Follow Us @soratemplates

Friday, 3 December 2021

कोंकण २ दिवेआगार चा समुद्रकिनारा ....

10:01 0 Comments

कोंकण  २  दिवेआगार चा समुद्रकिनारा ....


 

समुद्रावर पुन्हा सकाळी जायचं म्हणुच पहाटेलाच जाग आली 

साडेपाच चा  गजर लावला होता .. फारसं अस उजाडलं नव्हतं ...

जरा काळोख होतांच .. . अधुंकसा उजाडलं होतं  

आळस झटकुन टाकुन पटकन उठलो ... 

झपाझप येऊन पोचलो समुद्रकिनाऱ्यावर ... 

वाह किती रम्य सकाळ ती ,किती प्रसन्न सकाळ ती ... 

अवीट गोडी ची भुपाळी सहज ओंठांतुन उमटली .... 

घनश्याम सुंदरा श्रीधरा  अरुणोदय झाला हा .. 

उठी लवकर वनमाळी उदयाचळी मित्र आला हा .... 

सुर्योदय बराच वेळा पहिला अनुभवाला ... 

पण इतक्या विस्तीर्ण  किनारा समुद्राला लाभलेला इथे ... 

असं बाळ सूर्याचं रूप प्रथमच अनुभवत होते ... 

सुर्य जेमतेम वर आलाय अन किरणं हळुवार पाण्यावर तरंगत होती ... 

सारं कसं शांत शांत होतं .... तीच शांतता मनाला बोलकं करीत होती ... 

किनाऱ्यावर अलगद बसून घेतलं ... त्या शान्ताव्यात कुठे व्यत्यय नको .. 

बराच वेळ आम्ही तिथे वाळुवर बसून राहिलो ... 

अनिमिष नेत्रांनी तो उदयाचळीचा सोहळा बघत राहिलो अन 

रंगांच्या तरंगांवरून  मन अंतरंगात शिरलं ... 

मन दुरवर बघत राहिलं ... अथांग सागर ...क्षितिजापार 

आभाळभर केशराची सोनेरी रंगांची  उधळले होतें ... 

ती केशराची रंगसंगत , सुवर्ण रंग कसे  एकमेकांत मिसळून गेले .. 

त्या रंगांचे  प्रतिबिंब अथांग  सागरानी पांघरले होते ... 

कोंकण ची हिरवाई ,आकाशाची निळाई त्यात  बहारली होती .

असा सुंदर सुर्योदय पाहतांना मन उचंबळुन आलं .. 

पुन्हा  जगन्नियंत्याची स्मरणं झाले अन दोहो करांनी भास्करला वंदन केले ..  

रात्रीच्या अंधःकारात प्रकाश वसलेला असतो ... 

प्रकाश ही हुलकावणी देत असतो ....अरे  शोधा मला शोध मला ... 

 शोधणाऱ्याला गवसेल प्रकाश ... अंधःकाराच्या गर्भात स्वतःला गुरफटुन घेतो ... 

लपाछपीचा डाव असतो अंधार कि .प्रकाश .. पण प्रकाश कुठे लपुन राहणार का ?

नकळत कुठूनशी एक तिरीप आपल्या पर्यंत येतें  

अन प्रकाशानं आपलं जीवन उजळून जातं ... 

सुर्यास्ता  नंतर सूर्योदय आहेच  .. रात्री नंतर दिवस उजाडणारं आहे 

अंधःकारा   नंतर प्रकाश  गवसणारं आहे .तमसो मा ज्योतिर्गमय ...

मन प्रसन्न होतं  ...चहूकडे  मन धावत हॊतं  ... हरखुन गेलं होतं .... 

नयनरम्य  दृश्य  मन साठवु पाहत होतं ....मनाला पंख लागले होते ... 

मन हुलकावणी देऊन बाहेर पडलं ... भिरभिरलं ... परत आलं ते अंतर्मनात .. 

ध्यानस्थ झालं .. स्थितप्रज्ञ ... मन  म्हणतं होतं ..शांतम शांतम .. 

सागराच्या विशाल  हृदयावर अवखळ लाटांचं राज्य होतं ...

सागराला उधाण आलं जणु , फेसाळणाऱ्या लाटांकडे ते अनिमिष नेत्रांनी पाहत होतं .. 

हातात हात गुंफून लाटांचं ते  नर्तन  खुप सुखद वाटतं होतं... 

एकमेकांच्या गळा पडून ,,, सुखदुःखाच्या कहाण्या सांगत ... 

निर्मिती कुठे  अन किनारा कुठे दुर दुर ... हाच तो भवसागर तर नाही .. 

नमोनमः देवा ... तुझं अस्तित्व  जाणवलं ... जाणवतं राहिलं ... 

 पण ह्या उसळणाऱ्या लाटांना कोण घाई ? कोण गाठतोय किनारा लवकर .. 

झिम्मा फुगडी घालत लाटा धडकतात  किनाऱ्यावर ... 

लाटांचं सुखद नर्तन किनाऱ्यावर येऊन थांबतं ... स्थिरावतं 

किनारा पुन्हा शांत शांत .... प्रशांत प्रशांत ...

लेखांकन --- ऍड . अर्चना गोन्नाडे  archana gonnade 
















 


Friday, 26 November 2021

कोंकण --१ दिवेआगार चा समुद्रकिनारा ....

09:00 0 Comments



कोंकण --१  

 दिवेआगार चा समुद्रकिनारा .... <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7365972984366991"

     crossorigin="anonymous"></script>



कोंकण --१ 

दिवेआगार चा समुद्रकिनारा .... 

