पर्जन्य बीज .. पर्जन्य बीज ..
---------------------------------------------------------
नेमेचि येतो मग पावसाळा ...
ऋतुचक्र फिरत असतं,फिरतं असतं ...
नावीन्य लेवुन ऋतुं येतं असतो...
पर्जन्य,पावसाळा साऱ्यांच्या प्रेमाचा...
उन्हाळ्याच्या झळा सोसुन सारे हैराण झालेत ...
वणव्या सारखं जणु पेटत होतं ...
अग्निवृक्षच चौफेर फुलला होता ..
दाहिदिशांतं आदित्यराज राज्य करत होता ...
पण दिसनंदिस तीच प्रतीक्षा ,किती वाट पाहायची ..
येणार कसा पाऊस ...?
पाऊस असा काही एकदम पडत नाही ...
पाउसाचीही मशागत करावी लागते ...
बीज पेरंल तर झाडं उगवणार ...
जसं बीजॅ तसं झाडं ...
पण कुठल्याश्या भुमीमध्ये ते रुजतं ...
आणि गर्भारलं बीज अंकुरतं ...
मशागत आणि संवर्धन खुप महत्वाचं ...
जमीन तयार करा ,मशागत करा ..
बीज रुजवा ,संवर्धन करा संरक्षण करा
वाढावा ... फळे फुले वाटा ,गोडं गोडं करा
पावसाचं बीज पण असंच पेरावं लागतं...
पावसाचाही बीज असतं ,
त्याशिवाय का तो वाऱ्यावर झुलतो फुलतो
इवलाले बीज जेव्हा बळीराजा पेरतो ...
बळीराजा रोज त्यांचं सिंचन करतो ...
प्राणवायु मिळावा बीजांना म्हणुन ...
खुरपणी करतो ...आळ धरतो त्याभोवती ..
सुंदर सुर्यप्रकाशातं झाड चमचमतं ...
जशी बाळाची काळजी घेतो तसं
तशीच काळजी असते ,शेतातल्या उभ्या पिकाची ..
डोळ्यातं तेल घालुन संवर्धन करतो ,रक्षण करतो ...
फुलं फळांवर पीक आला कि त्याच्या आनंदाला पारावार नाही ...
हो है ,हो है म्हणुन गीत आळवायला लागतो ..गातो .
निसर्गाचं दान पदरांत घेतो ..
तृप्त होतो ...
ऍड .अर्चना गोन्नाडे https://www.pexels.com/video/children-playing-in-a-park-getting-wet-by-the-rain-3111798/
पावसाचं बीज
धो धो पाऊस कोसळतो...
डोंगरं दऱ्यावर पाऊस कोसळतो ...
डोंगराचे पार छिलके उडतात ..
तोडून फोडून टाकतो पाऊस दगडालाही ..
पार ठिकऱ्या ठिकऱ्या उडवतो
पाऊसचं पाणी ,वळणावळणांनी
नदी नदी मध्ये वाहत येते पाणी .....
पाण्यामध्ये सारे जीवनसत्व घेऊन नदी धावत असते ...
बीज अंकुरण्या करीता सारे पोषणमुल्य असतात त्यात....
पत्थरातील सत्व पाण्यांत झेपावते ..
धरणीमाय सगळं पाणी रिचवुन घेते ..
तिच अमृतधारा बीजाला सिंचन करते ...
बीज गर्भरते अन अंकुरते ...
इवलेसे रोपटे लावियले द्वारीं
तयाचा वेलू गेला गगनावरी ....
छोटसं रोप , मोठ्ठ झालं ,फळाफुलांनी समृद्ध झालं
संवर्धन आणि संरक्षण बीज पेरण्यार्यांनी करायचं ...
मग फळाफुलांच मालिक तोच ... एकमेव ...
सार्थक झालं श्रमाचं त्याच्या ...
श्रमाचं बीज जास्त ओजस्वी तेजस्वी ...
अन दिमाखात मिरवत ..
पुन्हा सहस्ररश्मी तापणार ..
पानफ़ुलं झाडंझुडपं सारेच कोमेजणार...
नदी नाले आटणार , सृष्टी करडी होणार ...
वारा ही तप्त ज्वाळा घेऊन वाहणार ...
गर्भारलेली धरा पुनश्च्य रिती होणार ...
कोरड्या मनांवर ओरखडे उठणारं ...
अतृप्तेचं प्याला घेऊन ,वेदानेची ज्वाला घेऊन
अगतिक धरा पुन्हा वाट बघणार ,..
आपल्या प्राणसख्याची...जिवाभावाची
प्रियजनांची काळजी वाहायला
आनंदघन बरसल्याचं हवेत ...
सुर आसमंती निनादायलाचं हवेत ...
पावसाचं ,पर्जन्याच बीज काठोकाठ भरायला हवं ..
लेखांकन-----ऍड .अर्चना गोन्नाडे ऍड .अर्चना गोन्नाडे
.
No comments:
Post a Comment