बकुळी आणि बकुळी ////बकुळी आणि बकुळी
https://www.pexels.com/video/a-standing-woman-using-an-ipad-4065230/
https://www.pexels.com/video/a-couple-talking-while-staying-at-home-4326522/
https://www.pexels.com/video/4265188/
बकुळी आणि बकुळी
बकुळी तिचं नाव ,सगळेच तिला लाडाने बकु म्हणतं.
तिलाही फार आवडायचं तिला बकु म्हणून आवाज दिलेलं .
विधात्याने तिला फारच फुरसतीनं घडवलं होतं .
केतकी तुकतुकीत वर्ण ,लांबसडक काळेकुरळे केस ,
गच्च बांधून घेतले तरी नितंबावरुन खाली येणारा शेपटा .
नाकी डोळी नीटसं ,साधारण उंची ,
ओठांवर ,गालांवर जणु गुलाब खुलले,
विधात्याने तिला सौंदर्याचं वरदान भरभरून बहाल केलं होतं.
अस्सल निखळ सौंदर्य म्हणजे बकुळी
तिच्या सौंदर्याचा सुगंध साऱ्या पंचक्रोशीत पसरला होता .
कुणीही तिच्याकडे एक नजर टाकली कि
बघणारा बघताच राहायचा ,नजर हटत नव्हती .
सधन कुटुंबात बकुळी वाढतं होती .
आई वडिलांच्या छत्रछायेत आणि भावाबहिणींच्या प्रेमळ मायेत.
सारं सगळं नीट चाललं होतं .
बकुळीचं जेमतेम अठरावं सरलं .
यौवनाच्या उंबरठ्यावर जेमतेम पाऊल ठेवलं .
तारुण्य अंगोपांगी बहरलं होतं ,
मुसमुसत्या यौवनाचा गंध लेऊन बकुळी वावरत होती .
अशातच ध्यानीमनी नसतानां ,एक छानसं स्थळ आलं
पराग नं तिला मागणी घातली,लग्नासाठी.
मुलगी पसंत पडली ,पत्रिका जुळल्या ,देणंघेणं ठरलं ,
आमंत्रणं ,निमंत्रण , मंगलाष्टक ,मानापमान ,पंगती
सप्तपदी यथायोग्य रितीरिवाजाप्रमाणे पारं पडलं .
चट मंगनी , पट शादी,बकुळीचं लग्न झालं.
बकुळीनं परागच्या संसारात प्रवेश केला.
देखणेपणाचा रुबाब ,अन गोड समंजस स्वभाव ,
पराग सोबतच त्याच्या घरच्यांनाही तिनं आपलसं केलं .
बकुळी ,पराग ,आणि परागचे आईवडील ,असं छोटंसं कुटुंब .
कुठे राग नाही,कुठे धुसफूस नाही ,सासूसुनेचा छान ट्युनिंग जमलं होतं .
सासूबाईंनी अगदी आईच्या मायेनी,तिची सगळी हौस पुरवली .
हळदी कुंकू झालं ,मंगळागौर सजली, दसरा दिवाळी झाली .
हौसेला मोलं नसतं , घर रुणझुणत्या नादानं भरून गेलं ..
पराग आणि बकुळी ,बकुळी आणि पराग
दोघांचं विश्व एकचं झालं, जिवापाड प्रेम ,
सुखसागरांत बकुळी आकंठ बुडाली होती .
सुखाच्या हिंदोळ्यांवर झुलतं होती,
मन वाऱ्यावर तरंगत होतं ,
आनंद अंतरंगात गुलाल उधळत होतं
संसारात आता बाळाची चाहुल लागली .
लक्ष्मीच्या पावलांनी इवलंसं बाळ आलं .
पहिली बेटी ,धनाची पेटी म्हणतं तिचं स्वागतच झालं .
नाव ठेवलं तिचं सौन्दर्या ,गोडं ,गोंडस ,आईसारखीच रूपवती .
संसारवेली वर दुसरेही फुल उमललं ..
वंशाला दिवा आला , अनुराग चा जन्म झाला ..
इवलासा, छोट्टासा अनुराग ,त्याने तर वेडंच लावलं साऱ्यांना .
विधात्याने सुखाचं मापंही भरभरून दिलं ..त्याची गणती नव्हतीच.
पण ... पंण दैवं देतं नि, कर्म नेतं .....
आयुष्याच्या पानांवर काय अक्षरं गिरवली आहेत ,
हे कुणी जाणावं? ,हे कुणी समजावं ? दैवं जाणिलें कुणी ?
पण ,हाय रे दैवा ,कुणाची दुष्ट नजर लागली सुखी संसाराला.
पराग आता मित्रांच्या गराड्यात ,
पैश्याच्या गुर्मीत ,मोहजालातं अडकला .
दमलेला ,झिंगलेला ,जीवाची शुद्ध नसलेला
असा पराग ,रात्री बेरात्री ,घरी येऊ लागला .
दारूचं अनोखं व्यसन त्याला जडलं .
दारूनं त्याला आपल्या मोहपाशात अडकवलं .
बकुळीकडे त्याच दुर्लक्ष होऊ लागलं ,
सौंदर्या ,अनुराग यांची हि त्याला दया येत नव्हती ..
आईवडिलांची ही त्याला पर्वा उरली नाही ....
सगळ्यांनी त्याला समजावण्याचे खूप प्रयत्न केले .
दारूच्या व्यसनामुळे तो बेधुंद झाला ,अनिर्बंध झाला ..
आईवडील परके झाले ,बायको मुलं परकी झालीतं .
मित्रमंडळी अधिकच प्रिय झाली ,जवळीक साधु लागली ..
सारा संसार उद्धवस्त झाला ... होत्याच न्हवतं झालं..
दारूंनी ,व्यसनांनी त्याचा सत्यानाश केला ...
अशातच परागला कॅन्सर असल्याचं निदान झालं.
बकुळीच्या हृदयाचं पाणि पाणि झालं ..
देवाला साकडं घातलं , उपास तापास करून झाले ...
देवाची करूणा भाकली ,दिवस रात्र एक करून
बकुळीन पराग ची सुश्रुषा केली ...
व्याधीग्रस्त शरीर ,औषधाला साथ देतं नव्हतं ...
परागचं शरीर थंडावलं , साऱ्यांना पोरकं करून पराग निघून गेला .. बकुळी चा आकान्त बघवत नव्हता ...
मुलांचा आक्रोश ,आईवडिलांचे आक्रंदन
पित्याच्या खांद्यावर पार्थिव ,परागचं .
सौंदर्या ,अनुराग ,आई ,अन बकुळी ...
कुणाच्याही जीवातं जिवं नव्हता
सगळाच खेळ उधळला होता ...
सगळाचं डाव उधळला होता ..
आयुष्याची अजुन चवंही चाखली नव्हती ,
वैध्यव्याचा डोंगर बकुळीवर कोसळला ...
सौन्दर्याचं लेणं लेऊन आलेली बकुळी ,कोमेजुन गेली ,मलुल झाली.....
तीच काय चुकलं ,हे परमेश्वरा:
जगन्नियंत्यां पुढे कुणाचं काही चाले ना ...
क्रियाकर्म निपटले , घर शांत शांत झालं ..
अवघ्या एकविसाव्या ,बकुळीच्या नशिबी वैधव्य आलं ..
विवाहाच्या वेळी ,सप्तपदीच्या वेळी..बकुळीनं आणि परागनं
घेतलेल्या आणाभाका ,वचनं सारं व्यर्थ ठरलं.
पराग एकटाचं दुरदुरच्या प्रवासाला निघून गेला ..
अनंतात विलीन झाला ..बकुळीला मागे टाकुन ...
सौन्दर्या ,अनुराग आजीआजोबांच्या जिवं कि प्राणं ..
बकुळीला ही त्यांनी मुलीप्रमाणेच वागवलं ..
परागचे आईवडील सारं बघतात .,सारं करतात ,
पणं ,बकुळी ,तिचा सुगंध जणू हरवून गेला ..
परागच्या आठवणीत तिचा जिव व्याकुळ होतं होता ..
गतप्राण झाल्यासारखी ,वेडी झाल्यासारखी,,
भिरभिर भिरभिर , ,कुठेतरी शुन्यामध्ये ,
पराग दिसतोय का बघायची ..
असं किती दिवस दुःख कुरवाळणारं ?
स्वतःच स्वतःभोवती किती काळ फिरणार ?
वेड्या मनाची आशा ,मन विचार करू लागलं ..
सौन्दर्या ,अनुराग आहेत ना ,आईबाबा आहेत ना...
माझ्या पिटुकल्यांसाठी मला जगायला हवं ..
एकदम भानावर आल्यासारखी ,सौन्दर्या,अनुरागला शोधू लागली
आईबाबा नजरे समोर आलेत ... ती स्तब्ध झाली ..
देवाला मनोमनी प्रार्थना केली , आशा अंकुरली ,
तारुण्यसुलभ भावनांना ,यौवनसुलभ आवेगांना ,
ती शान्तचित्त होऊन आवरू लागली ...
एकचित्त होऊन सावरू लागली ..
तिनं डोळ्यातली आसवंही पुसुन टाकली ..
सारं दुःख गिळुन टाकलं बकुळीनं .
आरं पारं ठामपणे उभी राहिली ..
काळाच्या ओघातं ,एकटीनंच ,
जीवन जगण्याची कला ,तिने आत्मसात केली ..
चरैवती चरैवती ,चालत राहा ,चालत राहा ..
जीवनाचा हाच महामंत्र ,बकुळीने गिरवला ..
दुःखाचा डोंगर बाजूला ठेऊन ..
बकुळी पुन्हा हसू लागली ....
हिरवी पालवी फुटू लागली ..
हरवलेला सुगंध परतु लागला
पुनःश्च चैतन्याचा प्रवाह साकारला ..
जीवन पुनःश्च आकाराला आलं
बकुळी हसु लागली आणि बकुळी हसु लागली
चरैवती ,चरैवती ......
शुभम भवतु ...
लेखांकन -
-ऍड ..अर्चना गोन्नाडे
https://www.pexels.com/video/a-woman-taking-photo-of-another-woman-checking-out-new-dress-4008365/
https://www.pexels.com/video/4265182/
https://www.pexels.com/video/baby-girl-crawling-on-the-floor-3196565/
https://www.pexels.com/video/a-mother-teaching-her-baby-to-walk-3196464/
https://www.pexels.com/video/a-mother-kissing-her-toddler-son-while-carrying-him-on-her-arms-3327090/
https://www.pexels.com/video/a-mother-playing-with-her-daughter-by-blowing-her-hair-3201104/
.
No comments:
Post a Comment