा ,भाऊबहिण ,सख्खी नाती दुरावतात....
गुणाकार लपंडाव चा खेळ मांडतो ..
भागाकार पटकन पुढे होतो ...
चटकन घाव घालुन जातो, हलुन जातो...
जगुन काय करणार खुप खुप आयुष्य
आयुष्य देवा छोटं दे ,सुंदर दे ..
आयुष्याला अर्थ दे .... .
आयुष्य वाटतं फारचं कॅलक्युलेटिव्ह झालायं ....
बी कॅलक्युलेटीव्ह-----असं जगता तें येतं का ?
लेखांकन ...ADv . अर्चना गोन्नाडे
No comments:
Post a Comment