Follow Us @soratemplates

Monday, 29 June 2020

घननीळ सावळा.....

घननीळ सावळा.....
3 by 3 Rubik's Cube Selective Focus Photography

White Clouds and Blue Sky
Clear Glass Container on Black Surface








Corn Fields Under White Clouds With Blue Sky during Daytime





घननीळ सावळा--
घन म्हणजे काय हो ?
घन चौरस म्हणजे एक त्रिमितीय आकार... 
लांबी ,रुंदी आणि खोली ... 
यांत सामावलेलं एक गणित ..
म्हणजे घन ... 
घन म्हणजे सहा चौरस 
घन म्हणजे सहा चौरस ... 
ज्यांची लांबी ,रुंदी आणि खोली 
 अगदी समसमान असते
त्याला म्हणायचं घन ... 
मला असं वाटतं नेहमीच ... 
सहा चौरस म्हणजे षडरिपुचं
काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ... 
जीवनाला परिपुर्णता यावी म्हणुन हे वरदान  ...
आयुष्य नाहीतर निरसं झालं असतं..
कशाला जगायचं असं निरसं आयुष्य .. 
भगवंतांनी आनंदघन हृदयात ठेवलेय ना ... 
हे सारे आनंदघन म्हणजे षडरिपू ...
जीवनाला प्रवाहित करणारे षडरिपु .. 
जीवनगंगा फुलवून टाकणारे षडरिपु ...
बेरंगी ला रंगीन करणारे षडरिपु .. 
यौवनाला बेभान झुलवणारे षडरिपु ..
मोहलाही मोहळात अडकविणारे षडरिपु ... 
मद मत्सराला कुंपण घालावे असे षडरिपु ... 
प्राणचक्र अविरत फिरतं राहावे असे षडरिपु ...
अति सर्वत्र वर्जयेत..थोडी मुरड घालावीचं .
पाणी कुठेतरी अडवावं लागतं ,मुरावं लागतं ...  
जीवनगंगेचं अमृतबीज तिथेच रुजतं,अंकुरतं ..
जीविका आकारते ,गती घेते ,चरैवती ...  
घनगंभीर नादानं आभाळं व्यापलयं.... 
विद्युलता लखलखतेय आपल्या तेजानं ...
घन त्रिमितीय आकार--लांबी रुंदी खोली 
मनुष्याने जर समसमान ठेवली ..
तर पुर्णपुरुषच जन्मासं येईल ... 
पूर्णपुरुष म्हणजेच घननीळ ... 
घन म्हणजे कृष्ण कान्हा 
कान्हा म्हणजेच कृष्ण ..
घननीळ कृष्ण ...
घननीळ सावळा  
घननीळ सावळा .
सावळा ,सावळा .... 
लेखांकन /एड.अर्चना गोन्नाडे  
पावसाच्या भरभरून शुभेच्छा ---https://www.pexels.com/video/cumulus-clouds-formation-in-the-sky-3129769/
Pair of White Dice on Top of MirrorPerson Sitting on Mountain CliffLandscape Photography of Mountains Covered in Snow

https://www.pexels.com/video/time-lapse-of-cumulus-clouds-856171/
https://www.pexels.com/video/time-lapse-of-clouds-1644693/https://
www.pexels.com/video/video-of-sky-with-clouds-855785/
https://www.pexels.com/video/video-of-clouds-1110142/
  


  







 

  



No comments:

Post a Comment