Follow Us @soratemplates

Saturday, 23 May 2020

मला आठवते माझी शाळा ..श्री राजेंद्र हायस्कूल


मला आठवते माझी शाळा ..श्री राजेंद्र हायस्कूल
मला आठवतें माझी शाळा ... राजेंद्र हायस्कूल
Alphabet Letter Text on Black BackgroundGroup of People Taking PhotoLaughing Children in Between Woman and Man at DaytimePhoto of Four Girls Wearing School Uniform Doing Hand Signs










































मला आठवते माझी शाळा ..श्री राजेंद्र हायस्कूल
तें आमचे शाळेचं दिवस होते . खूप सुंदर दिवस ते शाळेचे ...
बालपणं कायमचं आठवणीत राहते , सोबत असते ...
शाळेतले सोबती सवंगडी आताशा कुठे भेटतं नाहीत ..
सगळेच संसारात गुंतलेले असावेत ...
परंतु त्या निर्मळ आठवणीचा खजिना
मनातं खोलवरं दडुन बसलायं ..
आठवणींना मात्र कधी कधी उजळावं लागतं ..
मनांत उजळणी घ्यावी लागते ,रीळ आपोआप सरकतं जाते ...
शाळा घरापासून बरीच लांब होती ... ..
सकाळी अकरा -साडेअकरा वाजताची आमची शाळा असायची .
शाळेमध्ये मुली असतं आणि मुलं ही शिक्षण घेतं ...
सहशिक्षणाची संकल्पना होती..
हेडमास्तर आणि मास्तरांचा चांगलाच धाक असायचा ..
बाबासाहेब नाहतकर यांची ती शाळा होती ..
पाचवी पासून पुढच्या वर्गाचे ते मुख्याध्यापक होते,संचालक होते.
शाळेची लायब्ररी,विज्ञान प्रयोगशाळा ,ठिकठिकाणी लिहिलेलं सुभाषितं
सुंदर शैक्षणिक वातावरणं होतं ..
हरिभाऊ नाहताकर कॉन्व्हेंट स्कूल चे हेडमास्तर ...
शाळेमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यम असे दोन्ही मधून शिकवायचे.
शाळेची मुख्य इमारत ,शाळेचा मोठ्ठ पटांगण ,शाळेची स्टाफरूम ,
पंचवीस तीस विध्यार्थी बसू शकतील ,अश्या वर्गखोल्या,
प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये बसायला बेंच आणि डेस्क ,ड्रॉवर ,
शाईची दौत ठेवायला केलेला खोल गोल.,डेस्कवर
शाईचं पेन ठेवायला डेस्कवर जागा ...
शाई जरा जास्त भरल्या गेली कि त्यासाठी पुसायला कापड ,
पांढऱ्या स्वच्छ कपड्यांवर शाईचे डाग पडायचे ,
मग शाळेत मास्तरांची बोलणी खायची ,घरी आईची ..
तेव्हा असं नव्हतं ,दाग अच्छे है ..
शाळेत गेल्यावर लगेच सामूहिक प्रार्थना ,पटांगण मध्ये ,
नंतर बरोबर एकामागे एक ,व्यवस्थित लाईनशीर वर्गामध्ये जाणं
सात किंवा आठ तास व्हायचे, गणित आणि विज्ञान मात्र रोज .
रोज घोकंपट्टी करूनही गणित ,विज्ञान आमचं नावडतचं राहिलं ..
उभ्या आयुष्याचं गणितं कधी सुटलचं नाही म्हटलं तर ..
कलाकुसर , संगीत ज्याच्या त्याच्या आवडी प्रमाणे ,
आठवड्यातुन दोन तास असायचे...
शारीरिक शिक्षणाचा तास असायचा दर शनिवारी ,प्रार्थने नंतर ..
आमचं शिक्षण इंग्रजी माध्यमातुन झालं ...
अशोक कुर्झडकर सर ,तिवारी सर ,एनी मिस ,पवार सर ,
खुप कडक शिस्तीचे ,विद्यार्थ्यांकडे लक्ष असायचे त्यांचे
परंतु त्यांच्या सवयीनकडे ही बरोब्बर लक्ष असायचे ..
खोड्या केल्या ,अभ्यासात लक्ष नसलं तर ,
वेळीच पालकांना बोलावले जायचे ,समज द्यायला ..
असे ते शिक्षक ,आणि असे पालक ....असे विद्यार्थी .
https://www.pexels.com/video/the-art-of-making-a-paper-plane-1793367/

नाहतकर सर या आम्हाला इंग्रजी शिकवत ,
त्यांची एक सवय होती. ते आलेत कि आम्हांला खुप हसू येत असे ...
पहिलेच बटूमूर्ती,पण सदा हसतमुख ...
पुस्तकं ,डस्टर ,बेंच वर ठेवले कि ते आम्हां मुलांसमोर येत ...
पायाच्या बोटांवर भार देऊन मागच्या टाचा किंचित वर उचलुन...
हाताच्या बोटांमध्ये चाब्यांचा गुच्छा अडकवुन ..
तो गुच्छा गोलगोल फिरवीत असतं आणि शिकवायला सुरवात करीतं ..
आम्ही खूप हसत असू ,सर पडतील कि काय अशी ही भिती वाटायची ....
पण ते स्वतःचा तोल सावरून ,एक लय पकडुन ,
चावी बोटांभोवती फिरवीत आमचा वर्ग घेत असतं ...
पण ते चित्र अजुनही तसंच नजरेसमोर उभं राहतं ...
रम्य ते बालपण ...
https://www.pexels.com/video/school-of-fish-1456628/

