थेंब थेंब पाऊसगाणी
थेंब थेंब पाऊसगाणी
https://www.pexels.com/video/thunder-and-flash-of-lightning-2657691/
https://www.pexels.com/video/children-playing-in-a-park-getting-wet-by-the-rain-3111798/
थेंब थेंब पाऊसगाणी
थेंब थेंब पाऊस येतोय ..
सुरुवात व्हायचीयं अजुन गच्चं पावसाला...
पण थेंब आपल्या खिडकी मधुन ,
पाऊसातं डोकावण्याचा छंद आगळाच ..
ओझरत्या नजरेतं ,पाऊस भरून बघायचायं ...
काल पाऊस आला ,हलकासाचं
नुसतीच ,बुंदाबुंदी ...
पण मन मात्र चिंब चिंब झालं ...
मनांची गुणगुण ,अलवारं ..
अलगद ,हळुवार आठवणी ..
जणु मोरपीस फिरलयं त्यांवर ...
मखमली स्पर्श अंगभरं
नाद झंकार ,झंकार
घुमतोय झनन झनन झन ..
.https://www.pexels.com/video/video-of-people-waiting-for-a-taxi-on-a-rainy-night-855432/
आभाळ नुसतंच दाटुन आलायं ,
ढगांनी गर्दी केलीय ,आभाळभर
वारा निघाला तिकडे ,ढगही चाललायं,
वाऱ्याचं नि ढगांचं चांगलंच सख्य आहे...
प्रेमानीचं दोघांना जमवुन घ्यायचंय ...
अडकुन मडकुन निभायचं नाही
रुसुन ,रूसवुन चालायचं नाही ...
वारा नेतो तिकडेचं जायचंयं ,
कुठंतरी ढगांनी स्वच्छंद बरसायचंयं...
फेर धरुन पुन्हां, आनंदानी नाचायचंय ...
मनसोक्त स्वच्छंदपणे कोसळायचंय...
ताल नको ,सुर नको ,लय नको
शब्द नकोत ,नको भाषा
वाद्यांची संगतही नको .
मनातंचं बोलावं,हितगुज साधावं ..
भिरभिर बघावं ,गिरक्या घ्यावं ...
मनांतुंनंचं भर्र्कन निघुन जावं ..
फुलपाखरूं होऊन बघावं ...
स्वानंदी आनंदी व्हावं ...
बरसुन पुन्हां बरसावं
थोडं थोडं उरून राहावं ....
नकळतं ताल धरल्या जातों...
मनातचं प्राणं ओतंला ,किं
बेताल ताल ही तालातं येतों ...
रंध्रारंध्रातुंनं सुरावट उमलतें ..
छंदबद्ध . लयबद्ध ,अनाहत
नाद, संगीत उदयास येतें ..
फिरुनी त्याचं क्षणांत ...
मी पुनःर्जन्म घेतें ... मी पुनःर्जन्म घेतें
https://www.pexels.com/video/rain-falling-on-body-of-water-4169231/
पाऊस असा मनांतं दाटणारा ..
मनातंही हसणारा ,
थेंबे थेंबे फुलणारा ,फुलवणारा
आठवांचा खजिना अल्लाद खुलवणारा
कुरवळणारा , गोडं गोडं गोंजारणारा....
मनाला वेडंपिसं करणारा
काहीच सुचु ना देणारा ..
कधी कधीही घुमसतं ठेवणारा ..
राग आणणारा ,आग लावणारा ...
तरीही प्रेमाला भरतं आणणारा
रुणझुणं,रुणझुणं पैंजण बांधणारा
पाऊस असा ही नाचणांरा ...
मौन नृत्यं छेडणारा...
अंग अंग मृदंग,हृदयाशी भिडणारा ....
जन्मांतरी अंतरीं, बंध चेतणारा .....
जन्मांतरी अंतरी, बंध चेतणारा .....
बंध चेतणारा .....बंध चेतणारा ...
लेखांकन ----एड . अर्चना गोन्नाडे
पहिल्या पावसाच्या शुभेच्छा ,सर्व मित्रमैत्रिणींना
वाचतं रहा कविता पावसाच्या
https://www.pexels.com/video/aerial-footage-of-a-flooded-area-on-a-rainy-day-4150282/
https://www.pexels.com/video/traffic-in-london-s-regent-street-on-a-rainy-night-3037292/
.https://www.pexels.com/video/red-flowers-on-a-vase-with-view-of-a-rainy-day-1847910/
https://www.pexels.com/video/4357561/
.
No comments:
Post a Comment