Follow Us @soratemplates

Sunday, 7 June 2020

वटपौर्णिमा ////वटसावित्री व्रत

Green Tree Photo
वटपौर्णिमा  ////वटसावित्री व्रत 



Low-angle Shot Photography of Green Treesवटपौर्णिमा
वटसावित्री व्रत 
             वटपौर्णिमा
वटसावित्री व्रत 
 वटपौर्णिमा
वटपौर्णिमा Bare Tree on Grass Field













वटपौर्णिमा///वटसावित्री व्रत 
आषाढस्य प्रथम दिवसे , कालिदासाची एक उक्ती ,
मेघदूत कालिदासाचं एक अजरामर काव्य ...
आषाढाच्या प्रथम दिनी ,आपण कालीदासाला स्मरतो ...
संस्कृत साहित्य आणि कालिदास ,एक अभिन्न नातं ..
आषाढ मासं  ,आनंद पेरून आणतो...    
आषाढ मासं आला कि जरा शांत शांत होतं ... 
वृक्ष वल्लरी सारा पाऊस अंगावर घेण्यासाठी सज्ज ...
पाऊसाची अतुरतेनं  वाट बघतेय,.... गारवा जाणवतोय ... 
आषाढातील पौर्णिमेचे कोण कौतुक .
वटपौणिमा ,वटसावित्री व्रत याच मासांत 
सुवासिनी मोठ्या आतुरतेने वाट बघतात ... 
 सुंदर पैठणी घालायची किंवा जरी काठी साडी नेसायची 
हातात सुंदर जडाऊ कंगन,पाटल्या ,रेशमी बांगड्या ,
नाकात सोळा मोत्यांची नथ ,त्यांत लाल हिरवे खडे जडवलेले ...
कानात मोठे झुमके ,मोतीहार ,असे सुंदर दागिने  
सजुनधजून ,हातात सुंदर सजवलेली पुजेचे थाळ.... 
लगबगीने सुवासिनी ,मैत्रिणी सोबतं हसतं खेळतं ,
थट्टा मस्करी करतं ..वटवृक्षाची मनोभावे पूजा करायची .. 
सातजन्म हाच पति मिळु दे .. अशी प्रार्थना करायची .... 
कच्च्या धाग्यांनी सुतवायचं .. मनःपुर्वक  हात जोडायचे.
पतिच्या दीर्घ आयुष्याची कामना करायची .... 
उदंड आयुष्य ,आरोग्य लाभो....    
सारं अरिष्ट टळु  दे ... जन्मोजन्मी अशीच साथ लाभु  दे ...
असाचं  साकडं घालायचं देवाला ....
देवदिकांवर निःशंक विश्वास ठेवायचा। .. 
सगळ देवावर सोडुन आपण निश्चिंत पणे जगायचं। ..
https://www.pexels.com/photo/photography-of-tree-1067333/ 
https://www.pexels.com/photo/nature-sky-clouds-field-9198/    
नववधु चा साज तर विचारायलाच नको ... ...
नुकतीच संसाराला सुरुवात झालेली ....  
कुणीतरी प्रिय सखी ,
तिला नव्या नवरी सारखं,सजवुन देतं... 
हातावारची  मेहंदी आणि मुखावरं  लालिमा 
सुंदर रंगसंगती साधते.. 
नववधुचं रूप अजुनचं खुलतं जाते ,लाजते ... 
नटणं ,सजणं  ,मुरडणं ...लगेच बावरणं .... 
सख्यांच्या चाण्याक्ष नजरेतुंनं काही सुटतं नाही...
पुजेची सुंदर सजवलेली थाळ, घेऊन ..
वटवृक्षाला प्रदक्षिणा घालते ....
मनोभावे शुभशकुनाची आराधना करते ......
https://www.pexels.com/video/bikers-riding-bicycle-on-the-bike-lane-in-the-park-4158894/
विवाह वेदीवर ,अग्नीच्या साक्षीने,
देवा ब्राम्हणाच्या साक्षीने, 