मॉडेल मील चा अकराचा भोंगा वाजला कि आम्ही घरून निघायचं ,
पायी पायी निघायचं शाळेपर्यंत ..
पाठीवर दप्तर ,त्यात वह्या पुस्तकं ,
कंपास बॉक्स ,पेन .पेन्सिल ,रबर ,रंगीत खडू ,रंगीत पेंसिली ,
कागदाचे कपटे ,पिना, क्लीपा , चॉकोलेटे ,
कुण्णी मैत्रिणींनी दिलेलं आजू काही बाही ...
असं सारं ब्रम्हांड त्या दप्तरांत चपखल मावलेले असायचं ...
जोडीला दुसरी पिशवी ,त्यात आईने दिलेला भाजी पोळीचा डब्बा ,
थोडा खाऊ मधल्या सुट्टीचा ..पाणि वैगरे शाळेतच मिळायचं .. .
आईला दिसू नये म्हणून चिंचा बोर वगैरे दप्तरांत लपवून ठेवलेली ...
तशी आई पप्पा आमचे, सुटे पैसे द्यायचे, आठ आणे किंवा रुपया.. आमच्या हातावर ठेवायचे , किंवा कपडे बदलताना शर्टातुन कोटातून चिल्लर पैसे खाली पडले तर आम्ही ते मुलं उचलून घ्यायचे .
चप्पल ,बूट ,रेनकोट वेळेवर मिळालं तर नशीबचं ते ..
दिवस शाळेत कसा निघून जायचा कळायचं सुद्धा नाही .
सर किंवा बाई /मॅडम वर्गात येण्या अगोदर
एकसुरात सगळ्या कविता म्हटल्या जायच्या ,
त्या कविता अजूनही पाठ आहेत ..
पाढे पाठ करणं ,कित्ता गिरवणं,अपसुकचं सारं व्हायचं ...
घरी परततांना मैत्रिणींच्या गप्पाटप्पा ,हसतंखेळतं,
हातांत हात घालून वाट कशी सरायची ते ही कळायचं नाही .
असे आनंदाचे दिवस पुन्हा परतून का ?
बालपणं देगा देवा ,मुगीं साखरेचा रवा .. .
https://www.pexels.com/video/a-father-showing-his-daughter-how-to-draw-with-crayons-4016646/

आमच्या वर्गांत पंचवीसेक मुलं असावीत ...
संजीव ,शिरीष ,वसंत ,असीम... अशी नावं
मुली फक्त आम्ही पाच ....
आम्ही पाचच मुली असल्यामुळे ,
मराठी माध्यमच्या मुली पण आमच्या सोबत खेळायच्या....
त्यामुळे आमचा छान मोठ्ठा गट झाला...
आता कोण कुठेय ,माहित नाही ..
पण काही मैत्रिणी मात्र आवर्जुन अजुनही भेटतात ,
आमची नाव ही इतकी सुंदर ,जणू एका माळेत गुंफलेल्या कळ्याचं ...
योजना ,साधना , कल्पना ,अर्चना , आणि धारणा ...
धारणा ,योजनाची धाकटी बहिण ,तीही आमच्या सोबत असायची ...
चौघीही आम्ही चारचौघीं सारख्याच ....
सगळे आम्हाला यमक साधुन चिडवायचे.,
ना ना ना ना. ---धिंगाणा....आला आला धिंगाणा आला ...
खुप हसायला येतं आजही ...
अजूनही आम्ही चौघी भेटतोच ... खूप बोलतो खुप हसतो...
दुःख स्वतःच अवघडून बसतं ,रुसुन बसतं ,
आनंदाला उधाणं येतं , उत्साहाला उधाणं येतं
आनंदी आनंद गडे ,इकडे तिकडे चोहीकडे....
मैत्रिणी एकत्र असाव्या ,दिसाव्या म्हणून
सुंदर कविताही केली मी त्यांच्यासाठी, ...
https://www.pexels.com/video/paper-clips-of-different-colors-moving-on-top-of-a-black-surface-3013010/

कधी एकांती असतांना,
का तुझीच रे साधना,
ओढ रे का तुझी इतकी
या माझिया मना .. १..
सतत रे ध्यानी मनी ,
का तुझीच रे धारणा
प्रीत रे का तुझी इतकी
या माझिया मना.. २..
निरंतर जळी स्थळी
का तुझीच रे कल्पना
गीत रे का तुझे ओठीं
मनांत लाखो योजना .. ३..
अंतरीचा दीप तुचं
हीच माझी वांछना
स्वप्नी तरी व्हावे मिलन
हीच माझी अर्चना.. ४..
खूप गाणे खूप कविता अगदी मुखपाठ आजही आहेत ..
फक्त मैत्रिणी म्हणजे मैत्रिणी नव्हतोच ...
सोबत घरची मंडळीही, आई बाबा ,काका काकू , भाऊ बहिणी ...
आज्जी ,आत्या सगळीच नातीगोती गुंफल्या गेली,
मायेची ,ममतेची माणसं, बावन्नकशी सोन्यासारखी आहेत ...
ऋणानुबंधा चा अनमोल ठेवा ,आजही आम्ही जपून ठेवलायं ...
शुभम भवतु ...
ऍड .अर्चना गोन्नाडे
https://www.pexels.com/video/an-empty-classroom-1580505/
https://www.pexels.com/video/children-walking-on-a-paved-pathway-with-their-backpa3191109/Success Text

Text on Shelf
https://www.pexels.com/photo/kid-on-white-table-painting-3662630/
https://www.pexels.com/photo/alphabet-class-conceptual-cube-301926/
------------------------------------------------------------























No comments:

Post a Comment