एक होती हत्तीण
https://www.pexels.com/video/chickens-looking-for-food-856986/
एक होती हत्तीण
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी....
बालपणी हे संस्कार आज ही मनावर बिंबवल्या गेले आहेत ...
झाडं लावण्यासाठी कुंड्या आणायच्या ,
जमीन खोदायाची ,सारखी करायची ,
आजूबाजूला विटा लावायच्या ,सुंदर ,एकरांगेत ,
त्यावर लाल गेरू ने रंगवायच्या ,
छोटंसं रोपटं ,कुठणसं आणायचं ,लावायचं ,
बी पेरायचं ,दोन हिरवी इवली इवली पान
पंख पसरून जणू, आभाळाचं वेध घ्यायचं ,
नकळत आई आजीनी केलेलें संस्कार ,
अमुल्य होते ,त्याचं मोल करण्याची ,
देवांची ही प्राज्ञा नाही ,आज्ञा नाही ....
https://www.pexels.com/video/a-man-feeding-the-elephants-3842816
https://www.pexels.com/video/a-man-feeding-the-elephants-3569572/
निसर्गाचं आणि मानवाचं असं सुंदर नातं ,
एकमेकांच्या सहवासातं निरंतर वाढतं जाते ...
मानव वृक्ष वल्ली ना जोपासतो ,काळजी घेतो ...
त्यामागे त्याचा स्वार्थ नसतो ,हौस म्हणुन....
अंगणांत चार झाडं लावतो ,बगीचा फुलवतो ....
सुवासिक फुलांनी देवघरं सजवतो ...
फुलदाणी सजते फुलांनी ,
घरच्या राणी साठी गाजराही होतो
घर सुवासाने ,आनंदाने भरून जाते ,,,,,
इतकं सहज सुंदर नातं मानवाचं आणि वृक्षवल्लरीचं...
हातचं राखून नं ठेवतां ,आदान प्रदान सुरु असतं ....
हातांत हात धरून ,मार्गक्रमण सुरु असतं ...
https://www.pexels.com/video/footage-of-the-elephants-eating-together-3842824/
https://www.pexels.com/video/a-family-of-elephant-roaming-at-a-grassland-2835528/.
घराभवती कुंपण असतं ,नेहमीचं ते काटेरी नसतं ...
कुंपणाच्या दारा जवळ , मोत्या उभा असतो ना ...
रात्रं दिवस घराची राखण करतोय ना....
मोती ,मनीम्याऊ ,खेळायला असतात ना ...
काऊचिऊ चे घास घेतं च आम्ही मोठे आलो ना ....
मोत्या कधी चावला नाही ,
मनीमाऊ कधी मला भा भ्यायली नाही ... ...
चिमण्यांची चिवचिव थांबली नाही ..
काऊ कधीच ,खाऊ घेतल्याविना गेला नाही ...
पोपट पिंजऱ्यात असला तरी ,शीळ त्याची थांबली नाही..
चिऊकाऊ ,मोट्या ,पोपट ,सारी आमच्या घरचीच होती ....
मानवा पेक्षाही सारी जास्तचं माणसाळली होती....
भावभावना मनुष्याचा मोत्या ही समजुनं घेतों
काऊचिऊ ,कच्ची बच्ची ,खूप लाडावून घेतों ....
आई आजी चे संस्कार असे कि साऱ्यांना सामावुन घेतो
प्राणीमात्रांवर दया करा , भूतदया करा
अडल्या नडल्यांना मदत करा, हीच आमच्या संतांची शिकवण....
क्षणोक्षणीं , पावलोपावली , आई आजीची करतो आठवणं ...
https://www.pexels.com/video/a-pair-of-cheetah-2342260/
https://www.pexels.com/video/a-brown-monkey-eating-bread-2436088/
देवानं सारी सृष्टीचं घडवली ...
वृक्षवल्ली जन्माला घातली ...
अप्रतिम निसर्गची मांडणी केली...
ढग, आकाश ,पीक, पाऊस ,पाणि ,सारं सुंदर रंगवलं ...
प्राण्यांना राहायला जंगल दिलं ...
चारा पाण्याची सोय केली ...
पक्ष्यांना मोकळं आकाश दिल ...
दिलखुलास ,विहरण्या साठी ..