सप्तपदी ची सात पावलं, 
हळुवार पणे , नवऱ्याचा हाती हात धरून,
नववधु नाजूकपणे एकएक पाऊल टाकीत ... 
सप्तपदी पुर्ण होते .. 
विवाह संस्कार ---एक बंधन पुर्ण होतं .. 
ह्याच जन्मी नाही, तर,जन्मोजन्मी  
सातजन्म सोबत करण्याचे वचनं ...
सुख दुःखात साथ देण्याचे वचनं ..... 
एकमेकांना निभवण्याचं वचन ...
दोघेही वचनबद्ध ...  
त्यांचा निरंतर  प्रवास सुरु असतो ... 
सात पावलांवरून -- सात जन्मांकडे...
https://www.pexels.com/video/heavy-snowfall-4191577/
https://www.pexels.com/video/a-video-footage-of-a-golden-shower-tree-4121178/
नववधु चा  गृहप्रवेश ... 
अनोळखी घर ,अनोळखी माणसं...  
हळुहळु ती त्याच्यातं रमायला लागते ... 
त्याचं  ही  प्रेम बहरुन येतं ...
एक वेगळे विश्व असतं त्यांचं ... 
संसार फुलायला लागतो ... 
घराची  माणसं , नाती गोती ..
सणवारं, पै पाहुणा 
सारं सांभाळावं लागतं ..
जबाबदारीची जाणीव होते तिला ... 
मनं आपोआप जुळायला लागतात ..
सुख दुःख वाटुन घेतात ..
वेळप्रसंगी संकट झेलावी लागतात ...
छकुल्याचं  प्रेमानी करावं लागत .. 
शाळा ,कॉलेज ,पैसा अडका .... 
नव्या नव्या सकटतंना तोंड द्यावं लागतं ... 
मन  अजुन खंबीर होतं  जातं .. 
प्रवास असाच सुरु असतो ...
 टक्के टोणपे खाऊन 
 मनं असंच संसारांत गुंततं  जातं ...
राग व्देष मावळतो ... 
माझं तुझं संपलेलं असतं ... 
नाजुकश्या तंतुनी...
मनाच्या धाग्यांची गुंफण होते ...
हेच विरघळणं असतं ,प्रेम असतं .... 
सात जन्मा पलीकडचं ते नातं असतं ... 
ते कच्चे धागे नसतात ...ताटातुट व्हायला 
मनाचे ते पक्के असतात...
कच्चे धागे पक्के होतं जातात....    
सशक्त असतात ,खंबीर असतात... 
सातजन्म सोबत करायला ..
बंधनांच्या पलीकडलं ते असतं  
एक साताजन्मा नातं असतं .... 
कुणाला ते सहज कळतं नसतं ,उलगडतं नसतं.. 
वटवृक्षा सारखंच तिलाही जगायचं असतं ...
त्याच्या  आधारानं ,त्याची सावली होऊन ....
निरपेक्ष प्रेमाचं तें अतुट बंधन असतं ....
साताजन्मां पलीकडचं ते नातं असतं ,
https://www.pexels.com/video/video-of-forest-1448735/
https://www.pexels.com/video/4334576/
आजकाल आम्ही खुप आधुनिक झालो ... 
आपली व्रत वैकल्य ,सणवार--
पिढी दर पिढी चालत आलेले हे व्रत वैकल्य 
कधी कधी थोतांड वाटतात का ?
आधुनिकतेच्या नावाखाली, 
आपण आपले सणवार टाकून द्यायचे का ?
पुर्वजांनी जे सांगितले ते सारे खोटेच का ?
नक्कीच हे करण्या  मागे काही शास्त्र असेल ना ?
सावित्री ने सत्यवानाला यमाच्या दारांतून ,
मृत्यूच्या दाढेतुन  खेचून आणले ...
सावित्रीची इच्छाशक्ती , 
सत्यवानाचे  अहर्निश  प्रेम 
एका  पतिव्रतेची ती आर्त हाकं .. 