बस्स .ठरलं एकदाच ... कोंकण फिरायचं ... 

पुण्या  ला मुक्काम होताच ...शॉर्ट पिकनिक ला जायचं ... 

 कुणीसं सांगितलं दिवेआगार ला जा ...जवळचं श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर .. 

दोन दिवसांत छान भटका ... मोकळेपणी ...फ्रेश वाटेल ... 

अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे...... 

त्याच दिवशी टॅक्सी बुक केली आणि दुसऱ्या दिवशीच निघालो  

जिल्हा रायगड .. तालुका श्रीवर्धन ... पुणे पासून अवघ्या १६० कि .मी . 

@दिवेआगार ला पोचता पोचता दुपार झालीच होती ... 

आम्ही रिसॉर्ट बुक केले ते समुद्रकिनाऱ्या च्या जवळचं ... 

पायी चालत जावे इतकं दोन मिनिटभरात ,इतकं जवळ ... 

दुपारचे ऊन टाळून आम्ही सायंकाळी  पाच वाजता बीच वर पोहचलो ..

अहाहा काय सुंदर ,अप्रतिम समुद्र किनारा ...

मावळतीचे रंग आभाळभर पसरलेले .. 

निळ्याशार आकाशावर केशरी रंगांची उधळण .... 

त्यांत  पिवळा तांबूस रंग ,सोनेरी आभा 

सागराच्या लाटांवर स्वार होऊन जणु किनाऱ्यावर झेपावत होती ... 

सागर किनारा पण पिवळ्या  तांबूस सोनेरी रंगात न्हाऊन घेत होता ... 

अस्ताचलाला जाण्याऱ्या  सुर्याला वंदन करून आम्ही ही त्या समुद्रांत शिरलो ... 

मनसोक्त पणे सारा समुद्र अंगावर घेतं ... 

लाटां सोबत मैत्री करीत ,लाटांवर स्वर होत आम्ही येथेच्छ डुंबलो ..

नाही भीती वाटली कुठलीही सागराची ,मैत्री केलीय ना ... 

मग डर कशाला /? काय व्हायचे ते होऊन जाऊ दे ... पण .भीती नकोच  मनांत .. 

सायंकालीन ती वेळा ,सागरकिनारा ,अंगावर शिरशिरी आणणारा तो गारवा ... 

मन धुंद , बेधुंद झालं होतं .... काव्य न सुचावे तरच नवल ... 

प्रणयाच्या वाटा इथंच गवसत असाव्यात..... प्रेमात असचं पडायला होतं .. 

नभी उधळला गुलाल केशर 

चंद्र  मधाळला दिसे दुरवर ... 

सांध्य झळाळी  मनांत हुरहुर 

प्रणय भळाळी हृदयी काहुर ..    

हृदयाच्या कप्प्यात असलेली चोरजागा कुठे गवसते कुणाला ?

अशा धुंद वातावरणात पुन्हा पुन्हा  जाग  येतें .... 

 प्रीतगीत ,प्रणय झंकारतात ,लाटांवर स्वार हॊतातं ... 

किनाऱ्यावर धडकतात .... क्षणभर विसावतात .. अन पुढे .. 

सागराच्या पोटांत लुप्त होतात ...गुप्त होतात 

 खूप खूप दडलंय हा  समुद्राच्या पोटांत , काळजी घ्या ...

उद्या पुन्हा भेटुया ... गप्पा मारायला ... 

लेखांकन --एड . अर्चना गोन्नाडे archana gonnade 


 



 


  
















 



Saturday, 20 November 2021

पी.एन.गाडगीळ अँड सन्स .P.N.G and सन्स डहाणुकर शाखा एकदा भेट अवश्य द्या .. सुवर्णयोग साधा ..

09:08 0 Comments

 पी.एन.गाडगीळ अँड सन्स .P.N.G and सन्स    डहाणुकर शाखा 

एकदा भेट अवश्य द्या .. सुवर्णयोग साधा .. <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7365972984366991"

     crossorigin="anonymous"></script> https://pngadgilandsons.com/ 


ओम हिरण्यवर्णामं हरिणीम... 

हिरण्मयी आली या जगतात .. धनत्रयोदशीला ..   

बाळ जन्माला आलं की त्याच कोण कौतुक...                                      

मिठाई, पेढे.बर्फी यांची रेलचेल...

आनंदी आनंद गडे...इकडे तिकडे चोहीकडे. .

आत्ता बाळाचं बारसं...नामकरण विधि...

बाळाला जन्मतःच तेजोवलयं असतं ...सुरक्षा कवच असतं 

पण पण लौकिकार्थ आहे ना   जगात ...

बाळाला वाळे तोडे हवेच ना  

सुवर्णा ची झळाळी हवीच ना बाळाला..

मग पी.एन.जी. आहेच की ...चिंता नको..

डहाणूकर  शाखेत ... आम्ही गेलो...https://pngadgilandsons.com/happy-colony/

खुप मोठ्ठी प्रशस्त शोरुम आहे...

मेनरोड ला असल्यामुळे आपण सरळ  शोरूम  जवळच उतरतो.

आतं शिरतो तोचं कुणी अदबीनं समोर येतं ,

"नमस्कार"  काय हवंय ? ..

थोडी बातचीत अन आपलं  भव्य शोरूम मध्ये पदार्पण झालेलं असतं .. .

सोनसळी रंगात पी.एन.जी.झगमगत असते...

वाह वाह किती सुंदर. ..

