Follow Us @soratemplates

Thursday 8 October 2020

फुलपाखरूं .....

    फुलपाखरूं .....फुलपाखरूं .....



 

 











फुलपाखरूं .....फुलपाखरुं                  
 फुलपाखरू कित्ती नाजुक नाजुक ... 
 बोट लावलं तरी पंख गळुन पडतील कि काय ... 
 अस्सं वाटायचं नेहमी ...खर्र सांगतेयं .. 
 लहानपणी फुलपाखरांमागे धावतांना खुपं मज्जा ... 
 ते हातातं कधी आलाचं नाही ... पकडता आला नाही ... 
 पण केवढा सोसं फुलपाखरुं हातांतं घेण्याचा ... 
 मग ताई दादाच्या मदतीनं ,फुलपाखरु पकडायचं ...
 हातातं , ओंजळीत क्षणभरं पकडायचं ..अगदी अलगद
 पंख तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची ... 
 अस्सं हातावर ओंजळीत घेऊन झालं मनभरं निरखून झालं ,
 कि मग... मग ओंजळ उंचावुन, 
अल्लाद उघडुन अलगद सोडून द्यायचं , पुन्हा आकाशातं .... 
 फुलपाखरूं भुर्रकन निसटायचं अंजुलीतुनं ... 
 फुलपाखरूं पंखांचा ओंजळीला निसटता स्पर्श ... . 
 त्या सुखद स्पर्शाचा सुवास हातावर अजून रेंगाळतेय ..- - 
 फुलपाखरूं .... किती रंग उधळलेतं विधात्याने 
 इंद्रधनूच्या सप्तरंगांची सरमिसळ केली तरी ...
 त्यापेक्षा किती तरी अधिक रंगांची फुलपाखरे ...                                         
 पिवळ्या रंगावर काळे केशरी ठिपके ... 
 गर्द केशरी रंगांवर पिवळी चांदणी ... 
 काळ्या रंगावर लाल खडी खुल्ली 
 पांढरी शुभ्र फुलपाखरं त्यावर जांभळी केशरी किनार . 
 निळी जांभळी जणुं गोकर्णीची फ़ुले ... 
 मुलायम पंखांवर सुंदर सुंदर नक्षी ... 
 रंगीबिरंगी दुनिया फुलपाखरांची .... 
 कित्ती मनमोहक रंग फुलपाखरांचे ... 
 देवाने मुक्त हस्ते त्यांना वरदान दिलयं रंगांचं ... 
 चटक रंग लेऊन फुलपाखरूं छान मिरवतं ... 
 मस्त ह्या फुलांवरून त्या फुलांवर ... 
 गुलाबी गुलाब ,जाई जुई ,गवतफुलं, कोमलसं 
 क्षणभर इथे या फुलांवर परागकण वेचुन घेणारं .... 
 क्षणातं पलीकडे फुलांवर ... तिथेही मधुसेवन करणारं ...
 फुलपाखरूं फुलपाखरुच तें ..
पुन्हा धरावं का ? कुठे एका जागी विसावायला ... 
नक्को तें पडुन राहणं ... मी फुलपाखरूंचं बरं .. 
उडायचं ,फिरायचं ,मिरवायचं...https://kittydiaries.com/ 
 मी पाखरूं पाखरूं ... मन फुलपाखरूं ... 
 सुरवंटाचं फुलपाखरुं होतांना जरा विश्रांती ... 
 कुठे भिरभिणारं फुलपाखरूं नाही नजरेत ...
 पण एकदा का उडायला यायला लागलं ... 
 कुठलं घरं नि कुठे काय , मस्त स्वच्छंद .. 
 निळ्याशार आकाशातं वाऱ्यावर डुलायचं .. 
 पुन्हा फुलाफुलांवर मधुकण वेचीत जायचं .. 
 मस्त स्वच्छंदी ,मनमौजी ,लहरी ,फुलपाखरूं ...
 कुणी टोकावं त्यांना ,कुणी रोखावं त्यांना ... 
 स्वच्छंद जिवनाचे धनी फुलपाखरूं भिरभिरण्यातं
 आनंद असतो ... आनंद वाटतो ... 
 मन रंगले फुलापाशी ,... अंतरंग आकाशी .
पण जरा जपुन हो फुलपाखरांनो .. 
 फुलांपेक्षाही तुम्ही नाजुक आहात ,... 
 कोण घावं घालणारं नेम नाही .... 
 नाजुक नक्षीदार पाखरांनो, सोसवेल का हें ?
 पंख कुठे अडकणार नाहीत ,काळजी घ्या . 
 काटे टोचणरं नाहीत , जरा लक्ष द्या ... 
 पंखांना बळ द्या , स्वतःच स्वतःला .. 
 मस्त मस्त उडा ,पंख पसरून ... फुलाफुलांवर .. 
 मलाही पण फुलपाखरूं व्हायचयं ...
 तुम्हांला आवडेल का ?
 मनं फुलपाखरूं मनं ,पाखरूं ....पाखरूं ---
 लेखांकन / रचना ... adv. अर्चना सुधाकर गोन्नाडे .. .archana gonnade https://kittydiaries.com/


3 comments:

  1. खूप सुंदर Blog...keep it up ताई ����

    ReplyDelete
  2. खूप सुंदर Blog...keep it up ताई ����

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much Shital Shrungarpawar you like my blog....keep sharing 🌹

      Delete