देवांनी मानवाची निर्मिती केली ....
खुप विचार केला देवांनी ...
मानवाला जन्माला घातलं ,,पण
देवानं आपलं रूप त्यांतं पाहिलं ...
सरूप सुंदर रूप मानवाचं ,,देवाला खुपच भावलं ...
मनुष्याला बुद्धीचं वरदान दिलं ...
सर्वश्रेष्ठ ,सर्वज्ञान, त्याला जन्मतःच मिळालं...
प्रेम ,माया ,ममता ह्या गुंणांनी त्याला समृद्ध केलं ..
लक्ष्मी त्याच्या पायींची दासी झाली ..
शौर्य त्याच्या पाठीशी उभं राहिलं
सदगुणांचा पुतळा आकारला ...
देव ही आपल्याचं प्रेमातं पडला ..
कारण जगन्नियंता ,आपलंच रूप साकारतं होता ...
मानवामध्ये स्वतःचंच रूप बघतं होता ...
देवाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं ..
https://www.pexels.com/video/a-pet-dog-wandering-on-a-camera-3042471/
https://www.pexels.com/video/a-wet-hawk-854843/
काम करता जरा ,देव ही थकून गेला ...
दोन मिनिटं त्याचा डोळा लागून गेला ...
संधी साधली ,दानवाने ,लगेच अवतरला ...
हळुच ,मानवाच्या हृदयात जाऊन बसला ...
सद्गुण सगळे घाबरले ,बाजूलाच झाले ...
क्रौर्याचे विष सगळीकडे भिनले ...
मानवाला आता चैन पडेना . ...
सुखासमाधानाने कुणाला जगु देई ना ...
काम क्रोध ,लोभ ,मोह ,मत्सर
हेच मानवाचे पंचप्राण झाले ...
दानवांचे हातचं पुढे सरसावले ....
देवालाही समजेना माझे काय चुकले ..?
https://www.pexels.com/video/cows-eating-856065/https://
www.pexels.com/video/horses-eating-grass-854524/
हे निर्लज्ज मानवा ,
या निष्पाप हत्तीणी ने ...
काय पाप केले ... तू तिला ठार मारलेस ...
पुण्याची रासं घातली होती तिने ...
आई होणार होती ती ...
किती आनंदी होती ,,,
तीही उपाशी होती ...
बाळ नको ना उपाशी राहायला ...
खूप काळजी असते बाळाची आईला ...
अरे ,भुक लागली म्हणुन ,
तुझ्या दाराशी आली ती ....
अरे निर्दयी माणसा...तु तिची होळी केलीस
अननसाला आतुन गोडं गरे असतात ...
अननसा मधुन तु तिला विष दिलंस
सध्या सभ्यपणाने तु आतिषबाजी मिरवलीसं ..
वेदनेनं विव्हळतं , जणू समाधी तिने घेतली ...
स्वतःसोबत बाळाचीही तिने आहुती दिली ...
अरे तुझ्या कृतीनं तु तुझचं रूप मांडलसं ..
जगासमोर भ्याडपणे हत्तीणीला मारलसं ...
हे मानवा ,सद्गुणांचा पुतळा तु ...
बुद्धीचं वरदान तुला ,कुठे गहाण ठेवलसं ...
कुठल्या लोभानी तु मुक्या प्राणाला मारलसं ...
दानवांनी तुझ्या मध्ये विषवल्ली पेरली ...
आई आजीच्या संस्करांची ,तमा बाळगली नाही
राम तुला आठवला नाही ..
रहीम तुला आठवला नाही
येशू ,बुद्ध , महावीर आठवला नाही ....
माणुस म्हणुन घ्यायची लाज वाटते आता ...
माणुसकीला कलंक कोण पुसणारं आता ...
दानवाचं श्रेष्ठ ठरला आता ..मानवाची काय तमा ...
ज्योत मालवु नका आता ... दैव येईल पुन्हा जन्मा .
शुभम भवतु ------.
लेखांकन ---एड अर्चना गोन्नाडे
https://www.pexels.com/video/a-leapof-leopards-in-the-wild-2873374/
https://www.pexels.com/video/a-squirrel-eating-nuts-2341924/
.
.
,
No comments:
Post a Comment