राजा रविवर्मा चं सुंदर मोठ्ठ पेंटींग ... नजर सहजचं तिकडे वळते .. 

भितींवर असलेलं ते बोलकं पेंटिंग / चित्र 

पी.एन.जी. ची पारंपरिक शैलीच जणु अधोरेखित करीत असावी...

आता जरा पुढे वळुया .... 

बघा किती छान व्यवस्था केलीय ती..

सोनं,चांदी चे सुन्दर पारंपरिक दागिने मनातं भरतात..

कर्णफुले,वज्रटिक,मोहनमाळ ,बांगडया,पाटल्या 

,झुमके ,इअरिंग्स ,लोंबते कानातले ,वेल 

नवनवीन डिझाईन मध्ये उपलब्ध आहेत...

कुणाला भेटवस्तू देण्याकरिता आपल्या बजेट मध्ये 

बरेच पर्याय आहेत...तेही नाविन्यपुर्ण ... 

श्री गणेशाच्या ,आणि अष्टलक्ष्मीच्या फ्रेम्स खूप सुंदर आहेत .. 

प्रत्येक विभागा /दालन आपलं वेगळेपणं जपुन 

चांदी चे विविध अलंकार...

फक्त अलंकारचं नाही तर चांदीची पूजेकरिता वापरण्यात येणारी 

कलश ,अष्टदळ,तबक , वाट्या पेले, ताम्हण आणि .... बरचं  काही 

सुवर्णाचे,मोत्यांचे  अलंकार या साठी  तळमजला

तर वरच्या मजल्यावर हिऱ्यांचे अलंकार...

बारसं असो , साखरपुडा ,विवाह असो ,व सहज सुवर्ण खरेदी असो .

किंवा गुरुपुष्यामृत योग्य असो .

शगुन म्हणुन एखादा दागिना सुवर्णाचा असतोच ... प्रथा परंपरेप्रमाणे 

मनाची द्विधा  अवस्था होते दागिने घेताना...हा घेऊ कि तो घेऊ .. 

पण पी.एन .जी. ची टीम भारी ...

तुम्हाला कुठला अलंकार खुलून दिसतोय ते निःसंकोच सांगतात...

अन पुढे आपण ठरवलेली खरेदी करतोच पण

 न ठरवलेली पण मनांत असलेली खरेदी होतेच ... 

हीच पी. एन. जी . च्या यशाची पावती आहे ... 

जुनी मोड द्यायची असेल तर त्याचा उत्तम परतावा मिळतो,तशी रसिद ही मिळते...

अदबशीर स्टाफ, सगळ्या स्टाफ चे एकमेकांशी समन्वय ,ताळमेळ 

ड्रेस कोड या सारख्या गोष्टी निश्चितच वाखाणण्या सारख्याच आहेत.. 

एकगोष्ट मात्र मी मार्क केली ...खटकलंही  

पुरुष स्टाफ जो आहे ,त्यांच्या शर्ट वर त्यांच्या नावाचे आय कार्ड दिसले ... 

परंतु स्त्री स्टाफ ला मात्र  आय कार्ड लावलेल आढळलं नाही .. 

कदाचित सुरक्षेसाठी वेगळे काही कारण असू शकेल ... 

कंटाळा आला तर ऐसपैस सोफ्याची व्यवस्था आहे    

काही हवं नको ते विचारणारी अगत्यशील टीम आहे ...

मी पण माझ्या हिरण्मयी बाळासाठी खरेदी केली ... 

सुवर्ण झळाळी यायला हवी च ना... 

बाळाचं नाव हिरण्मयी ठेवलयं  .... 

ओम हिरण्यवर्णामं हरिणीम ....

हा माझा पहिलाच अनुभव पी.एन जी  चा  

नक्की तुम्ही ही भेट द्या पी .एन .जी . डहाणुकर ला https://pngadgilandsons.com/happy-colony/

सुवर्ण खरेदीचा आनंद लुटा ....

 ADV.  अर्चना गोन्नाडे ,नागपुर


https://pngadgilandsons.com/



https://pngadgilandsons.com/happy-colony/ 


 












Saturday, 30 October 2021

झुलते गर्भारपण ....

21:58 1 Comments


झुलते गर्भारपण ....

वैष्णवी कोपरकर ----आई मी होणारं गं ...... 

 <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7365972984366991"

     crossorigin="anonymous"></script>














झुलते गर्भारपण ....

आज घरातं सकाळ पासुनचं लगबग चालली होती .

नित्यनेमानं होणारी काम आज जरा लवकरचं होतं आली ...

घरची झाडलोट झाली फारशी पुसून  झाली ... 

फ्लॅट संस्कृती आल्यापासून  सडासंमार्जन शब्द मागे पडलाय .. 

रेखीव रांगोळी दारासमोर रेखली ...स्वस्तिक ,पावलं रेखाटून झालीत .. 

खूप दिवसांनी आज सुंदर रंग भरले त्यांत ,दाराला तोरण लागलं आम्रपर्णचं ... 

देवपुजा झाली ...देवघर विविधरंगी फुलांनी सुंदर दिसत होत ... 

आज आज आज खासचं कारण होतं ... 

वैष्णवीचा चा आज नवव्या महिन्याचा  पाळणा होता ... गोदभराई 

आठवा महिना पुर्ण होऊन नववा लागला होता ... 

नववा महिना आई कडुन,साजरपण

 लेकीचं ,माहेरची  साडी चोळी आईकडुन 

सगळी तयारी आदल्या रात्रीपर्यंत झालीच होती ...