एका पतिव्रतेचे रुदन...आपल्या पति करिता
सावित्रीचे प्रेम असे धीरोदात्त   
यमदेवतेलाही  तिने शब्दांत अडकवलं...
यमालाही सावित्री समोर झुकावे लागले .. 
सत्यवानाचे प्राण यमानी तिच्या झोळींत घातले ...
हे सारं थोतांड का वाटावं ?
आजची सावित्री अशीच आहे ना ...
आई बाबांनी लग्न करून दिले .... किंवा प्रेमविवाह झाला ... 
मुली आपल्या संसारात सुखी झाल्याचं ना ... 
कुणाच्या आयुष्यात अडीअडचणी येत नाहीत? ... 
संसार निभावुन नेतात ना ...
संसार म्हणजे तीन तासांचा चित्रपट नव्हे ... 
सारं काही झटपट ,पटापट व्हायला ... 
भातुकलीच्या खेळांत पटतं नाही ?
कोण कुठे लगेच घटस्फोट घेतं ?...वेगळं होतं ... 
सावित्रीला ज्या अडचणी आल्या , त्या मलाही येतात .
सावित्रीने  जश्या अडचणी सोडविल्या ,मीही माझी सोडवते ना ... 
सावित्री जशी खंबीर झाली आणि चतुर झाली ,
मीही चतुरस्त्र झाले ना ....मी पण तिचीच कास धरली ना ..
सावित्रीने यमाला हरवलं ...,
माझ्या समोर उभी ठाकलेली आव्हानं, 
प्रत्येक संकट यमराज पेक्षा कमी नाहींत
ती संकट मी परतवुन लावली ना.. 
मी यमालाचं  परतवुन लावलं ना ...
सावित्रीने सत्यवानावर प्रेम केलं ..
पंचप्राणांनी ओवाळलं ...   
सातजन्म वचनबद्ध होऊन ... पतिव्रता होऊन ... 
मी पण पतिव्रता सावित्री सारखींच ... 
देवाब्राह्मणांच्या साक्षीने ... 
मी पण वचनबद्ध झाले,सातजन्म ,..
मी त्याच्या आयुष्यात आले, मी आजन्म पतिव्रता.... 
वटवृक्षा भवतीचा, मी धागा ,आता कच्चा नाही...
फिरून फिरून तो पक्का झालायं ...
रंग गहिरे झालेत , गंधबंध गहिरे झालेत ...   
सुतावरून स्वर्ग गाठायचा नाहीयं...
तावुन सुलाखुन आता नीरगाठं पडलीय..
ज्याच्या सोबतीनं मी आयुष्याची वाट चालले ... 
त्याच्या आयुष्याची मंगलकामना करण्याची मला का लाज वाटावी...  
वटवृक्षा भवतीची  प्रदक्षिणा, का लज्जा वाटावी ? 
पूर्वजांची वाट मी अनुसरली, त्यांत काय बिघडलं ?
संस्काराची शिदोरी मी जपली , त्यात कुणाचं काय अडलं ?
पतिप्रेमाची ,पतिव्रतेची  ही बंधन आहे ..
त्यांत अडकवुन घेण्यांत सुख असतं ... 
मोकळं होण्यात नाही हा आनंद ... 
तो वटवृक्ष ,मी सावली ... मी प्राण ,तो माझा पंचप्राण...    
ही आनंद यात्रा 
अशीच निरंतर राहणार....  
सात पावलांवरुन  ... सात जन्मांकडे ...
शुभम भवतु ...
लेखांकन ---एड .अर्चना गोन्नाडे


Green Leafed Tree
Yellow Leafed Tree

https://www.pexels.com/photo/trees-in-autumn-forest-1552932/
https://www.pexels.com/photo/night-tree-7130/
https://www.pexels.com/photo/a-photo-of-island-reef-of-a-surrounding-lagoon-3601450/
   






     

  

  
  





  


  















1 comment: