पलाश/ पलाश
https://www.pexels.com/video/close-up-video-of-butterfly-on-flowers-1171471/
https://www.pexels.com/video/a-bee-on-a-yellow-flower-2048452/
https://www.pexels.com/video/yellow-flowers-during-windy-season-856834/
https://www.pexels.com/video/variety-of-fresh-roses-1745947/
,
https://www.pexels.com/video/close-up-video-of-butterfly-on-flowers-1171471/
https://www.pexels.com/video/flowers-blooming-855867/https://www.pexels.com/video/close-up-video-of-flora-856192/
/पलाश///पलाश
दुरदुरच्या ओसाड रानांतं
आमची भटकंती चालली होती
एखाद्या सराईताप्रमाणे
वळणं आपोआप येतं होती ,जातं होती ...
सूर्यनारायणानी सहस्त्ररश्मीनी
वसुंधरेला चं आपल्या,
कवेत घेतलं होतं,आवळलं होतं.
ऊन मी म्हणत होते ,
जिवाची काहिली होतं होती
त्या धगधगत्या,रणरणत्या उन्हातं
वाऱ्याची मधुनचं आलेली, थंडगार झुळुक
मनाला सुखद वाटतं होती ..
शांत करतं होती ..
गर्द सावली ,थंडावा देतं होती
क्षणभरं विसावण्यासाठी..
रानावनांत भटकतांना,
ओसाडंश्या वनराईतं
रानं बहरून आलं होतं
रंगोत्सव रंगला होता
रंगांची उधळणं चालली होती
वसंताच्या आगमनाने ,
पुलकित झालेली
सारी सृष्टीचं बहरली होती ...
सप्तसुरांची लयबद्ध गाणी ,
सृष्टी गातं होती.. सारीचं सृष्टी गात होती ..
https://www.pexels.com/video/tree-with-white-and-purple-flowers-2206872/
असा कसा हा पलाश, दुरदुरच्या वनांतुन ,
असा कसा हा पलाश, दुरदुरच्या वनांतुन ,
निष्पर्ण हा पलाश जरी,
एकटाच, स्थितप्रज्ञ
दानं देण्याचं सरतं नव्हतं ,
हिरवेपणं संपलं होतं ,
शिशिरातचं गळुन पडलं होतं...
पर्णसंभार उजाडला होता ..
शृंगार संपला होता ,
पलाश आताशा एकाकी होता..
कुणाची प्रतीक्षा करीत होता?
जिवाच्या जाणीवा बोथट झाल्यातं
संवेदना जणु हरवल्या,
निष्पर्ण ,निष्प्राण पलाश
अगतिक ,मान लवुन उभा होता ..
पुन्हा फुलण्याची स्वप्नं ,
पुन्हा फुलण्याची स्वप्नं
प्राणातं रूजवुनं ,थोडा थांबुन
ओसडल्या रानातं , दुरवर कुठेतरी ,
निष्पर्ण पलाश ,फुलला होता ...
प्राणांतं प्राणं विरला होता
फ़ांद्यांवरुन ओघळला होता
फुलांची उधळणं करतं ,
रंगांची रंगावणं करतं ,
सुगंधाची पखरणं करतं ...
सौंदर्य नुसतं निथळतं होतं ,
धरित्रीला वरदान देतं होतं....
ऋतु सरला ,पानगळ झाली,
हिरवाई कुठेशी हरवली
वसंताच्या चाहुलीने,
निष्पर्ण काया मोहरली
,
मोहर पुन्हा फुलला होता,
निष्पर्ण मी असलो जरी
कणं माझा हिरवाच होता ..
केशराची रंगसंगतं ,
त्याला त्यागाचा सुगंध होता ...
रणरणत्या उन्हातही
निष्पर्ण पलाश फुलला होता .
https://www.pexels.com/video/purple-and-white-flowers-during-windy-day-854701/
दुरच्या त्या ओसाड रानांतं ,
दुरच्या त्या ओसाड रानांतं ,
स्वर्ग सौंदर्य फुलले होते...
मानाचा पहिला मुजरा,
फुललेल्या पलाशालाचं होतें,
निसर्ग सारे सौन्दर्य ,
टिपुन घेतं होते ,
आकाश सारे सौन्दर्य
माळुनं घेतं होते ,
टिपुन टिपुन टिपणारं किती ?,
माळून मळून माळणार किती?
निष्पर्ण पलाश फुलला होता ,
त्यागातील आनंदाची ,सुगंधाची
अनुभूति घेतं होताना
फुलोरं अजुनच मोहरला होता
दुरदुरच्या ओसाड रानांत
निष्पर्ण पलाश फुलला होता ...
निष्पर्ण पलाश फुलला होता..
निष्पर्ण पलाश फुलला होता ...
लेखांकन --एड .अर्चना गोन्नाडे
https://www.pexels.com/video/a-bee-on-a-yellow-flower-2048452/
https://www.pexels.com/video/yellow-flowers-during-windy-season-856834/
https://www.pexels.com/video/variety-of-fresh-roses-1745947/
,