हिरवी साडी ,बांगड्या ,हार फुल वेणी ,गजरा ,मेवा ,मिठाई ,सुका मे ,

सगळ  ठेवायला तबक , टेबलक्लाथ ,फळं झाकल्याला रुमाल नक्षीदार .. 

सारं सामान अगोदरच काढून ठेवलं होत ,ऐन वेळेला शोधाशोध नको .. 

पाळणा पुण्यांमध्ये ,वैष्णवीच्या घरी  करायचे ठरले होते .. 

कारणं कोरोना मुळे वैष्णवीला नागपूरला यायला जमणार नव्हतं .. 

मलाच पुण्याला  ला यावं लागलं ,,,, आम्ही दोघंही दोन महिने मुक्कामाला पुण्याला ..

आईबाबा सोबत आहेत म्हणुन तीही निश्चिन्त  होती ..  

स्वयंपाक करायचा होता रोजच्या स्वयंपाकापेक्षा चार पदार्थ अजुन जास्त ...

वडे पुरणं कोशिंबीरी ,चटण्या ... सुंदर पान  सजवलं  ....नैवेद्याचं पान वाढलं ..   

गर्भधारणा झाल्याचा आनंद ,आई होण्याचा आनंद काही विरळाच ...

असे भाग्याचे क्षण स्त्रीच्या आयुष्याला पुर्णत्व देतातं ... 

एका स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यातं मोठा आनंद असतो तो आई होण्याचा .. 

नऊ महिने बाळाला पोटांत झुलवयाचं ....किती कठीण 

देहाचा एक भाग ते होऊन बसतं ...नकळत . 

देह देवाचे मंदिर असं प्रत्यक्ष अनुभवावं ते  गर्भारशी स्त्रीनेंच 

देह आईचा  आणि आई चा आत्मा  म्हणजे ते गर्भातं वाढतं असलेलं बाळ .. 

आईचा जणु आत्माचं, ते बाळ म्हणजे ...ईश्वराचं अस्तित्व 

आ म्हणजे आई आणि ई म्हणजे ईश्वर ...संतवचन आहे  

दोन  जीवांमधुन तिसरा जीव निर्माण होणं ... पुन्हा ईश्वराचं अस्तित्व 

ईश्वर कृपेने सारं घडतं असतं . आशीर्वाद असतात .. 

.विज्ञानानं  कितीही प्रगती  गेलं तरी प्राण मात्र विधात्यालाचं फुंकावे लागतातं ... 

रंग रूप रस गंध सारं विध्यात्याने साकारलेलं ... नवजात बाळासाठी ... असो 

आजच्या स्वयंपाकाचा विशेष भाग म्हणजे पाच प्रकारच्या खिरी ... 


समिक्षा ,वैष्णवीच्या मैत्रिणीनं आणुन दिल्या 

,तिची आत्या करतं असतें त्या खिर्या .. 

मोठया  कलात्मकतेनं खिरी कराव्या लागतात , ...

गव्हले, नखुल्या ,मालत्या,बोटवे ,फेनुल्या ..

नावं गमतीदार,छोटी छोटी आणि खिरी पण.. 

सुबक ,सुरेख जणु सुंदर सुंदर कणीदार मणीदार मोतीचं ...  

हातांनी सपट्याला  दाब देऊन ,करता करता बोटं दुखायला लागतात 

पण सवयच असतें ना करायची ... मग नाही दुखतं ती ... 

कारणं त्यामागे सद्भावना असते  ती करण्याऱ्यांची ... 

 हे गोडधोड म्हणजे आईच्या गर्भात असलेल्या बाळाचा घास कि हो ... 

साक्षात ईश्वराला भरवतोय आपण ... सुंदर सुबक सुग्रास असचं हवं ना सारं ... 

मन लावुन एक एक खिरी ती घडवीत असते ... मग काहीच कुठं दुखत नाही ... 

अशा सुंदर खिरी समीक्षांनं आणुन दिल्या तिचं खरंच कौतुक वाटलं .. 

 कोरोना असल्यामुळे मोजकेचं नातेवाईक हॊतें .. 

हिरव्या साडी मध्ये वैष्णवी सुंदर दिसत  होती संदेश नं  ही  झब्बा कुर्ता  घातला होता ... 

समोरच्या टेबलवर सारं सामान ओळीनं मांडलं ... पानाभोवती  रांगोळी घातली 

फुलाफुलांनी टेबल सजवला ... औक्षण करायची निरांजन ,थाळी सगळं सजलं ..

रंगीत फुलांनी खुर्ची सजवलेली ,पाळणा आजकाल शक्यतोवर उपलब्ध नसतो . 

तुपाचं निरांजन उजळलं औक्षण,केलं वैष्णवी अन संदेश च ,आतं असलेल्या बाळाचं ... 

मुळातच आपली भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आहे ..गाणे बजावणे झालेत ..  

कां असावेतं  ह्या प्रथा ,परंपरा ? नवव्या महिन्यातं बाळाची वाढ पुर्ण झाली असते का ?

स्त्री ला ह्या काळांत प्रसन्न ठेवावं ,काही रुसवे फुगवे होऊ  नये 

अशीच इच्छा असावी साऱ्यांची.. म्हणून हा आनंदसोहळा .  

होणारी आई प्रसन्न  असली म्हणजेचं ती प्रसन्नता बाळापर्यंत आपसूकचं पोचते ... 

आई प्रसन्न ,बाळ आतल्याआतं प्रसन्न ,सभोवताली प्रसन्न वातावरण ... 

एकंदरीत  सारा आनंद भारलेला दशदिशा मध्ये ... हाच आनंद बाळ नाळेतुन शोषुन घेतं ... 

आणि बाळ येतांना सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतं ...आईबाबांची  सृष्टी बहरून जाते ...

 छोट्या बाळाचं किती कौतुक होणार ..सगळे आतुरतेने वाट बघत असतात .. 

छोटे छोटे समारंभ ,सणही आपल्याकडे  उत्साहाने साजरे होतात ...

सणं,संस्कार, संस्कृती  ,हात घालुन चालत असतात आणि आपलं जीवन समृद्ध होतं .. 

आपलं जीवन ही  रसपूर्ण होतं ..बाळाच्या रंगात सारें दंग होऊन जातात ..

येणारं  बाळं मुलगी कि मुलगा हा मोठ्या औत्सुक्याचा विषय ...

मग पेढा कि बर्फी खेळ सुरु होतो .... पेढा मुलाचा आणि बर्फी मुलगी ..दोघंही तितकेच गोडं .. 

मुलगा मुलगी भेदभाव नको ....पण हा खेळ म्हणजे आनंदाचा भाग .

बर्फी ,पेढे यांचे गिफ्ट बॉक्स करून ठेवलं होतेच ...                    


मग काय ... डोळे बंद करून एक बॉक्स वैष्णवीनं उचलला .. 

कुठला ? ते गुपित आहे हं ...मी कळवणारं  आहे तस्स .. 

समोर आरास मांडलेल्या मेवा मिठाई चा आस्वाद घेणं चाललं होतं .. 

मन भरून आलं ,तृप्त झालं ,तृप्तीचा आनंद आगळा वेगळचं .. 

सारं सुखरूप पार पडु दे ... देवाला साकडं घातलं .. हात जोडले .. 

वैष्णवी  बाळाला पोटांतं आतं झुलवतं होती अन हसतं होती ... 

अग आई बाळ लात मारतयं म्हणुन एकीकडे रडतही होती ... 

इतकं सोप्प नसतं आई होणं ... काळजी घ्या ..कळवते काय झालं ते ... ह्ह्ह्ह  

शुभमं भवतु

 अर्चना गोन्नाडे  नागपूर .. २०  ऑक्टो २०२१ 




  झुलते गर्भारपण .... 

 

  

 झुलते गर्भारपण .... 

इतर संदर्भ .... 

खालील लिंक क्लिक करा

archana gonnade on youtube

like share comment subscribe my channel Dear friends https://youtube.com/user/MANMIND123

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_23.html---navratri---7

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_24.html ---navrari 8  





Tuesday, 27 April 2021

तेथे कर माझे जुळती ... नारायणराव दाभाडकर,नागपुर

23:52 0 Comments

 तेथे कर माझे जुळती ... 

नारायणराव दाभाडकर,नागपुर

 

 तेथे कर माझे जुळती ... 

नारायणराव दाभाडकर,नागपुर

दिव्यत्वाची जेथे  प्रचिती ,तेथे कर माझे जुळती .. 

कोरोना ने सारे जग आपल्या विळाख्यात घेतलयं ... 

हाहाकार माजलाय सगळीकडे .. 

औषधं  , हास्पीटल ,निरनिराळ्या तपासण्या आता जस रुटीन होऊन गेलंयं ... 

ऑक्सिजन सिलेंडर्स चे बेड्स उपलब्ध नाहीत .. असं सर थैमान मांडलयं कोरोनाने ... 

अशातच राट्रीय  स्वयंसेवक  संघ परिवारातील एक व्यक्ती .. 

नारायणराव दाभाडकर दिव्यत्वाची प्रचिती घेऊन जाते ... 

घडलं असं कि नारायणराव कोरोना ग्रस्त झाले ,वय फक्त ८५ वर्ष ..

एका शिस्तीत आयुष्य घडलं , मनांवर  संस्कारांचा पगडा ... 

वृद्धापकाळ सुखात सरतोय , पण कोरोनानी  घेरलयं .. 

प्राणवायु ची गरज भासली ,इंदिरा गांधी रुग्णालयात(नागपुर ) भरती केली ... 

प्राणवायु सिलेंडर चा एकाच बेड  उपलब्ध  होता ... 

धावपळ करून साऱ्या कागदपत्रांचीही पूर्तता झाली ...https://kittydiaries.co

 नर्सेस ची धावपळ ,बेड तयार करायला , बेड तयार झाला ...

खिडकी जवळचा बेड त्यांना मिळाला ,प्राणवायूची  धोक्याची पातळी होती त्यांची 

उपचार सुरु झाले ... पण त्यांना आवाज आला ,रडण्याचा,विनवणीचा ,आर्त स्वरांचा .. 

एक महिला  ऑक्सिजन बेड साठी विनवणी करतं हॊती ,तिच्या  पतीसाठी .. 

जेमतेम वयाची चाळीशी असावी तिच्या पतीची ,संस्कारक्षम मन  स्वस्थ बसू देत नव्हतं ...

अरे हा माणुस जगाला पाहिजे मी काय मी जगलोयं माझं आयुष्य .. 

माझं बेड ,ऑक्सिजन त्या तरुणाला मिळायला हवं ... तरुण रक्त ,जगाला पाहिजे .. 

मनातं आलं नुसतं त्यांच्या अन प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली .. 

नातेवाईकांना बोलावलं ,घरच्यांना आपला  निर्णय कळवला 

सारेच जण स्तब्ध झाले नारायण रावांचा निर्णय ऐकून  

डॉक्टरांशी बोलले ..डॉक्टर ही  काही बोलु शकले नाहीत त्यांच्या निर्णयापुढे ...

मी बेड रिकामा करतो ,त्या तरुणाला हा बेड द्या ,त्याच्यावर उपचार सुरु करा .. 

माझें जगणे झालाय आता वारंवार ते सांगत राहिले 

,त्यांनी बेड रिकामा केला ,नातेवाईकांसोबत घरी गेलेत ..

दोन दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली ...

अनंताच्या प्रवासाला निघाले.. नारायण नारायण ..    

आपल्या उरलेल्या आयुष्याचंचं नारायणरावांनी जणू दान केलं .. 

साक्षात यमराज दाराशी उभा ,मृत्यु दाराशी उभा , 

पण प्राणपणानं जपलेलं तत्व ,संस्कार अखेरच्या श्वासापर्यंत जपले ..

आयुष्याचं दान घेणारा व्यक्तीही कुणी खचितच पुण्यवान असणारं ..

देणाऱ्याने देतं जावे ,घेणाऱ्याने घेत जावे ,

घेणाऱ्याने घेता घेता ,देण्यार्याऱ्याचे हात घ्यावे ... 

संस्कारांची ही गंगाजळी अशी वाहू दे .. 

नारायणरावांच्या  दिव्य आत्म्याला अशी  प्रार्थना मी बापडी काय करणार ?

दिव्यत्वाची जेथे प्रचिती ,तेथे कर माझे जुळती ...https://kittydiaries.co

लेखांकन --- ADV ,अर्चना गोन्नाडे ARCHNA GONNADE 

  https://kittydiaries.co






Wednesday, 21 April 2021

व्हॉट इज युवर मोबाईल नंबर? ले

04:48 0 Comments

व्हॉट इज युवर मोबाईल नंबर?


व्हॉट इज युवर मोबाईल नंबर?


























<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>

<!-- archgon -->

<ins class="adsbygoogle"

     style="display:block"

     data-ad-client="ca-pub-7365972984366991"

     data-ad-slot="1419097417"

     data-ad-format="auto"

     data-full-width-responsive="true"></ins>

<script>

     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

</script>
















व्हॉट इज युवर मोबाईल नंबर? 

हेलो मैडम  ,हेलो सर। .. 

मैं आपसे दो मिनिट बात कर सकता हु ?

ओके , मैं  अपनी अनुमति देती हु। . 

सामनेवाला ,कॉल करनेवाला  दस मिनिटो तक बात करते रहता। . 

मैं  सुनते रहती हु। ..सुनते ,समझते रहती उसकी  बाते 

हेलो मेरा नाम  ABC है ,मैं XYZ इन्शुरन्स कंपनी से हूँ। .. 

क्या आप कोई प्लान लेने में इंटरस्टेड है ,प्लीज मैडम  मत रखिये। .. 

मैं  आपको अच्छे से अच्छा इन्शुरन्स प्लान बताता हु। .. 

कॉल पर का व्यक्ति न चाहते हुए ढेर सरे प्लान बता देता। .. 

मै  हां हा हाजी  करके सरे प्लान सुन लेती हु। .. 

और क्या करती ? सुनते रहती। .. ,https://kittydiaries.com/

हेलो मैडम  , मैं  PMC कंपनी से बात कर रहा हु। . 

हमारी कंपनी टूर एंड ट्रेवल  इंडस्ट्री में काम करती है।  

कहा जाना चाहेंगी मैडम  इस साल ?  घुमके आइये मैडम  मस्त शिमला में। . 

सब रेलवे ,एयर ,बुकिंग वैगरे हम करा देते है। .. साथ में बहुत सारा डिस्काउंट भी। .. 

बहुत सूंदर सीज़न है मैडम  आप सर के साथ एन्जॉय कीजिये। .. 

मैं उसकी बकबक सुनती हु। .. हां ना करते रहती ,सिर हिलाती। .. 

सर से पुछकर बात करुँगी कहकर फ़ोन रख देती। .. 

और कितने फोन आते , अरे कितने  फोन 

हेलो ,मैडम  , RST के बात कर रहा हु। . 

मैडम  क्या ये सही वक्त है आपसे बात करनेका ? 

दो मिनिट बात कर सकता हु मैडम   मैं ? देखिये मैडम  सुनिए। . 

मैं हा  करने के पाहिले ही उसकी कैसेट चालू हो जाती। . 

मैडम  हमारी  कंपनी रियल एस्टेट में काम कराती है। . 

अभी अभी हमने एक प्रोजेक्ट लॉन्च किया हैhttps://kittydiaries.com/। .. 

स्विमिंग पूल ,थिएटर ,एक्सक्लूसिव टेरेस ,लविश गार्डन्स , प्रेमिसेस एरिया 

५० एमेनिटीज हम दे रहे है ,और वो भी बहोत सस्ते दामों में , 

बुकिंग कर लीजिये मैडम  आप जल्दी ,बहुत फायदे में रहेंगे। . 

अब मैं क्या बोलू बताओ / मैं हां से हां मिलते उसकी बात सुन लेती। .. 

और कितने फोन आएंगे ,कौन देता है मेरे फ़ोन नम्बर इनको 

मेरा सहज सवाल मन में उठता है। ..कहासे फोन मिलता है इनको 

न  जान  न पहचान , कौन मेरे फोन नंबर देता इनको ? 

न  कही जाती हु  न आती हु ,फिर  भी इतने फ़ोन। ..ऐसा कैसे होता। . 

आजकल मार्केटिंग नेटवर्क इतना बढ़ गया है। .. 

क्या आप किसीसे पूछते हो।, मेरा नंबर आपके पास कैसे ?

किसीको कोई फ़ोन नंबर देने की जरुरत नहीं है इस दुनिया में । .. 

कोई कहींसे  निकल लेता नंबर ,,, खुल जा सिम सिम 

मैं नहीं देता नंबर ,बिना नंबर दिए उनके पास पहुंच जाता। .. 

कोई जादूगरी सा लगता है। .. 

मेरा अपना नंबर व्यक्तिगत नहीं। .. 

वो सार्वजानिक हो गया। .. 

संभल जाइये। .. व्हॉट इज युवर मोबाईल नंबर? 

लेखांकन। .. adv अर्चना गोन्नाड़े ARCHANA GONNADE 

व्हॉट इज युवर मोबाईल नंबर? https://kittydiaries.com/




RELATED BLOGS

https://kittydiaries.com/ 

https://kittydiaries.com/

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/04/blog-post_10.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/03/blog-post_21.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/03/menstral-cups-silicone-magic-i.html



 












Saturday, 10 April 2021

जीवन सुंदर आहे ... My Centurian Blog

00:47 0 Comments

जीवन सुंदर आहे ... My Centurian Blog 



















जीवन सुंदर आहे ... My Centurian Blog 

१००  वा ब्लॉग आज लिहिते आहे ... 

कुठनं नक्की लिहायला सुरवात केली आठवतं नाही ... 

पेशाने मी वकील , कोर्टातुन घरी ,घरची काम ,आवराआवर .. 

फेसबुक अकाउंट नुकतंच सुरु केलेलं ... काही लिहावं असं मनात आलं .. .. 

फेसबुक वॉल वर आपले अनुभव शेअर करू लागली ... 

कधी इंग्लिश,कधी  हिंदी, कधी  मराठी ... भाषेतुन ... 

कोरोना आला ,लोकडाऊन  झालं ... सारे उद्योग धंदे बंद झाले ... 

कोर्ट ही  बंद झाले ...कामकाज बंद झाले ..  आर्थिक अडचण ही सोसावी लागली .. ... 

काय करावं आता ,घराची काम होती तरी वेळ भरपूर होता ... 

मी नंतर मग DAIRYOFKITTY.BLOGSPOT.COM नावानी वेबसाईट सुरु केली .

त्यावर नित्यनियमित ब्लॉग्स लिहू लागले ... लिखाणाची सवय झाली ...

काही ब्लॉग्स जरूर नजर टाका .. 

प्रेमकविता साऱ्यांना रुचणारा विषय ...मनामनाला  सादं घालणारा

अवतीभवती घडण्याऱ्या घटनांवर लिहू लागले ,विविध विषय हाताळले .. 

माझा सैनिक माझ्या रक्षणासाठी सीमेवर लढत असतो ,धारातीर्थी पडतात सैनिक ,शाहिद होतात .. 

माझ्या देशाबद्दलची प्रेमभाव आणि देशभक्ती ,व्यथा  मी माझ्या ब्लॉग्स मध्ये साकारली .

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/blog-post_23.html

.ऋतु बहराचा ,पावसाचा सुंदर अन भावणारा ,पावसाच्या कवितांना 

खूप प्रतिसाद मिळाला .. 

कविता वाचुन आम्ही चिंब चिंब भिजलो अश्या सुंदर प्रतिक्रिया रसिकांनी  दिल्या ..

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/httpswww.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/blog-post_26.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/07/blog-post_17.html

काही सामाजिक भावभावना माझ्या ब्लॉग्स मधून मांडल्या ...

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/07/blog-post_24.html 

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/07/blog-post_14.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/blog-post_17.html

भगवंताच्या  चरणी मन नेहमींच लीन होते ...गुरुभक्ती ,गुरुकृपा  असावी लागते .. 

श्रीराम ,श्रीकृष्ण ,राधा ,मीरा , ते सिंधुताई सपकाळ अमृता प्रितम , हे वेगळं विषय हाताळले

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/08/blog-post_27.html 

.https://diaryofkitty007.blogspot.com/2020/09/blog-post_24.html.

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/09/blog-post_16.html

भगवान बुद्ध यांच्या जीवनपट थोडक्यात लिहिलंय  

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/05/0752020-buddhapournima.html

समाजामध्ये आपण वावरतो .. काही घटना खूप दुखावून जातात ,त्याचे पडसाद मनावर उमटतात ... 

एका हत्तीणीला फटाके ठेऊन मारलं ,एका मूक प्राण्याची अशी हत्या झाली .. 

माझ्या संवेदनशील मनाला आघात करून गेलं ,... तो माझा ब्लॉग एक होती हत्तीण

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/httpswww_4.html .

आधार यावर्षी कोरोना मुळे सण समारंभ खुप थोडक्यात आटोपले ... 

गणेश स्थापना ,दसरा ,दिवाळी सारं  पडले ,कोरोनाच्या सावटाखाली ..

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/05/corona-2020-covid-19-part-1-httpswww.html.

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/05/coronavirus-2020-covid-19-part-2.html 

देवीचे नवरात्री झाले ... सप्तशती मधील या देवी सर्वभुतेषु विष्णुमायेति शब्दिता ..

ह्या मंत्राचाच आधार  घेऊन आजच्या कालानुरूप काय साध्य करता येईल ... 

नवरात्रीच्या ह्या नऊ ब्लॉग्समध्ये  मला आकलन झालं तसं मांडलं आहे ...

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_22.html 

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_25.html

आपली मातृभाषां उत्तम ,त्यातुन खूप छान व्यक्त होता येतं ... 

हिंदी राष्ट्रभाषा आणि  इंग्लिश जागतिक भाषा ... 

ह्या भाषेतुन ब्लॉग्स लिहिलेत ...कथा ,कविता ,गझल ,असे निरनिराळे प्रकार हाताळलेत ...  

अजुन बरेच  ब्लॉग्स आहेत ... माणसांचं ,भेटणं ,वागणं ,बोलणं ,ह्यातून माणुस उलगडतं जातो .. 

काही ठेव्वायचं ,काही सोडुन द्यायचं ,असंच आयुष्य अनुभवसंपन्न होतं ... 

फेसबुक ,व्हाट्स अँप ,इंस्टाग्राम ,ट्विटर ,,हे इलेक्ट्रॉनिक समाजमाध्यमं ... 

भरगच्च   बातम्या येथे मिळतील ,खूप मित्र मैत्रिणी होतील ... पण कुणाशी मैत्री करायची ?

काही  मित्रांची फेसबुक वरून ओळख झाली .. 

त्यांचे प्रोत्साहन मिळाले ,कौतुकाचे दोन शब्द उभारी आणतात मनाला ... 

त्यांच्या मुळेच शक्य झालाय हे इथपर्यंत पोहचणं ...

त्यांचा नक्कीच उल्लेख करावासा वाटतो ... प्रत्यक्ष भेट नाही ,पण फोन वर   बोलणं होतं .. 

 Sudendra Kulkarni Hemant Gharote Anita Sharma Prasad Koparkar Kishore Khade

  Mahesh Jadhav Anand Gunjkar  साहेब ,

DR.Mahadeorao Sonkusale @@Dasharath Gahane

 @Madhav Barve @  Nitin Upadhye@ Jaiprakash Munshiram Sharama @@Pramod Shukla 

ही  मंडळी योगायोगानेच भेटलीत... 

माझ्या एका ब्लॉग वर @Sanjay Fadnavis यांनीं ही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे .. 

 काही मैत्रिणींचा उल्लेख करावा अश्या मैत्रिणी ... 

@Shital Khadtakar @Shital Shrigarpawar

Monika Deshmukh VAISHALI WARHADE,Pramod WArhade

व्हाट्स अँप वर कंमेंट्स देणार खूप मित्र मैत्रिणींनी आहेत ...

घरच्या मंडळीं पैकी एक प्रतिष्ठित लेखक ,व कलाकार Shrikant Pawniker माझे थोरले भाऊ .. 

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/11/blog-post_17.html... 

SRUSHTEE DALAL ,SWARNIMA DALAL Shuchita Dalal ,त्यांचं प्रोत्साहन असतं आणि Abhinav Gonnade,माझा मुलगा  माझा लॅपटॉप हिसकावुन घेतो आणि फेसबुक बंद करतो . 

YOUNGSTRESमध्ये भेटलेला एक मित्र @Hrush Warade नॅशनल  स्कूल ऑफ फिल्म इन्स्टिटयूट मधून पदवी घेतलेला एक थिएटर अभिनेता  त्याच्या सोबत  बोलतांना आपल्याला खूप काही शिकायचं आहे अजून असं वाटतं ..

त्याच्या टिप्स छान असतात https://kittydiaries.com/

 माझी मुलगी @ Vaishnavee Gonnade Koparkar .आजच्या काळाबद्दल बरंच काही सांगते आणि मी ऐकते .. 

बरेच ग्रुप जॉईन केलेत मैं ऑर मेरी यात्रा  @Neelam Bhagi,NAINA HUSAKEDeepti Gonnade

/https://diaryofkitty007.blogspot.com/ ह्या website हा माझा शतकी ब्लॉग 

 एक नवीन WEBSITE सुरु केली  https://kittydiaries.com/.....  Vaibhav Shinde Patil 

आज बरेच फोल्लोवेर्स आहेत   त्यांवर बरेच अजुन ब्लॉग्स लिहायचे आहेत ..काम सुरु आहे ..

इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांतून माणसं भेटतात पण कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्नाचं असतो ... 

 कमी जास्त चालायचं  ... खुप नमुने ही असतात,भेटतात , पण सोडून द्यायचं .. ,

असा माझा प्रवास आहे शतकी ब्लॉग पर्यंतचा ... 

कोरोना नि जग व्यापलेलं असलं तरीही ...सर्वत्र भयावह वातावरण असलं तरी ...

आयुष्याचा दृष्टिकोन  सकारात्मक ठेवावा लागतो .. तेव्हाचं आयुष्यं घडतं ,सुंदर होतं ... 

आपल्या ब्लॉग्स आणि फेसबुक वर एक वाक्य लिहिते आवर्जुन.. 

जीवन सुंदर आहे ,जीवन सुंदर आहे ... 

आयुष्याचं  हे ब्रीदवाक्य असलं तर ...... पुढचा मार्ग सुकर , सुखकर होईल .. 

शुभम भवतु .....

 https://kittydiaries.com/

लेखांकन .. Adv अर्चना पवनीकर -गोन्नाडे

                      Archana -Pawniker -Gonnade


 




LIFE IS BEAUTIFUL     RELAX ANN ENJOY             MITHOO

 ENJOYMENT                    KEEP READING                 BOOKISH


LOVE YOUSELF                    FUNTOOSH                     LOUD SPEAKING

MEDITATION                         VISIThttps://kittydiaries.com/